Reliance Industries : इंधन दरवाढ ‘रिलायन्स’च्या मुळावर ; पेट्रोल पंप बंद होण्याची भीती !

| Updated on: May 14, 2022 | 8:26 AM

इंधन दरवाढीचा थेट परिणाम रिलायन्स इंडस्ट्रीजवर दिसून आला आहे. देशातील त्यांचे पेट्रोल पंप बंद होण्याच्या मार्गावर आहेत. दरम्यान कंपनीने त्यांच्या डिलर्सला नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी डिलर्सला अतिरिक्त खर्चासहित वित्तीय सहायता देण्याची शक्यता आहे.

Reliance Industries : इंधन दरवाढ रिलायन्सच्या मुळावर ; पेट्रोल पंप बंद होण्याची भीती !
रिलाईन्सलाही फटका?
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

इंधन दरवाढीचा सर्वसामान्य नागरिकांवर सर्वाधिक परिणाम झाला आहे. त्याची मिळकत वाढली नाही, परंतू खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. आता या दरवाढीचा खासगी पेट्रोल पंप कंपन्यांनाही फटका बसल्याचे दिसून येत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) या कंपनीने या इंधन दरवाढीने (Fuel Price Hike) त्यांना फटका बसल्याचे सांगितले आहे. डिझेलच्या (Diesel) वाढत्या दराने कंपनीला विक्रीत दररोज 10 ते 12 रुपयांचा प्रति लिटर फटका बसला आहे. याचा थेट परिणाम वितरणावर झाला असून 16 मार्च रोजी पासून कंपनींने इंधन पुरवठा अर्ध्यावर आणला आहे. आरआयएलने अद्यापही त्यांचा इंधन पुरवठा पूर्ववत केला नाही. ही इंधन दरवाढ कंपनीच्या मुळावर येऊन ठेपली आहे. पेट्रोलपंप बंद होण्यापासून वाचण्यासाठी आरआईएल काही पर्यायांचा विचार करत आहे. रिलायन्स आणि बीपी-पीएलसी (BP-PLC) यांनी त्यांच्या डिलर्सला सहकार्य करण्याची तयारी सुरु केली आहे. डिलर्सला नुकसान भरपाई देण्याची योजना या दोन्ही कंपन्यांनी आखली आहे. 2008 मध्ये सुद्धा आरआयएलने कच्चा तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर आणि सरकारने हात वर केल्यानंतर डिलर्सला नुकसान भरपाई दिली होती.

डिलर्सला आर्थिक सहायता करण्याचा प्रयत्न कंपनी करणार आहे. अतिरिक्त खर्च भागविण्यासाठी मदत करु शकते अथवा इंधन पुरवठ्यात बदल करु शकते. 2008 साली अशीच परिस्थिती आली असता, कंपनी डिलर्सच्या पाठिशी उभी राहिली. रिलायन्सने डिझेलवर 500 तर पेट्रोलवर 400 रुपये प्रति किलोलिटर अतिरिक्त मार्जिन देण्याचा प्रस्ताव दिला होता.

ज्या डिलर्सने इंधन विक्री न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांना पुन्हा काम सुरु करण्यासाठी कंपनीने गुंतवलेल्या एकूण रक्कमेवर 12.5 टक्के परतावा दिला होता. काही डिलर्सच्या मते, नुकसान भरपाईची योजना राबविल्यास त्यांना मोठी सहायता मिळेल. आरआयएल आणि बीपी-पीसीएलचे देशभरात 1400 हून अधिक पेट्रोल पंप आहेत.

हे सुद्धा वाचा

किरकोळ विक्रीतून कंपन्यांना नुकसान

सध्या भू-राजकीय परिस्थितीने सगळीकडे चिंतेचे वातावरण पसरले आहे. इंधनाच्या किंमतीत कमालीची वाढ झाली आहे. तेल वितरण कंपन्यांना किरकोळ विक्रीत मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. पेट्रोल आणि डिझेल वितरणावर ऑईल मार्केटिंग कंपन्यांना ही मोठा फटका बसला आहे.

कंपन्यांच्या अधिका-यांच्या दाव्यानुसार, त्यांना पेट्रोलवर 10 रुपये प्रति लिटर तर डिझेलवर 20 रुपये प्रति लिटर नुकसान सहन करावे लागत आहे. 22 मार्च ते 6 एप्रिल दरम्यान पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत 14 वेळा वाढ करण्यात आली आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाने अद्यापही विराम न घेतल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रड ऑईलच्या किंमती प्रति बॅरल 100 डॉलरच्या वरती आहेत.