Share market updates: तीन दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात पुन्हा तेजी, काय आहे कारण?

| Updated on: Jul 22, 2021 | 10:27 AM

Share Market | बजाज फायनान्स, टाटा स्टील, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक आणि इन्फोसिस या कंपन्यांच्या समभागांचे भाव आज वधारताना दिसले.

Share market updates: तीन दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात पुन्हा तेजी, काय आहे कारण?
भांडवली बाजार
Follow us on

मुंबई: गेल्या तीन दिवसांच्या घसरणीनंतर गुरुवारी भांडवली बाजारात तेजी पाहायला मिळाली. सकाळी बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्सने 296 अंकांनी उसळी घेत 52494 ची पातळी गाठली. त्यानंतर सेन्सेक्स 52604 च्या पातळीपर्यंत गेला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीही 104 अंकांनी वधारत 15736 च्या पातळीवर पोहोचला.

बजाज फायनान्स, टाटा स्टील, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक आणि इन्फोसिस या कंपन्यांच्या समभागांचे भाव आज वधारताना दिसले. तर एशियन पेंटस, पॉवर ग्रीड, एचसीएल टेक्नॉलॉजी या समभागांच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली.
काल ईदच्या सुट्टीनिमित्त भांडवली बाजार बंद होता. मात्र, आज जागतिक बाजारातील तेजीचे सकारात्मक पडसाद भारतीय बाजारातही उमटले. 21 जुलैला अमेरिकन शेअर बाजारातील डाऊ जोन्स निर्देशांक 0.83 टक्के तर S&P 500 0.82 टक्क्यांनी वधारला. तर आशियाई बाजारांमध्येही तेजीचे वातावरण पाहायला मिळाले.

भारतीय उद्योजक चीनला एक लाख कोटींचा धक्का देणार

गेल्या वर्षी भारतीय व्यापाऱ्यांनी सुरू केलेल्या चिनी मालाच्या बहिष्कार मोहिमेचा दुसरा टप्पा आजपासून पुन्हा सुरू केलाय. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ने ‘भारतीय वस्तू – आमचा अभिमान’ या घोषणेसह देशभरात चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मोहीम सुरू केलीय. त्यात डिसेंबर 2021 पर्यंत चिनी उत्पादित वस्तूंची आयात भारतात एक लाख कोटी रुपयांनी कमी करण्याचे लक्ष्यही ठेवलेय.

सीएआयटीचे म्हणणे आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकल आणि व्होकल, स्वावलंबी भारत हाक यशस्वी करण्याच्या दिशेने ही मोहीम महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. सीएआयटीचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल म्हणाले की, या टप्प्यात एफएमसीजी उत्पादने, दैनंदिन वस्तू, किराणा, पादत्राणे, खेळणी, स्वयंपाकघर उपकरणे, क्रोकरी, गिफ्ट वस्तू, फर्निचर फॅब्रिक्स या चीनमधून आयात केल्या जाणार्‍या वस्तूंवर पूर्णतः बहिष्कार घालण्यात यावा.

चीनमधील आयात 20 वर्षांत 3500 टक्क्यांनी वाढली

2001 मध्ये चिनी वस्तूंची भारतात आयात फक्त 2 अब्ज डॉलर्स होती, ती आता वाढून 70 अब्ज डॉलर्स झालीय, याचा अर्थ केवळ 20 वर्षांत चीनकडून आयात केलेल्या वस्तूंमध्ये 3500 टक्के वाढ झालीय. विचारविनिमय योजनेअंतर्गत चीन भारताचा किरकोळ बाजार हस्तगत करण्याचा प्रयत्न करीत आहे, ज्यास भारतातील व्यापारी आणि नागरिक कोणत्याही प्रकारे यशस्वी होऊ देणार नाहीत.

संबंधित बातम्या:

Gold Price Today: सोन्याचे दर झाले कमी, चांदीदेखील स्वस्त, पटापट तपासा

पेट्रोल आणि डिझेलसंदर्भात लवकरच मोठा दिलासा, किंमत किती होणार?

BPCL-हमसफरकडून दिल्लीत डिझेलची डोअरस्टेप डिलिव्हरी सुरू, घसबसल्या मागवा डिझेल