Gold Price Today: सोन्याचे दर झाले कमी, चांदीदेखील स्वस्त, पटापट तपासा

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार बुधवारी 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 47,400 रुपयांवरून 47,050 रुपये आणि चांदी 66,600 रुपये प्रतिकिलोवर बंद झाली.

Gold Price Today: सोन्याचे दर झाले कमी, चांदीदेखील स्वस्त, पटापट तपासा
संग्रहित छायाचित्र
Follow us
| Updated on: Jul 21, 2021 | 9:15 PM

नवी दिल्ली : Gold Price Today on 21 July 2021: सोने-चांदीच्या किमतीत आज घसरण झालीय. गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार बुधवारी 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 47,400 रुपयांवरून 47,050 रुपये आणि चांदी 66,600 रुपये प्रतिकिलोवर बंद झाली.

आपल्या शहरातील 22 कॅरेट सोन्याची किंमत जाणून घ्या

नवी दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 10 ग्रॅम 47,050 रुपयांवर बंद झाली. चेन्नईमध्ये सोन्याला प्रतितोळा 45,300 हजारांचा भाव आहे. वेबसाईटनुसार मुंबईत नवीन किंमत 47,120 रुपये आहे. बुधवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅम 380 रुपयांनी वाढून 51,330 रुपये झाले, मागील व्यापार सत्रात ही किंमत 51,710 रुपये होती. आधीच्या व्यापारात चांदी 67,500 रुपयांवरून 900 रुपयांवरुन 66,600 रुपये प्रतिकिलोवर आली.

सोन्याचे भाव का वाढले?

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की, डॉलरच्या मजबुतीमुळे सोन्याच्या किमतीतील घसरणीची नोंद झाली. त्याचबरोबर न्यूयॉर्कस्थित कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याच्या किमतीतील घसरणीचा परिणाम भारतीय सराफा बाजारावरदेखील झाला.

सद्य किमतीवर खरेदी केल्यापासून आपल्याला किती पैसे मिळतील?

तज्ज्ञांचे मत आहे की, या वर्षाच्या अखेरीस सोन्याची किंमत मागील दहा विक्रम मोडत प्रति 10 ग्रॅम 60 हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकते. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी 6 महिन्यांच्या कालावधीत आणि स्टॉपलॉससह खरेदी केल्यास त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. जर आपण सोन्याच्या गुंतवणुकीबद्दल बोललो तर गेल्या वर्षी सोन्याने 28 टक्के परतावा दिलाय. जर आपण दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करत असाल तर सोने अद्याप गुंतवणुकीसाठी एक अतिशय सुरक्षित आणि चांगला पर्याय आहे, जो चांगला परतावा देईल.

‘हॉलमार्किंगच्या दागिन्यांसाठी ग्राहकांना ऑगस्ट महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार’

केंद्र सरकारने 16 जूनपासून देशभरात हॉलमार्क असलेल्याच सोन्याच्या दागिन्यांची विक्री केली जाईल, हा नियम लागू केला होता. मात्र, या नियमाची अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर ग्राहक अजूनही हॉलमार्क (Gold Hallmarking) असलेल्या दागिन्यांच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यातील मोठ्या जिल्ह्यांमधील सर्व सराफी पेढ्यांमध्ये फक्त सोन्याची शुद्धता प्रमाणित केलेले (हॉलमार्क) दागिने उपलब्ध होण्यासाठी अजून किमान दीड महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

केंद्र सरकारने नोटांबदी आणि जीएसटीप्रमाणेच या निर्णयाची घाईघाईने अंमलबजावणी केल्याचे चित्र दिसत आहे. कारण, नियम लागू होऊन 12 दिवस उलटल्यानंतरही नोंदणी प्रणालीत बरेच बदल बाकी आहेत. त्यामुळे आता Gold Hallmarking ची अंमलबजावणी ऑगस्ट महिन्यापर्यंत लांबणीवर पडली आहे.

संबंधित बातम्या

पालक आणि वडिलधाऱ्यांना 10 हजार मिळणार; केंद्र सरकारचे मोठे पाऊल

ATM मधून पैसे काढणे आणि डेबिट-क्रेडिट कार्डावरील शुल्कात लवकरच वाढ, जाणून घ्या RBI च्या सूचना

Gold Price Today: Gold prices have come down, silver is also cheaper, check it out

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.