AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युद्ध सुरू असतानाच मोठी खळबळ, त्या एका गोष्टीसाठी इस्त्रायच्या कमांडोंनी लेबनॉनमधील अख्ख कब्रस्तान खोदलं, आत काय मिळालं?

मोठी बातमी समोर येत आहे, इस्त्रायलकडून लेबनॉनमधील एक संपूर्ण कब्रस्तान खोदण्यात आलं आहे. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार इस्त्रायलच्या स्पेशल कमांडोंकडून संपूर्ण कब्रस्तान खोदून काढण्यात आलं आहे.

युद्ध सुरू असतानाच मोठी खळबळ, त्या एका गोष्टीसाठी इस्त्रायच्या कमांडोंनी लेबनॉनमधील अख्ख कब्रस्तान खोदलं, आत काय मिळालं?
cemetery Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 08, 2026 | 3:22 PM
Share

इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर जोरदार हल्ले सुरू आहेत, तर दुसरीकडे इराणने देखील जोरदार प्रत्युत्त दिलं आहे. या युद्धामध्ये अमेरिका आणि इस्त्रायलचं देखील मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान हे युद्ध सुरू असतानाच आता एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे युद्ध सुरू असतानाच इस्त्रायलने पूर्व लेबनॉनमध्ये एक ऑपरेशन राबवलं. इस्त्रायलच्या या ऑपरेशनची चर्चा सध्या संपूर्ण मध्य पूर्वेत सुरू आहे. इस्त्रायलच्या सैन्यांकडून इराणवर तर मिसाईल हल्ले सुरूच आहेत, पण यामधून लेबनॉन देखील सुटलेला नाही. इस्त्रायलकडून लेबनॉनवर देखील हल्ले सुरू आहेत. मात्र हे हल्ले सुरू असतानाच आता इस्त्रायलच्या स्पेशल युनिटकडून पूर्व लेबनॉनमध्ये एक ऑपरेशन राबवण्यात आलं.

लेबनॉनमधील एक स्थानिक कब्रस्तान इस्त्रायलच्या स्पेशल युनिटकडून संपूर्णपणे खोदून काढण्यात आलं आहे. 40 वर्षांपू्र्वी लेबनानमध्ये इस्त्रायलच्या एका फायटर विमानाच्या पायलटचा मृत्यू झाला होता, त्याचा शोध घेण्यासाठी ही मोहीम इस्त्रायलने राबावली आहे. रॉन अराद असं या पायलटचं नाव आहे.

टाइम्स ऑफ इस्त्रायलच्या एका रिपोर्टनुसार शुक्रवारी रात्री इस्त्रायलच्या सैन्यांनी हे कब्रस्थान पूर्णपणे खोदून काढलं आहे. इस्त्रायलच्या या मिशनला हिज्बुल्लाहच्या काही सदस्यांकडून विरोध करण्यात आला, मात्र तरी देखील इस्त्रायलने या कब्रस्तानात खोद काम सुरूच ठेवलं. 40 वर्षांपूर्वी इस्त्रायलचा पायलट रॉन अराद यांचा मृत्यू झाला होता, त्याच्या आवशेषांचा शोध घेणं हा आमचा उद्देश असल्याची माहिती यावेळी इस्त्रायलकडून देण्यात आली आहे. दरम्यान या ठिकाणी या फायटर जेटच्या पायलटचे आवशेष सापडले नाहीत, मात्र भविष्यात त्याचा शोध सुरूच राहील असंही इस्त्रायलने म्हटलं आहे.

या रिपोर्टनुसार इस्त्रायलच्या सैन्यांकडून लेबनानमधील नबीशीत गावातील कब्रस्तान खोदण्यात आलं आहे. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार इस्त्रायलचे चार कमांडो हेलीकॉप्टरमध्ये बसून आले, आणि त्यांनी गावात प्रवेश करत थेट कब्रस्तान खोदण्यास सुरूवात केली.बराचवेळ हे इस्त्रायली कमांडो तिथेच होते, त्यानंतर ते पुन्हा परत गेले. एका स्थानिक रिपोर्टने केलेल्या दाव्यानुसार अराद याचा मृत्यू झाल्यानंतर त्याला याच कब्रस्तानमध्ये दफन करण्यात आलं होतं. सध्या इस्त्रायलकडून या पायलटचा शोध सुरू आहे.

Follow Us
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा