AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akka Review: 800 वर्षांपासून महिलांचं राज्य, हातात बंदुका अन् सत्तेसाठी रक्तरंजित संघर्ष; कीर्ती सुरेश-राधिका आपटेची ‘अक्का’ सीरिज कशी आहे? वाचा रिव्ह्यू

Akka Review: 'अक्का' या वेब सीरिजमध्ये राधिका आपटे आणि किर्ती सुरेश यांच्या मुख्य भूमिका आहेत. सीरिजमध्ये दोघींनी अत्यंत दमदार अभिनय केला आहे. हा सीरिज एकंदरीत कसा आहे, हे जाणून घेण्यासाठी वाचा रिव्ह्यू..

Akka Review: 800 वर्षांपासून महिलांचं राज्य, हातात बंदुका अन् सत्तेसाठी रक्तरंजित संघर्ष; कीर्ती सुरेश-राधिका आपटेची 'अक्का' सीरिज कशी आहे? वाचा रिव्ह्यू
Akka Series ReviewImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 01, 2026 | 12:10 PM
Share

Akka Review: ओटीटीवर सध्या वेगवेगळ्या विषयांवरील वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यातच अभिनेत्री कीर्ती सुरेश आणि राधिका आपटे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘अक्का’ ही नवी वेब सीरिज चर्चेत आली आहे. महिलांच्या वर्चस्वाखाली चालणारी गुन्हेगारी दुनिया, सत्तासंघर्ष, सूड आणि रक्तरंजित संघर्ष अशी या सीरिजची कथा आहे. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली तयार झालेली ही सीरिज 30 ऑक्टोबरपासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. मात्र, दमदार कलाकार आणि वेगळ्या विषयामुळे निर्माण झालेल्या अपेक्षा ही सीरिज पूर्ण करू शकते का? जाणून घेऊयात..

काय आहे ‘अक्का’ची कथा?

‘अक्का’ची कथा दक्षिण भारतातील पेरनुरु या काल्पनिक शहरात घडते. या शहरावर गेल्या 800 वर्षांपासून महिलांचं राज्य आहे. इथली सत्ता पुरुषांच्या हातात नसून महिलांच्या एका शक्तिशाली टोळीकडे आहे. या व्यवस्थेत महिलांना प्रियकर ठेवण्याची मुभा आहे, मात्र लग्न करण्याची परवानगी नाही. मुलींकडे वारसाहक्काने सत्ता सोपवली जाते. या संपूर्ण व्यवस्थेचा कारभार ‘अक्का’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या महिला चालवतात. कथेतील भवानी (कीर्ती सुरेश) ही मलेमरची प्रमुख आहे. तिच्या साम्राज्यावर रुद्रा (राधिका आपटे) नावाच्या महिलेची नजर असते. मुंबईतून आलेली रुद्रा भवानीची सत्ता उलथवून टाकण्याचा प्रयत्न करते. त्यातून दोघींमध्ये संघर्ष सुरू होतो. सत्तेची लालसा, विश्वासघात आणि जुन्या हिशेबांचा बदला घेण्याची ही कहाणी पुढे अनेक वळणं घेते.

पहा ट्रेलर

कीर्ती सुरेशने मारली बाजी

या सीरिजची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे कलाकारांचा अभिनय. भवानीच्या भूमिकेत कीर्ती सुरेशने जबरदस्त काम केलं आहे. पारंपरिक साड्या, सोन्याचे दागिने आणि राजेशाही थाटात तिचा अंदाज लक्षवेधी आहे. तिच्या व्यक्तिमत्त्वातील शांतपणा आणि प्रसंगी दिसणारी आक्रमकता प्रभावी वाटते. दुसरीकडे राधिका आपटेने रुद्राच्या भूमिकेत वेगळी छाप पाडण्याचा प्रयत्न केला आहे. तिचा नकारात्मक अंदाज आणि सत्तेसाठीची धडपड कथेला वेगळी दिशा देते. तन्वी आझमी, मोनिका पंवार, अंशुमान पुष्कर आणि महेश मांजरेकर यांच्याही भूमिका महत्त्वाच्या आहेत.

कुठे कमी पडते सीरिज?

वेगळा विषय आणि भव्य सेट असूनही सीरिजची कथा काही ठिकाणी अपेक्षित परिणाम साधत नाही. सुरुवातीचे भाग उत्सुकता निर्माण करतात, मात्र पुढे कथानकाचा वेग मंदावतो. अनेक पात्रं आणि त्यांच्यातील गुंतागुंतीची नाती समजून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडा वेळ लागतो. काही प्रसंगांमध्ये हिंसेचा अतिरेकही जाणवतो. मातृसत्ताक व्यवस्था दाखवताना पुरुषसत्ताक व्यवस्थेतील सत्तेचेच काही जुने पॅटर्न पुन्हा दिसतात, हा मुद्दाही विचार करायला लावतो.

पाहावी की नाही?

एकंदरीत, ‘अक्का’ ही संकल्पनेच्या बाबतीत वेगळी आणि कलाकारांच्या अभिनयाच्या बाबतीत प्रभावी सीरिज आहे. मात्र, कमकुवत पटकथा आणि काही ठिकाणी संथ होणारं कथानक यामुळे तिची मजा कमी होते. कीर्ती सुरेश आणि राधिका आपटे यांचा अभिनय पाहण्यासाठी ही सीरिज नक्की पाहता येईल.

ओटीटी प्लॅटफॉर्म: नेटफ्लिक्स दिग्दर्शक: धर्मराज शेट्टी रेटिंग: 3/5

Follow Us
ठाण्यात भव्य पदयात्रेला जोरदार प्रतिसाद; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत..
ठाण्यात भव्य पदयात्रेला जोरदार प्रतिसाद; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन
राम पुरणेकरांनी घेतली CM फडणवीसांची भेट?
प्रदीप पुरणेकर प्रकरणाला नवे वळण! मुलगा राम पुरणेकरांनी घेतली फडणवीसांची भेट, नेमकं सत्य काय?
शेतकऱ्यांची मागणी मान्य? नीरा नदीपात्रातून 750 क्युसेक पाण्याचा विसर्ग
शेतकऱ्यांची मागणी मान्य? नीरा नदीपात्रातून 750 क्युसेक पाण्याचा विसर्ग
न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेत होणार
न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेतही होणार सहभागी!
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदेंचा सहभाग?
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदे होणार सहभागी
जेलर म्हणायचा ती कोठडी विजय मल्ल्यासाठी आहे, मी... राऊतांच्या दाव्याने
जेलर म्हणायचा ती कोठडी विजय मल्ल्यासाठी आहे, मी... राऊतांच्या दाव्याने वळल्या नजरा
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे
Sangli District Bank Election 2026 : सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी पक्षाला दणका?
दिवाळी तोंडावर असतानाच व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला; हॉटेल...
दिवाळी काही दिवसांवरच असतानाच व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला; हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका!
जयकुमार गोरे हॉटेलात राहून सकाळ, दुपार, रात्र कामच करतात ना; रोहित...
जयकुमार गोरे हॉटेलात राहुन सकाळ, दुपार, रात्र कामच करातात ना; रोहित पवारांची सडकून टीका, नेमकं प्रकरण काय?