AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

River Linking Project: नदी जोड योजनेसाठी पाण्यासारखा पैसा; 1,15,530 कोटींच्या प्रकल्पास मान्यता, हा प्रदेश होणार सुजलाम-सुफलाम

River Linking Project worth 115530 crores: राज्यातील नदीजोड प्रकल्पासाठी सरकारने तिजोरी उघडली आहे. 1,15,530 कोटींच्या प्रकल्पास मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भाग सुजलाम सुफलाम होतील.

River Linking Project: नदी जोड योजनेसाठी पाण्यासारखा पैसा; 1,15,530 कोटींच्या प्रकल्पास मान्यता, हा प्रदेश होणार सुजलाम-सुफलाम
नदीजोड प्रकल्पImage Credit source: देवगाथावरून
| Updated on: Mar 08, 2026 | 3:19 PM
Share

River Linking Project worth 115530 crores: राज्यात नदीजोड प्रकल्पाची चर्चा कित्येक वर्षांपासून सुरू आहे. धुळ्यातील तत्कालीन जिल्हाधिकारी संभाजी मुंडे यांनी गिरणा-कनोली बोरी हा ऐतिहासिक नदीजोड प्रकल्प पूर्ण केला. तेव्हा अथवा त्याच्या अगोदरपासून नदी जोड प्रकल्पाची सातत्याने मागणी होत आहे.आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पांचे राज्याला पुन्हा स्वप्न दाखवले आहे. केवळ स्वप्नच दाखवले असे नाही तर प्रकल्पाला मान्यता देत त्यासाठी भरीव निधीची तरतूदही केली आहे. नदीजोड प्रकल्पासाठी 1,15,530 कोटींच्या प्रकल्पास मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भाग सुजलाम सुफलाम होतील.

1,15,530 कोटींची प्रकल्प तरतूद

पुढील 20 वर्षांसाठी पाण्याची तरतूद करण्यासाठी महायुती सरकारने कंबर कसली आहे. ग्रामीण आणि शहरी भागात पाणी उपलब्धेची सुनिश्चिती केली जाईल. वैनगंगा-नळगंगा नदीजोड योजनेसाठी 94 हजार 968 कोटी रुपये किंमतीच्या प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. वैतरणा आणि उल्हास खोऱ्यातील 54 टीएमसी अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याचे प्रस्तावित आहे. तर दमणगंगा-चैतरणा गोदावरी नदीजोड प्रकल्पाच्या 13 हजार 497 कोटी रुपये किंमतीस मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय नार-पार गिरणा नदीजोड प्रकल्पाच्या 7 हजार 465 कोटी रुपये किंमतीच्या कामास मान्यता देण्यात आली आहे.

वैनगंगा-नळगंगा नदीजोड या महत्त्वकांक्षी प्रकल्प

भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीचे पाणी बुलढाणा जिल्ह्यातील पूर्णा- नळगंगा नदीत आणले जाणार आहे. या प्रकल्पासाठी विदर्भातील अनेक जिल्ह्यातून ३८८.२८ कि.मी. लांबीचा कालवा तयार करण्यात येणार आहे. या प्रकल्पात एकूण २०.४९ कि. मी. च्या १३ बोगद्यांचा समावेश आहे. विदर्भातील एकूण ८ जिल्ह्यातील ३८ तालुक्यातून कालवा जाणार आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम व भंडारा जिल्ह्यांना या प्रकल्पाचा थेट फायदा होईल.

वैतरणा आणि उल्हास खोऱ्यातील पाणी गोदावरीत

वैतरणा आणि उल्हास या कोकण विभागातील पश्चिमी नदीखोरे आहेत. या नद्या सह्याद्री पर्वतरांगेत उगम पावतात आणि अरबी समुद्राला मिळतात. त्यांचे पाणी गोदावरी नदीत वळवण्यात येणार आहे. या नद्यांमधील अतिरिक्त 54.70 टीएमसी पाणी मराठवाड्यातील तुटीच्या खोऱ्यात वळवण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.

नार-पार गिरणा नदीजोड प्रकल्प

उत्तर महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वकांक्षी प्रकल्प नार-पार नदीजोड प्रकल्पाला दोन वर्षांपूर्वी मंजुरी देण्यात आली होती. या प्रकल्पाचा नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील दुष्काळी भागाला मोठा फायदा होईल. या पश्चिम वाहिन्या नद्यांचे अतिरिक्त पाणी गिरणा खोऱ्यात वळवून 49,516 हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्यात येणार आहे.

Follow Us
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर