AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी भ्रष्टाचाराचे शिरोमणी म्हणाले, आता सोबत का घेताय? संजय राऊतांचा अमित शाहांना सवाल

आधी भ्रष्टाचाराचे शिरोमणी म्हणाले, आता सोबत का घेताय? संजय राऊतांचा अमित शाहांना सवाल

| Updated on: Nov 29, 2026 | 11:01 AM
Share

संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. अमित शहांनी शरद पवारांना भ्रष्टाचाराचे शिरोमणी म्हटले होते, मग आता त्यांची भूमिका का बदलली, असा प्रश्न राऊत यांनी विचारला. डीलिमिटेशन बिल हे लोकशाही गुलाम बनवण्यासाठी आणले असून, उद्धव ठाकरे यांनी याविरोधात ठाम भूमिका घेतल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप करत, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यापूर्वी शरद पवार यांना भ्रष्टाचाराचे शिरोमणी म्हटले होते, मग आता त्यांची भूमिका का बदलली, असा सवाल केला आहे. राऊत यांनी म्हटले की, अमित शहा महाराष्ट्रात येऊन असे बोलले होते आणि आता त्याच शरद पवारांना ते देशहितासाठी एकत्र घेण्याचा प्रयत्न करत आहेत. राऊत यांनी डीलिमिटेशन बिलावरही टीका केली. हे बिल देशातील लोकशाहीला गुलाम बनवण्यासाठी आणले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी यापूर्वी या बिलाला पाठिंबा दिला नव्हता, पण आता अचानक त्यांची भूमिका बदलल्याने लोकांना आश्चर्य वाटले आहे, असे राऊत म्हणाले. मात्र, इंडिया आघाडीने अद्याप लढाई सोडलेली नाही. उद्धव ठाकरे यांनी सर्व दबावाला न जुमानता लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी आपली भूमिका कायम ठेवली आहे, असे राऊत यांनी स्पष्ट केले. त्यांनी भाजपच्या राष्ट्रहिताला गौतम अदानी यांच्या फायद्यापुरते मर्यादित असल्याचे म्हटले आहे.

Published on: Nov 29, 2026 11:01 AM

Follow Us