सावधान! Income Tax वाचवण्यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब कराल तर पकडले जाल; आयकर अधिकारी ‘असा’ घेणार शोध

| Updated on: Mar 19, 2022 | 12:42 PM

तुम्ही देखील टॅक्स (Income Tax) वाचवण्यासाठी चुकीच्या मार्गांचा अवलंब करत आहात का? जर करत असाल तर आजच सावध व्हा, कारण तुम्ही नव्या तंत्रज्ञान प्रणालीमुळे आयकर विभागाच्या नजरेतून सुटू शकत नाहीत. जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने टॅक्स वाचवताना आढळल्यास किंवा टॅक्स (Income Tax Return) बुडवल्याचे समोर आल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते.

सावधान! Income Tax वाचवण्यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब कराल तर पकडले जाल; आयकर अधिकारी असा घेणार शोध
प्रातिनिधीक फोटो
Image Credit source: टीव्ही9
Follow us on

तुम्ही देखील टॅक्स (Income Tax) वाचवण्यासाठी चुकीच्या मार्गांचा अवलंब करत आहात का? जर करत असाल तर आजच सावध व्हा, कारण तुम्ही नव्या तंत्रज्ञान प्रणालीमुळे आयकर विभागाच्या नजरेतून सुटू शकत नाहीत. जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने टॅक्स वाचवताना आढळल्यास किंवा टॅक्स (Income Tax Return) बुडवल्याचे समोर आल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते. आता तुम्ही हा विचार करत असाल की दरवर्षी लाखो लोक कर भरतात, या सर्वांमध्ये आपली टॅक्स चोरी कशी पकडणार? तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात. कारण आता आयकर विभागाने देखील नवे तंत्रज्ञान आत्मसात केले आहे. त्यामुळेच आता आयकर विभागाच्या (Income Tax Department) अधिकाऱ्यांसोबतच तुमच्यावर तंत्रज्ञानाची देखील नजर असणार आहे.

सीबीआय, ईडीसारख्या संस्थांकडून मिळणार माहिती

आयकर विभागाची आयकर न भरणाऱ्या तसेच आयकर वाचवण्यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब करणाऱ्या करदात्यांवर करडी नजर आहे. यासाठी सरकारी अधिकारी ‘इनसाइट’ या पोर्टलचा वापर करत आहेत. जोखीम मापदंडांच्या आधारे, हे पोर्टल प्रचंड डेटामधून कर चुकवणाऱ्यांची नावे काढून आयकर विभागाला पुरवते. बँका, सीबीआय, ईडीसारख्या संस्थांकडून या पोर्टवर डेटा अपलोड करण्यात येतो. या डेटाच्या आधारे आयकर विभागाचे अधिकारी तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात.

आयकर विभागाकडून कर बुडव्यांना नोटीस

दरम्यान आता मार्चएन्ड जवळ येत आहे. या पार्श्वभूमीवर आयकर विभागाचे अधिकारी अधिक सक्रिय झाले असून, ज्यानी टॅक्स भरला नाही, किंवा ज्या व्यक्तीने चुकीच्या मार्गांचा अवलंब करून टॅक्स वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा संशय आहे. अशा करदात्यांना आयकर विभागाकडून नोटीस पाठवण्यास सुरूवात झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून जगावर कोरोनाचे संकट होते. या काळात कर वसुलीवर देखील मोठा परिणाम झाल्याचे समोर आले आहे. आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने जास्तीत जास्त कर संकलनाचे उदिष्ट आयकर विभागाकडून ठेवण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

US Federal reserves च्या व्याज दरवाढीचा भारताला फायदा; रुपयाच्या मुल्यात सुधारणा

Petrol Diesel Price : कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा वाढ; इंधनाचे नवे दर जारी

5.5 लाखांची Hyundai कार 2.5 लाखात खरेदीची संधी, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर