AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5.5 लाखांची Hyundai कार 2.5 लाखात खरेदीची संधी, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

तुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल (Best Deal) माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किंमतीत कार (Budget Cars) खरेदी करु शकाल.

5.5 लाखांची Hyundai कार 2.5 लाखात खरेदीची संधी, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर
Hyundai च्या कार विक्रिला मोठा फटका Image Credit source: hyundai.com
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Mar 19, 2022 | 8:00 AM
Share

मुंबई : तुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल (Best Deal) माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किंमतीत कार (Budget Cars) खरेदी करु शकाल. कोरोना काळात आपल्याकडे स्वतःची वैयक्तिक कार असणे गरजेजे झाले आहे. जर आपण सेकंड हँड कार (Second Hand Car) विकत घेण्याचा विचार करत असाल परंतु बजेटमुळे चिंतेत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार डीलबाबत माहिती देणार आहोत.

आम्ही ज्या कारबद्दल तुम्हाला सांगत आहोत ती कार तुम्ही शोरुममधून खरेदी करण्यासाठी गेलात तर तुम्हाला त्यासाठी 5.3 ते 7 लाख रुपये मोजावे लागतील. त्यामुळे जवळपास अर्ध्या किंमतीत मिळणाऱ्या या कारची डील तुमच्यासाठी परफेक्ट आहे. आज आम्ही तुम्हाला Hyundai i10 या कारच्या एका डीलबाबत माहिती देत आहोत. CarDekho नावाच्या वेबसाइटवर सूचीबद्ध असलेली ही कार 2.54 लाख रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.

कारचे डीटेल्स

Hyundai i10 Magna 1.1L चं हे 2013 मधील मॉडेल असून ही पेट्रोल कार आहे. ही फर्स्ट ओनर कार असून MH04 या आरटीओमध्ये रजिस्टर्ड आहे. यामध्ये 1086 सीसी क्षमतेचं इंजिन देण्यात आलं आहे. यामध्ये मॅन्यूअल ट्रान्समिशनचा पर्याय आहे. ही कार आतापर्यंत 51,971 किमी धावली आहे. ही कार मुंबईत उपलब्ध आहे.

बेनिफिट्स

संबंधित वेबसाईटने ग्राहकांसाठी फ्री आरसी ट्रान्सफरची सुविधा देऊ केली आहे. तसेच 6 महिन्यांसाठी रोडसाईड असिस्टन्सची (6 Months Pan India Road Side Assistance) सुविधादेखील ग्राहकांना मिळेल. कारवर 6 महिन्यांची वॉरंटी आहे (Comprehensive Warranty). जर तुम्हाला ही कार आवडली नाही तर तुम्ही ती 7 दिवसांच्या आत कार परत करुन दिलेले पैसे परत (7 Days Money Back Guarantee) मिळवू शकता. ग्राहक कारदेखो या वेबसाईटवरील मुंबई सेक्शनमध्ये ही कार पाहू शकतात.

महत्त्वाची सूचना : जर आपण ही सेकंड हँड कार घेणार असाल तर सर्व बाजूंनी कार तपासून पाहा. कारचं डेंटिंग आणि पेंटिंग तपासा. कार मालकाचे कागदपत्र तपासा. त्याच वेळी, कार आणि कागदपत्रांची कसून चौकशी केल्यानंतरच ही कार खरेदी करा. तसेच बातमीत दिलेली माहिती ही CarDekho वरुन घेतली आहे.

इतर बातम्या

जुनी वाहनं 8 पट शुल्क भरुन Re register करा, अन्यथा भंगारात काढण्याशिवाय पर्याय नाही

शानदार लूक, ॲडव्हान्स फीचर्ससह Renault Kwid MY22 लाँच, किंमत…

100 फुट लांब कार, हेलिपॅड, गोल्फ कोर्स आणि स्विमिंग पूलसह अनेक सुविधांनी सुसज्ज, गिनीजमध्ये नोंद

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?