Marathi News » Automobile » American dream car worlds longest car restored 100 feet long guinness world records
100 फुट लांब कार, हेलिपॅड, गोल्फ कोर्स आणि स्विमिंग पूलसह अनेक सुविधांनी सुसज्ज, गिनीजमध्ये नोंद
आतापर्यंत तुम्ही अनेक लहान-मोठ्या गाड्या पाहिल्या असतील, त्यापैकी काही रस्त्यांवर पाहिल्या असतील तर काही फोटोंमध्ये. पण कधी तुम्ही 100 फुट लांब कार पाहिली आहे का? सध्या 100 फुटांपेक्षा जास्त लांब कारची जोरदार चर्चा आहे.
आतापर्यंत तुम्ही अनेक लहान-मोठ्या गाड्या पाहिल्या असतील, त्यापैकी काही रस्त्यांवर पाहिल्या असतील तर काही फोटोंमध्ये. पण कधी तुम्ही 100 फुट लांब कार पाहिली आहे का? सध्या 100 फुटांपेक्षा जास्त लांब कारची जोरदार चर्चा आहे. या कारमध्ये केवळ बसण्याची जागा नाही तर हेलिपॅड, गोल्फ कोर्स, स्विमिंग पूल अशा सुविधाही आहेत. या कारची नुकतीच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. अमेरिकन ड्रीम असे या कारचे नाव असून ती 30.54 मीटर म्हणजेच 100 फुटांपेक्षा जास्त लांब आहे.
1 / 5
अमेरिकन ड्रीम ही जगातील सर्वात लांब कार आहे. या कारची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. ही कार 1986 मध्ये बनवण्यात आली होती. कॅलिफोर्नियामध्ये राहणाऱ्या Jay Ohrberg नावाच्या व्यक्तीने ही कार बनवली आहे. आता पुन्हा एकदा अमेरिकन ड्रीम्स चर्चेत आहे.
2 / 5
ही कार पहिल्यांदा 1986 मध्ये तयार करण्यात आली होती, जेव्हा तिची लांबी 60 फूट इतकी होती. ही गाडी अनेक वर्षांपासून जीर्ण अवस्थेत होती. आता एका व्यक्तीने नुकतीच रिडिझाईन केली आहे. त्यानंतर कारने स्वतःचाच विक्रम मोडला. आता पुन्हा एकदा ही कार जगातील सर्वात लांब कार बनली आहे.
3 / 5
या कारची लांबी 100 फूट आहे. या कारच्या दोन्ही बाजूला 26 टायर आणि दोन इंजिन आहेत. ठराविक कार 10 ते 15 फुटांपर्यंत असतात. पण ही कार 100 फुटांची आहे. या कारने सर्व वाहनांचे रेकॉर्ड तोडले आहेत. अमेरिकन ड्रीम्स दोन्ही बाजूंनी चालवता येतात.
4 / 5
ही कार केवळ लांबच नाही तर तिचा एक्सपीरियन्सदेखील चांगला आहे. कारमध्ये फक्त सीट्सच नव्हे तर स्विमिंग पूल, वॉटर बेड, डायव्हिंग बोर्ड, बाथटब, गोल्फ कोर्स, हेलिपॅड देखील आहे. यात 75 लोक बसू शकतात. या हेलिपॅडचे वजन पाच हजार पाऊंडांपर्यंत असू शकते. टीव्ही, फ्रीज, टेलिफोन अशा सुविधाही यात आहेत.