मध्यम वर्गीय कुटुंबात जन्म, अंबानींच्या साम्राज्याला टक्कर ते श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या स्थानी झेप, गौतम अदानींचा प्रवास

| Updated on: Aug 18, 2021 | 7:34 AM

अदानी समूहाचा पोर्टफोलिओ खाण, बंदरे, ऊर्जा संयंत्रांपासून ते विमानतळ, डेटा सेंटर आणि संरक्षण सामग्रीपर्यंत पसरलेला आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान स्वतः देखील मानतात की, भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी या क्षेत्रांवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

मध्यम वर्गीय कुटुंबात जन्म, अंबानींच्या साम्राज्याला टक्कर ते श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या स्थानी झेप, गौतम अदानींचा प्रवास
अदानी समूह
Follow us on

नवी दिल्लीः सुमारे दोन दशके कोळशाच्या व्यवसायात घालवल्यानंतर गौतम अदानी इतर व्यवसायांमध्येही प्रवेश करत आहेत. जीवाश्म इंधनापासून ते सिमेंट उद्योगापर्यंत आता अदानी पायाभूत सुविधांचा राजा होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. अदानी समूहाचा पोर्टफोलिओ खाण, बंदरे, ऊर्जा संयंत्रांपासून ते विमानतळ, डेटा सेंटर आणि संरक्षण सामग्रीपर्यंत पसरलेला आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान स्वतः देखील मानतात की, भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी या क्षेत्रांवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

अदानी समूहाच्या 6 सूचीबद्ध कंपन्यांचे बाजारमूल्य सुमारे 75 अब्ज डॉलर

गेल्या एका वर्षात कोरोना विषाणूच्या साथीच्या काळातही अदानी समूहाच्या 6 सूचीबद्ध कंपन्यांचे बाजारमूल्य सुमारे 75 अब्ज डॉलरने वाढले. 12 महिन्यांत कंपनीची ही सर्वोत्तम कामगिरी मानली जाते. देशातील दोन दिग्गज टाटा समूह आणि मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज देखील अदानीच्या कंपन्यांमध्ये भांडवल गुंतवत आहेत. याशिवाय फ्रान्सच्या सर्वात मोठ्या तेल कंपन्यांपैकी एक टोटल एसई आणि वॉरबर्ग पिंकस एलएलसीनेही अदानीच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलीय.

येत्या काळात अदानींची कमाई आणखी वाढणार?

दोन वर्षापेक्षा कमी वेळात अदानींकडे आता देशातील 7 प्रमुख विमानतळांची कमांड आहे. 2025 पर्यंत त्यांचा अक्षय ऊर्जा व्यवसाय सुमारे 8 पटीने वाढवण्याची त्यांची योजना आहे. काही काळापूर्वी अदानींना श्रीलंकेत बंदर तयार करण्याची जबाबदारी मिळाली. हे काम दुसऱ्या कंपनीच्या सहकार्याने पूर्ण करावे लागले. मार्च महिन्यातच अदानी एंटरप्रायझेसने एका परदेशी कंपनीसोबत देशभरात डेटा सेंटर उघडण्यासाठी करार केला.

पायाभूत क्षेत्रावर अदानींचे विशेष लक्ष

अदानीच्या भविष्यातील योजनांबद्दल तज्ज्ञ म्हणतात की, जोपर्यंत भारत आर्थिक विकास पाहतो, तोपर्यंत अदानी समूहाचा विस्तार सुरू राहील. जागतिक स्तरावरील गुंतवणूकदारांचे लक्ष देखील या कंपनीकडे जाणे आवश्यक आहे. सध्या आर्थिक वाढीच्या दृष्टीने सरकारचे लक्ष पायाभूत क्षेत्रावर आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्येच गौतम अदानी यांनी जेपी मॉर्गन इंडिया शिखर परिषदेत म्हटले होते की, समूह या क्षेत्रात वेगाने काम करत आहे. कंपनी केवळ हजारो लोकांना रोजगार देत नाही, तर भागधारकांना निराश देखील करत नाही.

शेठ चिमणलाल नागिंददास विद्यालयात गिरवले शिक्षणाचे धडे

अदानी यांचा जन्म 24 जून 1962 रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथील शांतीलाल आणि शांती अदानी यांच्याकडे एका जैन कुटुंबात झाला. त्यांना 7 भावंडे आहेत आणि त्याचे वडील गुजरातच्या उत्तर भागातील थरड शहरातून स्थलांतरित झाले होते. त्यांची वडील कापड व्यापारी होते. त्यांचे शिक्षण अहमदाबाद येथील शेठ चिमणलाल नागिंददास विद्यालयात झाले. त्यांनी गुजरात विद्यापीठात वाणिज्य शाखेत पदवीसाठी प्रवेश घेतला, परंतु दुसऱ्या वर्षांनंतर कॉलेज सोडले. अदानी व्यवसायासाठी उत्सुक होते, परंतु वडिलांच्या कापड व्यवसायात त्यांना रस नव्हता.

एका वर्षात 50 अब्ज डॉलर मालमत्ता वाढली

पण आज गौतम अदानी ज्यांनी संपत्तीच्या बाबतीत चीनच्या जॅक माला मागे टाकलेय, त्यांच्या व्यवसायाची सुरुवात अत्यंत बिकट परिस्थितीत झालीय. 1980 च्या दशकात त्यांनी कमोडिटी ट्रेडर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. आज ते सुमारे 56 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह भारतातील दुसरा सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. केवळ गेल्या एका वर्षात त्यांच्या संपत्तीत सुमारे 50 अब्ज डॉलर्सची वाढ झाली. यंदा गौतम अदानींची संपत्ती जगातील कोणत्याही अब्जाधीशांपेक्षा जास्त वाढली.

अदानी राजकीय संबंधांच्या निशाण्यावर

आंतरराष्ट्रीय स्तरावर अदानीचे नाव 2010 मध्ये आले, जेव्हा ते ऑस्ट्रेलियातील कोळसा प्रकल्प सुरक्षित करण्यात यशस्वी झाले. अगदी ग्रेटा थनबर्गनेही पर्यावरणाच्या मुद्द्यांवर त्यांना लक्ष्य केले. मात्र, देशातील विरोधी पक्षांसह एका मोठ्या वर्गाचा आरोप आहे की, 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून अदानींना फायदा झाला. मात्र, त्यांनी हा दावाही फेटाळला.

वाढत्या प्रकल्पांसह वाढते कर्ज

पत बाजारातील चढ -उतारांनी अदानींना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासही मदत मिळाली. गेल्या काही दिवसांपूर्वीच अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने 12 बँकांकडून 1.35 अब्ज डॉलर्सचे कर्ज मंजूर केले. क्रेडिट सुईस ग्रुपचा अंदाज आहे की, अदानी समूहाचे एकूण कर्ज 29 टक्क्यांनी वाढून 24 अब्ज डॉलर झाले. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यानंतर ही वाढ झाली.

कोळशाच्या व्यापाराला धोका

या सगळ्यामध्ये अदानींच्या कोळसा व्यवसायाला सर्वात मोठा धक्का बसण्याची अपेक्षा आहे. खरंतर जगभरातील वित्तीय संस्थांवर जीवाश्म इंधनासारख्या ऊर्जा प्रकल्पांवरील निधी कमी करण्यासाठी दबाव आहे. ऑस्ट्रेलियामध्ये त्यांची 2 अब्ज डॉलर गुंतवणूक अनेक आव्हानांमधून जात आहे.

संबंधित बातम्या

भारतात ई-कॉमर्स मार्केटमध्ये खूप वेगाने वाढ, 2030 पर्यंत बाजार 40 अब्ज डॉलरचा होणार

देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी TCSने इतिहास रचला, बाजारमूल्य थेट 13 लाख कोटींच्या पार

story of gautam adani Born into a middle class family, the rise of Ambani’s empire to second place in the rich list, Gautam Adani’s journey