सरकार शेतकऱ्यांना दरमहा 3000 रुपये देणार, फक्त एवढे छोटे काम करा

| Updated on: Aug 29, 2021 | 1:34 PM

पीएम किसान मानधन योजनेंतर्गत वयाच्या 60 वर्षांनंतर पेन्शनची तरतूद आहे. 18 ते 40 वयोगटातील कोणताही शेतकरी या योजनेत सहभागी होऊ शकतो. भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) या पेन्शन फंडाचे व्यवस्थापन करत आहे.

सरकार शेतकऱ्यांना दरमहा 3000 रुपये देणार, फक्त एवढे छोटे काम करा
पीएम किसान सन्मान निधी
Follow us on

नवी दिल्ली : देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी सरकार अनेक योजना चालवत आहे. यापैकी एक योजना आहे, सरकारची पीएम किसान मान धन योजना. सरकारी नोकऱ्या करणाऱ्या लोकांप्रमाणेच शेतकऱ्यांनाही या योजनेतून दरमहा पेन्शन मिळते. पीएम किसान मानधन योजनेंतर्गत वयाच्या 60 वर्षांनंतर पेन्शनची तरतूद आहे. 18 ते 40 वयोगटातील कोणताही शेतकरी या योजनेत सहभागी होऊ शकतो. भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) या पेन्शन फंडाचे व्यवस्थापन करत आहे.

दरमहा 3000 रुपये पेन्शन मिळवा

या योजनेमध्ये वयानुसार मासिक योगदानावर वयाच्या 60 वर्षांनंतर मासिक पेन्शन 3000 रुपये किंवा 36000 रुपये वार्षिक दिले जातात, यासाठी योगदान दरमहा 55 ते 200 रुपये आहे. आतापर्यंत 21 लाखांहून अधिक शेतकरी या योजनेत सामील झालेत. जाणून घ्या तुम्ही या योजनेचा लाभ कसा घेऊ शकता.

जाणून घ्या ही योजना काय?

18 ते 40 वर्षे वयोगटातील शेतकरी किसान पेन्शन योजनेत सहभागी होऊ शकतात, ज्यांच्याकडे लागवडीसाठी जास्तीत जास्त 2 हेक्टर जमीन आहे. त्यांना किमान 20 वर्षे आणि जास्तीत जास्त 40 वर्षे योजनेंतर्गत सुमारे 55 ते 200 रुपये मासिक योगदान द्यावे लागेल. सरकार या योजनेंतर्गत शेतकऱ्याच्या योगदानाच्या बरोबरीने योगदान दिले जाईल. म्हणजेच जर पीएम किसान खात्यात तुमचे योगदान 55 रुपये असेल, तर सरकार तुमच्या खात्यात 55 रुपये देखील योगदान देईल.

याप्रमाणे मोफत नोंदणी करा

यासाठी शेतकऱ्याला जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला (CSC) भेट देऊन स्वतःची नोंदणी करावी लागेल. यासाठी शेतकऱ्याच्या आधारकार्ड आणि सातबाऱ्याची प्रत घ्यावी लागेल. यासह शेतकऱ्याचे 2 पासपोर्ट आकाराचे फोटो आणि बँकेचे पासबुक देखील आवश्यक असेल. नोंदणीदरम्यान शेतकऱ्याला पेन्शन युनिक नंबर आणि पेन्शन कार्ड दिले जाईल. यासाठी कोणतेही वेगळे शुल्क नाही.

तुम्ही याची सुरुवात कमी रुपयांपासून करू शकता

योगदान शेतकऱ्यांच्या वयावर अवलंबून असते. उदाहरणार्थ, तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी सामील झाल्यास मासिक योगदान 55 रुपये असेल किंवा वार्षिक योगदान 660 रुपये असेल. दुसरीकडे तुम्ही वयाच्या 40 व्या वर्षी सामील झाल्यास तुम्हाला दरमहा 200 रुपये किंवा वार्षिक 2400 रुपये योगदान द्यावे लागतील.

तुम्हाला मध्येच योजना बंद करायची असेल तर

जर एखाद्या शेतकऱ्याला योजना मध्येच सोडायची असेल तर त्याचे पैसे वाया जाणार नाहीत. ती योजना सोडत नाही तोपर्यंत जमा केलेल्या रकमेवर बँकांच्या बचत खात्याइतकेच व्याज मिळेल. जर पॉलिसीधारक शेतकरी मृत्युमुखी पडला तर त्याच्या पत्नीला 50 टक्के रक्कम मिळत राहील.

संबंधित बातम्या

CNG-PNG देखील आजपासून महाग, दिल्लीसह कोणत्या शहरात किती किंमत?

SBI उद्यापासून देतेय 500 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त सोने खरेदीची संधी, हे 6 मोठे फायदे

The government will give Rs. 3000 per month to the farmers, just do such small work