नवी दिल्ली: गॅस सिलिंडर आणि पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) किमतींनंतर सीएनजी (CNG Price hike) आणि पीएनजी (PNG Price hike) च्या किमतीही वाढल्यात. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने आजपासून नवीन किमती जाहीर केल्यात. गौतम बुद्ध नगर (नोएडा), दिल्ली, ग्रेटर नोएडामध्ये ग्राहकांना वाढीव किमतींचे मेसेज मिळू लागले आहेत. याशिवाय आयजीएल (इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड) ने देखील ट्विट करून याबाबत माहिती दिली.
इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL) ने रविवार 29 ऑगस्ट रोजी सकाळी 6 पासून सर्व शहरांमध्ये नवीन दर जारी केलेत. देशाची राजधानी दिल्लीमध्ये सीएनजीची किंमत 45.20 रुपये प्रति किलो आणि पीएनजीची किंमत 30.91 रुपये प्रति एससीएम असेल.
पीएनजीची किंमत स्टँडर्ड क्यूबिक मीटर म्हणून 29.61 रुपये होती, परंतु ती 1.25 रुपयांनी वाढलीय, ज्यामुळे त्याची किंमत 30.86 रुपये स्टँडर्ड क्यूबिक मीटर झालीय. 29 ऑगस्ट 2021 पासून देशातील अनेक राज्यांच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये सीएनजी आणि पीएनजीच्या किमती वाढल्यात. नवीन किमती आज सकाळी 6 वाजल्यापासून लागू झाल्या आहेत. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.
>> दिल्लीमध्ये सीएनजीची किंमत 45.20 रुपये प्रति किलो आणि पीएनजीची किंमत 30.91 रुपये प्रति एससीएम असेल. >> नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये सीएनजीची किंमत 50.90 रुपये प्रति किलो आणि पीएनजीची किंमत 30.86 रुपये प्रति एससीएम असेल. >> गुरुग्राममध्ये PNG ची किंमत प्रति SCM 29.10 रुपये असेल. >> रेवाडीमध्ये PNG ची किंमत प्रति SCM 29.71 रुपये असेल. >> मुझफ्फरनगर, मेरठ आणि शामली येथे सीएनजीची किंमत 58.15 रुपये प्रति किलो असेल. >> मुझफ्फरनगर, मेरठ आणि शामली पीएनजीची किंमत 33.92 रुपये प्रति एससीएम असेल. >> अजमेर, पाली आणि राजस्थानमध्ये सीएनजीची किंमत 59.80 रुपये प्रति किलो असेल. >> कानपूर, फतेहपूर आणि हमीरपूरमध्ये सीएनजीची किंमत 61.40 रुपये प्रति किलो असेल. >> कर्नालमध्ये सीएनजीची किंमत 52.30 रुपये प्रति किलो आणि पीएनजीची किंमत प्रति एससीएम 29.71 रुपये असेल.
संबंधित बातम्या
SBI उद्यापासून देतेय 500 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त सोने खरेदीची संधी, हे 6 मोठे फायदे
LIC ची जीवन अमर पॉलिसी, फीचर्स चेक करा, तुमच्यासाठी किती फायदेशीर?