तरुणांना धाकधूक, भारतात बेरोजगारीचा दर वाढला

| Updated on: Mar 02, 2020 | 7:53 PM

कोरोना व्हायरसमुळे देशात आर्थिक स्थिती कमकुवत झाल्याचा अंदाज लावला जात (Unemployment Rate India) आहे.

तरुणांना धाकधूक, भारतात बेरोजगारीचा दर वाढला
Follow us on

नवी दिल्ली : सेंटर फॉर मॉनिटरींग इंडिया इकोनॉमी (CMIE) ने सोमवारी अर्थव्यवस्थेवरील मंदीचा प्रभाव (Unemployment Rate India) पाहता बेरोजगारीची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी महिन्यात भारतात बेरोजगारीचा दर वाढून 7.78 टक्के झाला आहे.

ऑक्टोबर 2019 च्या तुलनेत हा दर सर्वाधिक आहे. जानेवारी 2020 मध्ये बेरोजगारी दर 7.16 टक्के नमूद करण्यात आला (Unemployment Rate India) आहे.

तर ग्रामीण भागात बेरोजगारीचा दर वाढून फेब्रुवारीमध्ये 7.37 टक्के इतका झाला. हा दर जानेवारीमध्ये 5.97 टक्के इतका होता. तर शहरात हा दर 9.70 टक्क्यांवरुन कमी होऊन 8.65 टक्के झाला.

सेंटर फॉर मॉनिटरींग इंडिया इकोनॉमी (CMIE) ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ग्रामीण आणि शहरी भागातील बेरोजगारीच्या दरातील फरक दिवसेंदिवस वाढत असल्याचे नमूद करण्यात आलं आहे.

विशेष म्हणजे 2019 च्या शेवटच्या तीन महिन्यात भारताची अर्थव्यवस्था सहा वर्षात सर्वाधिक धिम्या गतीने पुढे सरकत आहे. अनेक तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसमुळे देशात आर्थिक स्थिती कमकुवत झाल्याचा अंदाज लावला जात (Unemployment Rate India) आहे.