भारताच्या विकास दरावर ‘संक्रांत’? संयुक्त राष्ट्राच्या अहवालात विकासाला वाकुल्या, इंधनाच्या वाढत्या किंमतींमुळे अपेक्षित दर गाठता येईना 

| Updated on: Jan 14, 2022 | 11:27 AM

संयुक्त राष्ट्रांचा अंदाज आहे की या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर केवळ 6.5% राहील, जो आधी 8.4 टक्के गृहित धरण्यात आला होता. जलद लसीकरण मोहिमा सुरू करून भारत विकासाच्या मार्गावर ठोसपणे जात आहे.  परंतु कोळशाची कमतरता आणि तेलाच्या उच्च किंमती नजीकच्या भविष्यात आर्थिक घाडामोडींवर मोठा परिणाम करणार असल्याचे अहवालात म्हटले आहे. 

भारताच्या विकास दरावर संक्रांत? संयुक्त राष्ट्राच्या अहवालात विकासाला वाकुल्या, इंधनाच्या वाढत्या किंमतींमुळे अपेक्षित दर गाठता येईना 
सांकेतिक फोटो.
Image Credit source: social
Follow us on

चालू आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकास दर 6.5 टक्के असल्याचा अंदाज संयुक्त राष्ट्रांनी ( United Nations ) गुरुवारी व्यक्त केला. वर्षभरापूर्वी वाढीचा दर 8.4 टक्के गृहित धरण्यात आला होता. संयुक्त राष्ट्राने जाहीर केलेल्या जागतिक आर्थिक परिस्थिती आणि संभाव्यता (WESP) अहवालानुसार, कोविड-19 साथीच्या काळात जलद लसीकरण मोहिम सुरू करून भारत विकासाच्या मार्गावर ठोसपणे मार्गाक्रमण करत आहे.

परंतु कोळशाची कमतरता आणि तेलाच्या उच्च किंमतींचा नजीकच्या भविष्यात आर्थिक घाडमोडींवर मोठा परिणाम करु शकतात. 2021-22 मध्ये भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) 6.5 टक्के असेल, जे 2020-21 पेक्षा कमी असेल. येत्या 2022-23 या आर्थिक वर्षात भारताच्या विकास रथाला लगाम बसून तो 5.9 टक्क्यांपर्यंत घसरण्याचा अंदाजही अहवालात नोंदविण्यात आला आहे.

कॅलेंडरची पाने उलटतील तसा भारताचा विकास दर 2021 मधील वृद्धी दर 9 टक्के होता. यंदा हा दर 6.7 टक्के गृहित धरण्यात आला आहे. कोविडचा भारतावरील दुष्परिणाम कमी झाला आहे. लसीकरणाचा वेग उत्तम आहे. आर्थिक परिस्थिती अनुकूल आहे. भारताचे आर्थिक पुनरुजीवन झाले आहे, अशी कौतुकाची थाप टाकत, अहवालात गगनाला भिडलेल्या तेलाच्या किंमती आणि कोळशाची कमतरता यामुळे या विकासाच्या बुलेट ट्रेनला ब्रेक लागण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

2008-09 पेक्षा अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत

अहवालात असे म्हटले आहे की, जेव्हा अर्थव्यवस्थेच्या सध्याच्या स्थितीचा विचार केला जातो, तेव्हा ते 2008-09 मधील मंदीपेक्षा चांगले आहे.बँकांचे आर्थिक आरोग्य राखण्यासाठी सरकार सतत प्रयत्न करताना दिसत आहे.   कर्जाचा बोजा सतत वाढत आहे, ज्यामुळे येत्या काही दिवसांत त्याचा परिणाम नक्कीच दिसून येईल. बेरोजगारीचा भस्मासूर वाढत आहे. . या दोन कारणांमुळे विकासाला धक्का बसला आहे आणि दारिद्र्य कमी होण्यास धक्का बसला आहे.

महागाई नियंत्रणात राहण्याची अपेक्षा

महागाईच्या बाबतीत बोलायचे झाले तर यावर्षी महागाई कमी होऊन सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.  2021 च्या उत्तरार्धापासून महागाई आटोक्यात येण्याची चिन्हे  दिसून येत आहे. महागाई अधूनमधून वाढली तर तो खराब हवामानाचा परिणाम आहे, ज्यामुळे अन्नधान्याची महागाई वाढते. मात्र पुरवठा साखळीतील समस्या, शेतीतील महागाई यांसारख्या मुद्द्यांवरून महागाई उसळी घेण्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

ओमायक्रोन व्हेरिएंटमुळे नुकसान

अहवालात म्हटले आहे की कोरोनाच्या ओमायक्रोन व्हेरियंटमुले जागतिक आर्थिक सुधारणा धोक्यात आली आहे.   त्यामुळे कामगारांची स्थिती बिकट झाली आहे. 2021 मध्ये 5.5 टक्के वाढ नोंद झाल्यानंतर जागतिक उत्पादनात 2022 मध्ये केवळ 4 टक्के आणि 2023 मध्ये 3.5 टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे

इतर बातम्या-

Nashik Corona: बूस्टर डोसच्या नावाखाली सायबर हॅकर्सचा नवा फसवणूक फंडा; तुम्हीही व्हा…!

Pimpri Chinchwad Crime | कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर, पिंपरी चिंचवडमध्ये वर्षभरात खुनी हल्ल्याच्या 122 घटना