Pimpri Chinchwad Crime | कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर, पिंपरी चिंचवडमध्ये वर्षभरात खुनी हल्ल्याच्या 122 घटना

2021 या एका वर्षात खुनाच्या(Attempt Of Murder) प्रयत्नाच्या म्हणजेच 307 च्या 122 घटना घडल्या आहेत. सन 2020 च्या तुलनेत सन 2021 या वर्षात खुनी हल्ल्याच्या घटना जवळपास दुप्पट झाल्या आहेत.

Pimpri Chinchwad Crime | कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर, पिंपरी चिंचवडमध्ये वर्षभरात खुनी हल्ल्याच्या 122 घटना
लग्नाचे रिसेप्शन, वऱ्हाड्यांचा डीजेवर ताल, अचानक तरुण कोसळला

पुणे : जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरात गुन्ह्यांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. येथे मागील वर्षभरात जुनी भांडणे (Clash), आर्थिक वाद, नातेसंबंध, प्रेम, वर्चस्ववाद, हप्तेखोरी अशा विविध कारणांवरून भांडणे झाली आहेत. याच कारणामुळे येथे 2021 या एका वर्षात खुनाच्या(Attempt Of Murder) प्रयत्नाच्या म्हणजेच कलम 307 अंतर्गत येणाऱ्या गुन्ह्याच्या 122 घटना घडल्या आहेत. सन 2020 च्या तुलनेत सन 2021 या वर्षात खुनी हल्ल्याच्या घटना जवळपास दुप्पट झाल्या आहेत. समोर आलेल्या या आकडेवारीमुळे आता पिंपरी चिंचवडमधील कायदा व सुव्यस्थेवर प्रश्न निर्माण झाले आहेत.

2021 या वर्षी खुनाच्या एकूण 122 घटना

पिंपरी चिंचवड या शहराला गुन्हेगारी मुक्त करण्याचा पवित्रा पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी यापूर्वी बोलून दाखवलेला आहे. अवैध धंदे, व्हाईट कॉलर गुन्हेगारी आणि इतर गुन्ह्यांना आवर घालणार असल्याचा विश्वास आयुक्तांनी बोलून दाखवला होता. मात्र येथील प्रत्यक्ष चित्र काहीसे वेगळेच आहे. मागील वर्षभरात गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. स्ट्रीट क्राईममध्येही वाढ झालेली आहे. सोनसाखळी चोरांपासून वाहन चोरांपर्यंत, भंगार चोरांपासून एटीएम चोरांपर्यंत अनेकांची इथे मजल वाढली. या गुन्ह्यांना रोखण्यात पोलिसांना अपयश आले आहे. 2021 या वर्षभरात घडलेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या अनेक घटान घडल्या आहेत. जानेवारी महिन्यात खुनाच्या प्रयत्नाच्या दहा घटना घडल्या होत्या. मार्च महिन्यात अशा 15 घटना घडल्या होत्या. नोव्हेंबर महिन्यात हा आकडा 14 पर्यंत गेला होता. तर 2021 या वर्षी अशा एकूण 122 घटना घडल्याचे समोर आले आहे.

2021 मधील खुनाच्या घटनांची आकडेवारी

जानेवारी–10
फेब्रुवारी – 12
मार्च – 15
एप्रिल – 7
मे – 9
जून – 9
जुलै – 13
ऑगस्ट – 6
सप्टेंबर – 7
ऑक्टोबर – 7
नोव्हेंबर – 14
डिसेंबर – 9

पुण्यात तब्बल164 बलात्काराच्या गुह्यांची नोंद

दरम्यान, पुण्यात विनयभंग, हुंडाबळी, बलात्कारासारख्या प्रकार सातत्त्याने घडत आहेत. या गुन्ह्यातील अनेक आरोपींनी बेड्या ठोकण्यात यश आले आहे. तरीही घटनाचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार गतवर्षी पुण्यात तब्बल164 बलात्काराच्या गुह्यांची नोंद झाल्याची आहे. यामधील सर्व गुन्ह्यांची उकल झाल्याची माहिती आयुक्तालयाने दिली आहे.

इतर बातम्या :

Crime | वसईत वेटर, सुरक्षा रक्षकाचं काम, वेळ येताच करायचे लूटमार; नेपाळी गँगला बेड्या

शिक्षण इंजिनअरिंगचं धंदा चोरीचा, पोलिसांनी धरलं आणि डॉन व्हायचं राहिलं

फॅशन डिझायनरने विणलं बाईक चोरीचं जाळं, चार दुचाकींची ऑनलाईन विक्री, एका मेसेजमुळे भांडाफोड


Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI