AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिग्गज क्रिकेटपटूसोबत मोडला साखरपुडा… 12 वर्ष लहान अभिनेत्यासोबत घटस्फोट… वयाच्या 67 व्या मुलांसोबत एकटीच आयुष्य जगतेय अभिनेत्री

Actress Love Life: दिग्गज क्रिकेटपटूसोबत साखरपुडा मोडताच अभिनेत्रीने 12 वर्ष लहान अभिनेत्यासोबत थाटला संसार... नाही टिकलं लग्न... आज वयाच्या 67 व्या मुलांसोबत एकटीच आयुष्य जगतेय अभिनेत्री... सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा...

दिग्गज क्रिकेटपटूसोबत मोडला साखरपुडा... 12 वर्ष लहान अभिनेत्यासोबत घटस्फोट... वयाच्या 67 व्या मुलांसोबत एकटीच आयुष्य जगतेय अभिनेत्री
Amrita Singh
| Updated on: Feb 09, 2026 | 1:28 PM
Share

Actress Love Life: झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी बॉलिवूडचा एक काळ गाजवला आणि लग्नानंतर गायब झाल्या. असंच काही एका प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रीसोबत देखील झालं आहे. बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर असताना अभिनेत्रीचं नाव दिग्गज क्रिकेटपटूसोबत रंगू लागलं. दोघांचा साखरपुडा झाला पण नातं लग्नापर्यंत पोहचू शकलं नाही.. त्यानंतर अभिनेत्रीने स्वतःपेक्षा 12 वर्ष लहान अभिनेत्यासोबत लग्न केलं. पण अभिनेत्रीचं लग्न देखील फक्त 13 वर्ष टिकलं. घटस्फोटानंतर अभिनेत्रीने दोन मुलांचा सिंगर मदर म्हणून सांभाळ केला.. आज अभिनेत्री वयाच्या 67 व्या वर्षी एकत्र आयुष्य जगत आहे. सध्या ज्या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री अमृता सिंग आहे.

बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री अमृता सिंग आज स्वतःचा 68 वा वाढदिवस साजरा करत आहे. 80 आणि 90 च्या दशकातील अभिनेत्री आज मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. अमृता फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर असताना अमृता हिचं नाव भारताचे माजी क्रिकेटर रवी शास्त्री यांच्यासोबत रिलेशिनशिप होती. रिपोर्टमध्ये दोघांचा साखरपुडा मोडल्याची देखील माहिती समोर आली… एवढंच नाही तर, अमृता हिने स्वतःपेक्षा 12 वर्ष मोठे विनोद खन्ना यांना डेट केलं. तर 12 वर्ष लहान अभनेता सैफ अली खान याच्यासोबत अभिनेत्रीने लग्न केलं.

लग्नानंतर सैफ आणि अमृता यांनी सारा आणि इब्राहिम यांचं जगात स्वागत केलं. करियरच्या शिखरावर असताना अमृता आणि सैफ यांनी गुपचूप लग्न केलं. 1991 मध्ये सैफ याने लग्न केलं. तेव्हा सैफ याने मोठ्या पडद्यावर पदार्पण देखील केलेलं नव्हतं… लग्न झालं तेव्हा सैफ फक्त 20 – 21 वर्षाचा होता. तर अमृता हिचं वय फक्त 32 – 33 वर्ष होतं… पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या 13 वर्षानंतर सैफ आणि अमृता यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2004 मध्ये सैफ आणि अमृता यांनी अधिकृत घटस्फोट झाल्याची घोषणा केली.

अमृता सिंग हिच्या करियरबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने 1983 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बेताब’ सिनेमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. अभिनेता सनी देओल याने सिनेमात मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिलं नाही.

पहिलाच सिनेमा हिट ठरल्यानंतर अमृता हिने मर्द, चमेली की शादी, नाम, खुदगर्ज, ठिकाना, कब्जा, तमाचा, वारिस, तूफान, दिल आशना है, आइना, दुनिया, जादूगर, क्रोध, वीरू दादा, अकेला, आज की आवाज आणि सूर्यवंशी यांसारख्या सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

Follow Us
रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा
रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा.
करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने..
करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने...
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?.
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार.
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते...
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते....
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड.
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं.
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार.
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले.
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?.