AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CSK vs DC Live Streaming : चेन्नईसमोर दिल्लीचं आव्हान, यलो आर्मी घरच्या मैदानात विजयाचं खातं उघडणार?

Chennai Super Kings vs Delhi Capitals IPL 2026 Live Scorecard : चेन्नई सुपर किंग्स 19 व्या मोसमात आपल्या मोहिमेतील चौथा सामना घरच्या मैदानात खेळणार आहे. त्यामुळे चेन्नई घरच्या मैदानात विजयी होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

CSK vs DC Live Streaming : चेन्नईसमोर दिल्लीचं आव्हान, यलो आर्मी घरच्या मैदानात विजयाचं खातं उघडणार?
Chennai Super Kings vs Delhi CapitalsImage Credit source: PTI
| Updated on: Apr 11, 2026 | 2:11 PM
Share

आयपीएल स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघापैकी 1 असलेल्या चेन्नई सुपर किंग्सला 19 व्या मोसमात (IPL 2026) आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. अनुभवी फलंदाज महेंद्रसिंह धोनी याच्या अनुपस्थितीत आणि ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वात चेन्नईने आपल्या मोहिमेतील सलग आणि एकूण 3 सामने गमावले आहेत. आता चेन्नई या हंगामातील चौथ्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध भिडणार आहे. दिल्लीचाही हा चौथा सामना असणार आहे. दिल्लीने 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. तर दिल्लीला शेवटच्या सामन्यात पराभूत व्हावं लागलंय. त्यामुळे दिल्ली कमबॅक करणार की चेन्नई चौथ्या सामन्यात विजयाचं खातं उघडणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामना केव्हा?

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामना शनिवारी 11 एप्रिलला होणार आहे.

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामना कुठे?

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामना एमए चिदंबरम स्टेडियममध्ये होणार आहे.

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर त्याआधी 7 वाजता टॉस होणार आहे.

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामना टीव्हीवर स्टार स्पोट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहता येईल.

चेन्नई दिल्ली विरुद्ध सरस

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यात शनिवारी 11 एप्रिलला होणारा एकूण 32 वा सामना असणार आहे. याआधी उभयसंघात झालेल्या 31 पैकी कोणत्या संघाने सर्वाधिक सामने जिंकले आहेत, हे जाणून घेऊयात. चेन्नईने 31 पैकी 19 सामन्यांमध्ये दिल्लीचा धुव्वा उडवला आहे. तर दिल्लीने 12 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

चेन्नई पॉइंट्स टेबलच्या तळाशी

दरम्यान चेन्नई सुपर किंग्स टीमने पहिले तिन्ही सामने गमावले आहेत. चेन्नई पॉइंट्स टेबलमध्ये शेवटून पहिल्या स्थानी अर्थात 10 व्या क्रमांकावर आहे. चेन्नईचा नेट रनरेट हा -2.517 असा आहे. तर दिल्लीने 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. दिल्लीच्या खात्यात 4 पॉइंट्स आहेत. दिल्लीचा नेट रनरेट हा +0.811 असा आहे.

Follow Us
मला महिला आयोगाची अध्यक्ष करा मग... गिरीजा राऊत प्रकरणी बोलताना करुणा
मला महिला आयोगाची अध्यक्ष करा मग... गिरीजा राऊत प्रकरणी बोलताना करुणा मुंडे हे काय बोलून गेल्या?
सुनेत्रा पवार यांचे अध्यक्षपद अवैध? थेट नोटीस पाठवल्याने एकच खळबळ;
सुनेत्रा पवार यांचे अध्यक्षपद अवैध? थेट नोटीस पाठवल्याने एकच खळबळ; राष्ट्रवादी पक्षातील संघर्ष चव्हाट्यावर?
पेपरफुटीतील एकालाही सोडणार नाही! दादा भुसेंचा मोठा इशारा...
Dada Bhuse | पेपरफुटीतील एकालाही सोडणार नाही! दादा भुसेंचा मोठा इशारा... नेमकं काय म्हणाले?
लग्न झाल्याच्या दीड वर्षातच भयंकर.... एकीकडे लेकीच्या बारशाची लगबग
लग्न झाल्याच्या दीड वर्षातच भयंकर.... एकीकडे लेकीच्या बारशाची लगबग दुसरीकडे आईनं संपवलं जीवन
सुरत बायपासवर मृत्यूचा सापळा! कंटेनरच्या धडकेत 5 वर्षीय चिमुकल्यासह वड
Dhule | सुरत बायपासवर मृत्यूचा सापळा! कंटेनरच्या धडकेत 5 वर्षीय चिमुकल्यासह वडिलांचा मृत्यू
उपसभापतीपदी निवड झाल्यानंतर सचिन अहिरांना शिंदे गटाकडून मोठं गिफ्ट?
मोठी बातमी! उपसभापतीपदी निवड झाल्यानंतर सचिन अहिरांना शिंदे गटाकडून मोठं गिफ्ट? थेट वरळीतच...
देवाभाऊ-शिंदेभाऊंना लाडक्या बहिणींचा खर्च जड झाला का?
देवाभाऊ-शिंदेभाऊंना लाडक्या बहिणींचा खर्च जड झाला का?; सुनेत्रा पवारांना रोहिणी खडसेंचं थेट आवाहन, म्हणाल्या...
सावधान! तुम्ही वापरत असलेलं तेल इतकं अशुद्ध की... FDA च्या कारवाईत
सावधान! तुम्ही वापरत असलेलं तेल इतकं अशुद्ध की... FDA च्या कारवाईत धक्कादायक खुलासा
भररस्त्यात दुचाकीस्वाराच्या डोक्यावर कोसळला बॅनर; अन् पुढे जे घडलं...
थरारक VIDEO! भररस्त्यात दुचाकीस्वाराच्या डोक्यावर कोसळला बॅनर; अन् पुढे जे घडलं...
काँग्रेसला मोठा धक्का? तालुकाध्यक्षांसह 3 नगरसेवक भाजपच्या वाटेवर!
मोठी घडामोड! गोंदियात काँग्रेसला मोठा धक्का? तालुकाध्यक्षांसह 3 नगरसेवक भाजपच्या वाटेवर!