AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Fastest Fifty By Indians In Ipl: आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणाऱ्या 5 भारतीय फलंदाजांपैकी नंबर 1 कोण? युवा फलंदाज वैभव सूर्यवशी याचा कितवा नंबर? जाणून घ्या आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारा भारतीय फलंदाज कोण आहे.

IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?
Vaibhav Sooryavanshi Rajasthan RoyalsImage Credit source: PTI
| Updated on: Apr 11, 2026 | 4:34 AM
Share

राजस्थान रॉयल्सचा युवा सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशी याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध 10 एप्रिलला आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 16 व्या सामन्यात तडाखेदार अर्धशतक झळकावलं आहे. वैभवने गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये अर्धशतक केलं. वैभवने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने विजयासाठी दिलेल्या 202 धावांचा पाठलाग करताना अवघ्या 15 चेंडूत अर्धशतक झळकावलं. वैभवने आरसीबीच्या भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड यासारख्या अनुभवी गोलंदाजांची धुलाई केली.  वैभवने मैदानात चौफेर फटकेबाजी केली. वैभवच्या या अर्धशतकी खेळीनिमित्ताने आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणाऱ्या भारतीय फलंदाजांबाबत जाणून घेऊयात.

वैभवचं दुसरं अर्धशतक

वैभवचं हे 19 व्या मोसमातील दुसरं अर्धशतक ठरलं. वैभवने याआधी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध अर्धशतक लगावलं होतं. विशेष म्हणजे वैभवने चेन्नई विरुद्धही 15 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं होतं. वैभवने यासह खास कामगिरी केली. वैभव आयपीएल स्पर्धेत 2 वेळा 15 किंवा त्यापेक्षा कमी चेंडूत अर्धशतक करणारा फलंदाज ठरला. वैभवने त्याच्या आयपीएल कारकीर्दीत एकूण 3 अर्धशतकं लगावली आहेत.

आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय

  1. यशस्वी जैस्वाल, 13 बॉल, 2023
  2. केएल राहुल, 14 बॉल, 2018
  3. युसूफ पठाण, 15 बॉल, 2014
  4. वैभव सूर्यवंशी, 15 बॉल, 2026
  5. वैभव सूर्यवंशी, 15 बॉल, 2026*
  6. सुरेश रैना, 16 बॉल, 2014

वैभवला आरसीबी विरुद्ध शतक करण्याची संधी होती. मात्र आरसीबीने वैभवला वेळीच आऊट केलं आणि शतकाजवळ जाण्यापासून रोखलं. वैभवने या सामन्यात एकूण 26 चेंडूत 78 धावा केल्या. वैभवने या खेळीत 7 षटकार आणि 8 चौकार लगावले. वैभवने यासह 19 व्या मोसमात द्विशतक पूर्ण केलं. वैभव 19 व्या मोसमात 200 धावा करणारा पहिला फलंदाज ठरला.

यशस्वी जैस्वाल पहिल्या स्थानी

भारताकडून आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रम हा युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल याच्या नावावर आहे. यशस्वीने अवघ्या 13 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलंय. यशस्वीने 2023 साली ही कामगिरी करुन दाखवली होती. वैभवनंतर या यादीत दुसऱ्या स्थानी केएल राहुल विराजमान आहे. केएलने 2018 साली अर्धशतकापर्यंत पोहचण्यासाठी 14 चेंडूंचा सामना केला होता. या यादीत वैभव सूर्यवंशी आणि युसूफ पठाण संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानी आहेत. तर सुरेश रैना चौथ्या क्रमांकावर आहे. रैनाने 2014 साली 16 बॉलमध्ये 50 रन्सचा टप्पा गाठला होता.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...