AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा

Rajasthan Royals vs Royal Challengers Bengaluru Match Result : राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलुरुचा एकतर्फी फरकाने धुव्वा उडवला. राजस्थानने यासह सलग चौथा सामना जिंकण्याची कामगिरी केली आहे.

RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
Vaibhav Sooryavanshi RR vs RCB IPL 2026Image Credit source: PTI
| Updated on: Apr 11, 2026 | 3:55 AM
Share

वैभव सूर्यवंशी याने केलेल्या वादळी खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 16 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्सचा 6 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. आरसीबीने राजस्थानसमोर 202 धावांचं आव्हान ठेवलं होतं. राजस्थानने हे आव्हान 12 बॉलआधी आणि 6 विकेट्स राखून पूर्ण केलं. राजस्थानने 18 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून हे आव्हान पूर्ण केलं. राजस्थानने यासह सलग आणि एकूण चौथा विजय मिळवला आहे. राजस्थान 19 व्या मोसमात सलग 4 सामने जिंकणारी पहिली टीम ठरली. तसेच राजस्थान विरूद्धच्या पराभवामुळे आरसीबीला सलग 2 विजयानंतर पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला.

गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये टॉसआधी आणि टॉसनंतर पावसाने विघ्न घातलं. त्यामुळे सामन्याला तब्बल 70 मिनिटांच्या विलंबाने सुरुवात झाली. सामन्याला 8 वाजून 40 मिनिटांनी सुरुवात झाली. मात्र त्यानंतरही एकही ओव्हर कमी करण्यात आली नाही.

राजस्थानचा फिल्डिंगचा निर्णय

राजस्थानच्या बाजूने टॉसचा कॉल लागला. कॅप्टन रियान पराग याने आरसीबीला बॅटिंगसाठी भाग पाडलं. आरसीबीसाठी कॅप्टन रजत पाटीदार याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. रजतने 40 बॉलमध्ये 63 रन्स केल्या. अनुभवी फलंदाज विराट कोहली याने 16 बॉलमध्ये 32 रन्स केल्या. वेंकटेश अय्यर याने इम्पॅक्ट प्लेअर म्हणून छाप सोडली. वेकंटेशने 15 बॉलमध्ये 29 रन्स केल्या. तसेच इतर फलंदाजांच्या छोटेखानी खेळीमुळे आरसीबीला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 201 धावांपर्यंत पोहचता आलं.

तर राजस्थानच्या जोफ्रा आर्चर, रवी बिश्नोई आणि ब्रिजेश शर्मा या तिघांनी बंगळुरुच्या प्रत्येकी 2-2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर संदीप शर्मा आणि रवींद्र जडेजा या दोघांनी 1-1 विकेट घेतली.

राजस्थानची बॅटिंग

राजस्थानसाठी यशस्वी जैस्वाल याने 13 धावांचं योगदान दिलं. यशस्वीच्या रुपात राजस्थानने पहिली विकेट गमावली. त्यानंतर वैभव सूर्यवंशी याने ध्रुव जुरेल याच्यासोबत आरसीबीच्या गोलंदाजांची धुलाई केली.

वैभवने फक्त 26 चेंडूत सामना राजस्थानच्या बाजूने फिरवला. वैभवने 78 रन्स केल्या. वैभवने 26 बॉलमध्ये 8 फोर आणि 7 सिक्स लगावले. त्यामुळे सामना एकतर्फी झाला. वैभव आणि ध्रुव या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 108 रन्स जोडल्या. ध्रुवनेही तडाखेदार खेळी केली. ध्रुवने 43 बॉलमध्ये नॉट आऊट 81 रन्स केल्या. ध्रुवने या खेळीत 8 चौकार आणि 3 षटकार लगावले. तसेच रवींद्र जडेजा याने बॉलिंगनंतर बॅटिंगनेही दम दाखवला. जडेजाने 25 बॉलमध्ये नॉट आऊट 24 रन्स करत राजस्थानला विजयापर्यंत पोहचवलं.

स्कोअरकार्ड

राजस्थानची पहिल्या स्थानी झेप

दरम्यान राजस्थानला सलग चौथ्या विजयामुळे दुहेरी फायदा झाला आहे. राजस्थानने विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...