AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Crime | वसईत वेटर, सुरक्षा रक्षकाचं काम, वेळ येताच करायचे लूटमार; नेपाळी गँगला बेड्या

लूटमार करणाऱ्या एका नेपाळी गँगचा पर्दाफाश करण्यात आला आहे. वसई परिसरात या चोरांनी धूमाकुळ घातला होता. या गँगमधील 3 जणांना नेपाळ-भारत सीमेवर अटक करण्यात आले आहे. वसईतील माणिकपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही कारवाही केली आहे.

Crime | वसईत वेटर, सुरक्षा रक्षकाचं काम, वेळ येताच करायचे लूटमार; नेपाळी गँगला बेड्या
सांकेतिक फोटो
| Edited By: | Updated on: Jan 14, 2022 | 6:43 AM
Share

पालघर : सोसायटी, कंपनी व इतर ठिकाणी सुरक्षा रक्षक, हॉटेल वेटर म्हणून नोकरी करत, त्याच ठिकाणी लूटमार करणाऱ्या एका नेपाळी गँगचा पर्दाफाश करण्यात आला आहे. वसई परिसरात या चोरांनी धूमाकुळ घातला होता. या गँगमधील 3 जणांना नेपाळ-भारत सीमेवर अटक करण्यात आले आहे. वसईतील (Vasai) माणिकपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही कारवाही केली आहे. नेपाळ (Nepal) बॉर्डरवर अटक करून, या गॅंगला वसईत आणून तात्काळ न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने अटक केलेल्या आरोपींना 20 जानेवारीपर्यंत पोलीस (Police) कोठडी सुनावली आहे. या गॅंगकडून घरफोडीतील 124 ग्रॅम सोन्याचे दागिने, 6 हजार 800 रोख रक्कम, 3 मोबाईल फोन असा 5 लाख 24 हजार 480 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत जप्त करण्यात आला आहे.

सीसीटीव्हीमध्ये सुरक्षा रक्षक आणि साथीदार कैद झाले

मिळालेल्या माहितीनुसार धरमराज दयाराम ढकाल उर्फ शर्मा, राजेश पदम जोशी उर्फ तप्तराज पदमराज देवेकोटा, अर्जुन उर्फ नरेश धरमराज ढकाल असे अटक केलेल्या नेपाळी गॅंगमधील सराईत चोरट्यांची नावे आहेत. मागच्या आठवड्यात 7 जानेवारीला वसईच्या सनसिटी परिसरात रात्रीच्या वेळी घरफोडी झाली होती. याचा माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात पोलिसांना सीसीटीव्ही मिळाला होता. या सीसीटीव्हीमध्ये त्याच सोसायटी मधील सुरक्षा रक्षक आणि त्यांचे इतर साथीदार कैद झाले होते. पोलिसांनी सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक बाबींच्या आधारे आरोपीच्या तपासासाठी पथक रवाना केले होते.

पोलिसांनी उत्तर प्रदेश, नेपाळच्या सीमेवर सापळा रचला

या पथकाने तपास केला असता यातील आरोपी हे नेपाळच्या दिशेला रवाना झाले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर या पथकाने तत्काळ उत्तर प्रदेश आणि नेपाळच्या सीमेवरील रुपईडिहा चेक पोष्टवर सापळा लावला. तसेच तपासणी केली असता तीन आरोपींना मुद्देमालासह 10 जानेवारी रोजी रंगेहाथ अटक करण्यात पोलिसांना यश आले. या आरोपींना वसईत आणून न्यायालयात हजर केले असता 20 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सीमेपलीकडे जाण्याआधी पोलिसांनी बेड्या ठोकल्या 

अटक करण्यात आलेली गँग सोसायटी, कंपनी, व अन्याठिकाणी सुरक्षा रक्षक तसेच हॉटेलमध्ये वेटरचे काम करून त्या परिसराची सर्व माहिती काढायची. तसेच संधी मिळताच आपल्या सहकाऱ्यांमार्फत घरफोडी करून नेपाळला फरार होत होती. एकदाच नेपाळची बॉर्डर क्रॉस केली की त्यांना पकडणे पोलिसांना आव्हानात्मक व्हायचे. पण नेपाळ बॉर्डर क्रॉस करण्याआगोदरच माणिकपूर पोलिसांनी यांचा भंडाफोड केल्याने एक मोठी टोळी पोलिसांच्या हाताला लागली आहे. यांच्याकडून आणखी गुन्हे उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

इतर बातम्या : बिल्डरला मागितली तब्बल दोन कोटींची खंडणी, अटक केलेला खंडणीखोर कोण?

शिक्षण इंजिनअरिंगचं धंदा चोरीचा, पोलिसांनी धरलं आणि डॉन व्हायचं राहिलं

अहमदनगरमधील शिवसैनिकांची दुहेरी हत्या, कर्डिलेंची कन्या सुवर्णा कोतकरांना अटकपूर्व जामीन

मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.