AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अर्ध्या रात्रीही यॉर्कर टाकू शकतोस! सिराजने असं म्हणताच बुमराहने दिलं मन जिंकणारं असं उत्तर

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड भिडणार आहे. या सामन्यात क्रीडाप्रेमींचं लक्ष हे जसप्रीत बुमराहकडे असणार आहे. कारण उपांत्य फेरीत त्याच्या दोन षटकांमुळे सामन्याचं चित्र बदललं होतं. असं असताना या सामन्यापूर्वी सिराजने त्याचा सराव पाहून विचारलं आणि त्यावर बुमराहने उत्तर दिलं.

अर्ध्या रात्रीही यॉर्कर टाकू शकतोस! सिराजने असं म्हणताच बुमराहने दिलं मन जिंकणारं असं उत्तर
अर्ध्या रात्रीही यॉर्कर टाकू शकतोस! सिराजने असं म्हणताच बुमराहने दिलं मन जिंकणारं असं उत्तरImage Credit source: PTI
| Updated on: Mar 07, 2026 | 6:02 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. भारतीय संघ जेतेपदापासून फक्त एक पाऊल दूर आहे. भारताने हा सामना जिंकताच सलग जेतेपद मिळवणारा पहिला संघ ठरेल. असं असताना या सामन्यात टीम इंडियासाठी काही खेळाडू महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. यात जसप्रीत बुमराहचं नाव आघाडीवर आहे. खरं तर जसप्रीत बुमराह भारतीय गोलंदाजीचा कणा आहे. त्याच्याशिवाय दुसरा कोणाचा विचार करणं म्हणजे कठीण आहे. जसप्रीत बुमराहचे  षटकं विरोधी संघांना कायम डोकेदुखी ठरतात. त्यामुळेच जसप्रीत बुमराहचा जगभरात डंका आहे. असं असूनही जसप्रीत आजही 16 वर्षांच्या अकादमीतील मुलासारखा सराव करतो. त्यामुळे त्याच्या यशात सातत्य आहे आणि जगभरातील दिग्गज फलंदाज त्याचा सामना करताना घाबरतात.

अहमदाबादमध्ये सुपर 8 च्या टप्पा सुरू होण्यापूर्वी जसप्रीत बुमराह अहमदाबादमध्ये सराव करत होता. त्याने क्रीजजवर दोन बूट ठेवले होते आणि त्यांना लक्ष करून 45 मिनिटं यॉर्करचा सराव करत होता. मोहम्मद सिराजने हा सराव पाहिला आणि बुमराहला मिश्किलपणे म्हणाला की, ‘भावा, तुला यॉर्करचा सराव करण्याची काय गरज? तू अर्ध्या रात्रीही झोपेतून उठून परफेक्ट यॉर्कर टाकू शकतोस.’ सिराजने असं सांगितल्यानंतर बुमराह हसला आणि पुढचा चेंडू यॉर्कर टाकत बूट उडवलं. त्यानंतर बुमराहा म्हणाला की, याची खूप गरज आहे मित्रा…

जसप्रीत बुमराह आता 32 वर्षांचा आहे. गेल्या काही वर्षात दुखापतीने त्रस्तही झाला. शस्त्रक्रिया पार पडली आणि त्यातून सावरून पुन्हा एकदा मैदानात परतला आहे. त्याच्या गोलंदाजीत कोणतीच उणीव दिसत नाही. उलट बुमराह आणखी घातक दिसत आहे. वर्ल्डकपच्या सुरूवातीच्या टप्प्यात सराव सुरू असताना इशान किशनच्या पायाच्या बोटावर चेंडू जोरात लागला होता. त्यामुळे त्याला सराव अर्धवट सोडावा लागला होता. यावरून बुमराहच्या यॉर्करची ताकद दिसून येते. आता बुमराहने अंतिम सामन्यात अशीच कामगिरी करावी आणि संघाला जेतेपद मिळवून द्यावं अशी तमाम क्रीडाप्रेमींची इच्छा आहे.

Follow Us
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले –राऊतांचा संतापजनक दावा
50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Sanjay Raut On Shiv Sena Crisis | 50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; शिवसेना वर्धापन दिनी संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत
Best Bus Employee Strike | मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत, बस सेवा पूर्ण ठप्प
ना ठाकरे... ना शिंदे! बाळासाहेबांचा फोटो टाकून त्या खासदारांनी वाढवला
ना ठाकरे... ना शिंदे! बाळासाहेबांचा फोटो टाकून त्या खासदारांनी वाढवला मोठा सस्पेन्स
वारसा विचारांचा, हीरक महोत्सव शिवसेनेचा; ठाकरे-शिंदे काय बोलणार?
वारसा विचारांचा, हीरक महोत्सव शिवसेनेचा; वर्धापन दिनी ठाकरे-शिंदे काय बोलणार?
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है
Omraje Nimbalkar | खासदार ओमराजेंबबात मोठी अपडेट समोर; थेट पुण्यातील
Omraje Nimbalkar | खासदार ओमराजेंबबात मोठी अपडेट समोर; थेट पुण्यातील निवसस्थानी... राजकारणातील हालचालींना वेग
अखेर प्रीति झिंटाला डिपफेक प्रकरणी मोठा दिलासा, कोर्टाने थेट परवानगी..
अखेर प्रीति झिंटाला डिपफेक प्रकरणी मोठा दिलासा, कोर्टाने थेट परवानगी दिली; आता अभिनेत्री...
मोठी बातमी! सही न करणारे खासादार ठाकरेंसोबत? बैठकीतून फोन लावला अन्...
मोठी बातमी! सही न करणारे खासादार ठाकरेंसोबत? बैठकीतून फोन लावला अन्... 'ऑपरेशन टायगर'बाबत मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली म्हणूनच...
बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली म्हणूनच...; खासदार फुटीनंतर दादा भुसेंचं मोठं विधान