AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

झुकेगा नही साला… 100 कोटीच्या ऑफरवर पाणी सोडले, ढाण्यावाघ शहरात येताच तुफान जल्लोष; निष्ठावंताला सैनिकांचा सलाम

राजाभाऊ वाजे यांनी सहा खासदारांच्या बंडखोरीनंतरही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबतची निष्ठा कायम ठेवली. कोट्यवधी रुपयांची आणि विकासकामांची ऑफर असूनही वाजे यांनी ती नाकारली, 'शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंसोबतच' राहण्याचा निर्धार केला. त्यांच्या या भूमिकेमुळे ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला असून नाशिकमध्ये त्यांचे जल्लोषी स्वागत झाले.

झुकेगा नही साला... 100 कोटीच्या ऑफरवर पाणी सोडले, ढाण्यावाघ शहरात येताच तुफान जल्लोष; निष्ठावंताला सैनिकांचा सलाम
राजाभाऊ वाजे यांचं जल्लोषात स्वागत
| Updated on: Jun 19, 2026 | 11:58 AM
Share

ठाकरेंच्या शिवसेनेतील 6 खासदारांच्या बंडामुळे पक्षाला मोठं भगदाड पडलं. शिवसेनेचया 60 व्या वर्धापन दिनाच्या आधीच घडलेल्या या राजकीय नाट्यामुळे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. सहा खासदारांनी शिवसेना शिंदे गटाकडे कूच केल्यामुळे ठाकरे गट अचडणीत सापडलेला असून सध्या राज्यभरात या ऑपरेशन टायगरची प्रचंड चर्चा सुरू आहे. या राजकीय वादळामुळे मोठी पडझड झालेली असतानाच एक असा खासदार मात्र होता जो समोर आलेली सगळी आमिषं, सगळी लालूच झुगारून आपल्याच पक्षासोबत ठाम उभा राहिला. ते म्हणजे राजाभाऊ वाजे…

कोट्यवधी रुपयांची, विकासकामांची ऑफर मिळूनही राजाभाऊ वाझे यांनी शिंदे गटात जाण्यास नकार दिला आणि त्यामुळे आता शिवसेना ठाकरे गटात अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे हे तीन खासदार आहेत.

काल दिल्लीत शिवसेनेची संसदीय दलाची बैठक झाली तेव्हा संजय राऊत यांच्यासह हे तीन खासदारच होते. बंडखोर खासदारांना व्हीप बजावूनही ते बैठकीला न आल्याने शिवसेना ठाकरे गटातील फूट स्पष्ट झाली. मात्र सध्या या खासदारांपेक्षा जास्त चर्चा आहे ती राजाभाऊ वाजे आणि त्यांच्या निष्ठेची. कालच्या बैठकीनंतर वाजे हे नाशिकमध्ये परतले असून त्यांचे नाशिक स्थानकावर जोरदार स्वागत करण्यात आले. फुलांचा, पाकळ्यांचा वर्षाव, औक्षण करून सस्मितवदनाने समर्थकांनी त्यांचे स्वागत केले. वाजे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच थांबण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष बघायला मिळाला.

शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंसोबतच

आपण शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार असून कोणत्याही परिस्थितीत पक्ष सोडणार नाही, असं राजाभाऊ वाजे यांनी ठामपणे सांगितलं होतं. ऑपरेशन टायगर हे गेल्या तीन-चार महिन्यापासून राबवलं जात असल्याचा गौप्यस्फोट त्यांचे वडील प्रकाश वाजे यांनी केला होता. 14 एप्रिल रोजी राजाभाऊ वाजे यांच्या घरी एक कमिटी येऊन गेली. या कमिटीने पन्नास कोटी रुपयांसह मतदारसंघात 100 कोटींच्या विकास कामांची ऑफर दिल्याचा दावा राजभाऊ वाजे यांच्या वडिलांनी केला. मात्र राजाभाऊ वाजे यांनी या ऑफरला ठाम नकार दिला. मी उद्धव ठाकरेंसोबतच राहणार असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

स्टेशनवर जंगी स्वागत

काल दिल्लीत ससंदीय दलाची बैठक झाली त्यानंतर राजाभाऊ वाजे आज नाशिकमध्ये परतले. त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेसबतच राहण्याचा निर्णय घेतला. त्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचे पदाधिकारीय, कार्यकर्ते खुश होते, समाधानी होते. निशाक स्टेशनवर त्यांचा जल्लोष, उत्साह बघायला मिळाला. त्यांनी वाजे यांचं जोरदार स्वागत केले, ढोलताशांच्या गजराता, फुलांच्या पाकळयांचा वर्षाव करून,औक्षण करत, हसत त्यांचं स्वागत करण्यात आलं. बंडखोर खासदारांसोबत न जाता, ठाकरेंसोबत राहण्याच्या त्यांच्या निर्णयाने कार्यकर्ते खूप खुश दिसले . राजाभाऊ वाजे यांचा विजय असो, विजय असो अशो घोषणांनी स्टेशन परिसर दुमदुमून गेला होता.

सर्व लहानथोर लोकांमुळे मी निवडून आलोय, ज्या विचारधारेमुळे मी निवडून आलोय, त्या विचारधारेशी मी प्रामाणिक आहे. जो निर्णय मी घेतला तो योग्य आहे, असं मला वाटतं. मी प्रामाणिकपणे माझं करतोय, शिवसैनिकांचं माझयाव प्रेम होतंच, ते आता वाढलंय अशा शब्दां वाजे यांनी नाशिकमध्ये आल्यावर त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं