AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदेंना वाराणसीत मोठा सन्मान; 'सनातन मार्तंड' पुरस्काराने गौरव, धर्मध्वजा धारक उपाधीही बहाल!

एकनाथ शिंदेंना वाराणसीत मोठा सन्मान; ‘सनातन मार्तंड’ पुरस्काराने गौरव, धर्मध्वजा धारक उपाधीही बहाल!

| Updated on: Nov 05, 2026 | 7:48 AM
Share

वाराणसी येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सनातन मार्तंड पुरस्कार प्रदान करण्यात आला. अखिल भारतीय संत समिती आणि गंगा महासभेनं हा सन्मान केला. धर्मरक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहण्याचा निर्धार शिंदे यांनी व्यक्त केला. त्यांना धर्मध्वजा धारक ही उपाधीही बहाल करण्यात आली.

वाराणसी येथील संस्कृती संसद कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सनातन मार्तंड या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अखिल भारतीय संत समिती आणि गंगा महासभेकडून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या समारंभात शिंदे यांना धर्मध्वजा धारक ही उपाधी देखील बहाल करण्यात आली. पुरस्कार स्वीकारताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धर्म, गौ सेवा, तीर्थक्षेत्रांचा विकास आणि सनातन संस्कृतीच्या संरक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहण्याचा दृढ निर्धार व्यक्त केला.

“मी सर्वांना विश्वास देतो की, धर्म, गौ सेवा, तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी आणि सनातन संस्कृतीच्या संरक्षणासाठी मी माझ्या शरीरातील रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत समर्पित राहीन,” असे शिंदे म्हणाले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय असा उद्घोष केला. काशी आणि महाराष्ट्राचे नाते केवळ भौगोलिक नसून ते शतकानुशतके जुने आध्यात्मिक आणि सांस्कृतिक नाते असल्याचेही त्यांनी नमूद केले. हा सन्मान महाराष्ट्राच्या राजकीय आणि सांस्कृतिक परंपरेला वाराणसीच्या भूमीवर पुन्हा अधोरेखित करतो.

Published on: Nov 05, 2026 07:46 AM

Follow Us