AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेग्नंट असताना धनश्रीला चहलने फसवले? महवशने सीक्रेटच सांगून टाकलं, नेमकं काय म्हणाली?

RJ महवशने युजवेंद्र चहलवर प्रेग्नंट धनश्रीला धोका देण्याचा आरोप केला आहे? सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ मागील सत्य काय आहे?

प्रेग्नंट असताना धनश्रीला चहलने फसवले? महवशने सीक्रेटच सांगून टाकलं, नेमकं काय म्हणाली?
RJ MahvashImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 05, 2026 | 9:07 AM
Share

अभिनेत्री आणि माजी रेडिओ जॉकी आरजे महवश ही क्रिकेटपटू युजवेंद्र चहलमुळे कायमच चर्चेत राहिली आहे. युजवेंद्र चहलने धनश्री घटस्फोट दिल्यानंतर अनेकदा महवश ही चहसोबत दिसली. त्यामुळे अनेकांनी ती चहलची गर्लफ्रेंड असल्याचे म्हटले. मात्र, नंतर ती चहलची जवळची मैत्रीण असल्याचे स्पष्ट झाले. आता महवशने नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत धक्कादायक विधान केले आहे. ते ऐकून सर्वजण चकीत झाले आहेत.

आरजे महवशने म्हटलं का की क्रिकेटर युजवेंद्र चहलने एक्स-वाइफ धनश्रीला ती प्रेग्नंट असताना फसवले? खरंतर महवशने कोणाचेही नाव न घेता हे विधान केले होते. पण सर्वांनी याचे कनेक्शन चहशली जोडले आहे. चहलची मैत्रीण असलेल्या महवशने नाव न घेता खरंच क्रिकेटरची पोल खोल केली आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

महवशने नुकताच एका पॉडकास्टमध्ये खासगी आयुष्यावर वक्तव्य केले. ती व्हिडीओमध्ये बोलत आहे की, “तुम्ही विचारही करू शकत नाही की देवाने तुम्हाला कशापासून वाचवले आहे. त्या माणसाचं लग्न झालं आणि त्याचा लवकरच घटस्फोटही झाला. कारण त्याने आपल्या प्रेग्नंट पत्नीला धोका दिला” असे महवश म्हणाली. महवशच्या या वक्तव्याचे युजर्स युजवेंद्र चहल आणि धनश्रीशी कनेक्शन जोडत आहेत. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करून असे म्हटले जात आहे की महवशने नाव न घेता आधीच चहलची पोल उघड केली होती. चहलने धनश्रीला प्रेग्नंट असताना फसवले. म्हणूनच त्यांचा घटस्फोट झाला.

महवशच्या विधानाचं पूर्ण सत्य काय आहे?

खरं तर, महवशच्या बोलण्याची ही क्लिप पिंकविलाला दिलेल्या इंटरव्ह्यूमधली आहे. त्यात ती युजवेंद्र आणि धनश्रीबद्दल बोलत नव्हती. महवशने आपल्या पहिल्या लव्ह रिलेशनशिपचा उल्लेख करताना ही गोष्ट सांगितली होती.

महवशने हार्टब्रेकचा उल्लेख करताना सांगितलं की, “मी ज्याच्यावर प्रेम केलं होते त्याला मिळवण्यासाठी मी घरातल्यांशी खूप भांडले होते. मी म्हटलं होतं की मी घरातून पळून जाईन जर माझं त्याच्याशी लग्न झाला नाही तर. पण माझे पालक खूप शिकलेले आहेत, ते इतक्या लवकर माझ्या लग्नाला तयार नव्हते. मला वाटायचं माझं जग फक्त याच माणसाभोवती आहे, हाच माझ्यासाठी योग्य माणूस आहे. मी इतकी उतावळी झाले होते की काहीही करायला तयार होते.”

महवशने पुढे सांगितलं की त्यांची भेट फेसबुकच्या माध्यमातून झाली होती, तेव्हा ती फक्त १९ वर्षांची होती. पण तो माणूस योग्य नव्हता, तो फसवणूक करणारा होता. महवश म्हणाली की, “मी त्याला पहिल्यांदा माफ केलं, मग दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, मग वाटलं मी लूपमध्ये अडकले आहे. ही तर त्याची सवय आहे. किती हॉस्पिटलला जाऊ आणि किती थेरपिस्टला भेटले. मला पॅनिक अटॅक येत होते. त्यामुळे कितीवेळा अॅडमिट व्हायचं. सहन करत करत थकले होते, मग संबंध संपवले.”

यानंतर महवशने या तुटलेल्या रिलेशनशिप आणि त्या एक्स-बॉयफ्रेंडचा उल्लेख करताना म्हटलं की, “पण वरच्या देवाने तुम्हाला कशापासून वाचवलं आहे. त्या माणसाचं लग्न झालं आणि त्याचा लगेचच घटस्फोटही झाला. कारण त्याने आपल्या प्रेग्नंट पत्नीला फसवले. देव तुम्हाला कशापासून वाचवत असतो, ते तुम्हाला कळत नाही. ज्याचं ते पॅटर्न असतं तो बदलत नाही. जो चीटर आहे तो चीटरच राहतो.”

Follow Us
सांगली जिल्हा बँकेच्या निकालानंतर जयंत पाटील-पडळकर एकाच मंचावर
Sangli Padalkar Vs Patil : सांगली जिल्हा बँकेच्या निकालानंतर जयंत पाटील- गोपीचंद पडळकर एकाच मंचावर
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत सुप्रिया सुळेंनी दिली अपडेट! पुढील चेकअप...
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत सुप्रिया सुळेंनी दिली अपडेट! पुढील चेकअपसाठी ब्रीच कॅंडी रुग्णालयात
ट्रम्प यांच्या पराभवावर बराक ओबामा यांची मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाले
ट्रम्प यांच्या पराभवावर बराक ओबामा यांची मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाले, हा विजय...
ऊसाला 4200 रुपये दर द्या, अन्यथा सातारा, सांगली आणि कोल्हापूर बंद! राज
ऊसाला 4200 रुपये दर द्या, अन्यथा सातारा, सांगली आणि कोल्हापूर बंद! राजू शेट्टींचा सरकारला इशारा
एकनाथ शिंदेंना वाराणसीत मोठा सन्मान; 'सनातन मार्तंड' पुरस्काराने गौरव,
एकनाथ शिंदेंना वाराणसीत मोठा सन्मान; 'सनातन मार्तंड' पुरस्काराने गौरव, धर्मध्वजा धारक उपाधीही बहाल!
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय....
Sharad Pawar Health Update : शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय तपासण्या सुरू
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
Shiv Sena Symbol Row : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
Payal Zambare Case : पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित....
Umesh Patil On Rohit Pawar : आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित पवारांना थेट सवाल
राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या....
NCP Meeting Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या खात्यांबाबत उपस्थित केले प्रश्न