AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE : मोदींनी IDBI बँक विकली, तसं माझ्या देवेंद्र दादांना गोकुळ..काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूरांचा सवाल

| Updated on: Nov 05, 2026 | 9:07 AM
Share

Maharashtra News LIVE : आधीच दुष्काळाच्या संकटात असलेले शेतकरी बांधव पुन्हा एकदा संकटात सापडले असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. कारण जालना जिल्ह्यात निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे अनेक ठिकाणी तुर पिकावर बुरशी,अळी आणि कीड रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने सध्या शेतकरी बांधव चिंतेत आहे.

Maharashtra News LIVE : मोदींनी IDBI बँक विकली, तसं माझ्या देवेंद्र दादांना गोकुळ..काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूरांचा सवाल
Breaking News

LIVE NEWS & UPDATES

  • 05 Nov 2026 09:07 AM (IST)

    जिल्हा परिषद निवडणुकीआधीच महायुतीत राजकीय फूट पडण्याची चिन्हे

    नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकीआधीच महायुतीत राजकीय फूट पडण्याची चिन्हे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत. जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीचे तिन्ही घटक पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकण्याची शक्यता. महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. निवडणुकीआधीच राजकीय संघर्षाला सुरुवात.

  • 05 Nov 2026 09:06 AM (IST)

    अंधेरी स्थानकात महिला प्रवासी TC ला चावली

    अंधेरी स्थानकात तिकीट तपासनीसाचा महिला प्रवाशाने चावा घेतला. विरारकडे जाणाऱ्या लोकलमध्ये तिकीट तपासणीदरम्यान घटना. 510 रुपयांचा दंड आकारल्यानंतर वाद झाल्याचा आरोप. 42 वर्षीय तिकीट तपासनीसाच्या हाताचा चावा घेतला आणि ओरखडे काढले.

  • 05 Nov 2026 09:04 AM (IST)

    दिया मिर्झाचा सोशल मीडिया हँडलवर व्हिडिओ कधी अपलोड होणार?

    दिवाळी जनजागृतीचा दिया मिर्झाचा व्हिडिओ पुन्हा अपलोड करण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश. तीन नोव्हेंबरला न्यायालयाने BMC ला व्हिडिओ पुन्हा पोस्ट करण्याचे आदेश दिले होते. मात्र पाच नोव्हेंबर उजाडला तरी पालिकेच्या सोशल मीडिया हँडलवर व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला नाही. भाजप नेत्यांच्या विरोधानंतर BMC ने हा व्हिडिओ हटवला होता.व्हिडिओ हटवण्याच्या निर्णयावर मुंबई हायकोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

  • 05 Nov 2026 09:02 AM (IST)

    डोंबिवलीत कोयता गँगची दहशत

    डोंबिवली पूर्वेतील पाथर्ली परिसरात कोयता गँगची दहशत पाहायला मिळाली आहे. हॉर्न वाजवण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून चार जणांनी दोन तरुणांवर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात रुपेश कांबळे आणि प्रशांत जाधव हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे, हल्ल्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

  • 05 Nov 2026 09:00 AM (IST)

    मोदींनी IDBI बँक विकली, तसं माझ्या देवेंद्र दादांना गोकुळ..काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूरांचा सवाल

    कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच ‘गोकुळ’ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून आणि राजकीय घडामोडींवरून सध्या मोठे राजकारण सुरू आहे. यावर काँग्रेसचे नेत्या यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र दादा कमाल आहे तुमची आणि आदरणीय पंतप्रधान साहेबांची पण कमाल आहे. आदरणीय पंतप्रधान साहेबांनी आयडीबीआय बँक विकली आणि माझ्या देवेंद्र दादांना तसं तुम्हाला गोकुळ विकायची आहे का ? काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा सवाल

साताऱ्यातील नागठाणे येथे राष्ट्रीय महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चक्काजाम आंदोलन मागील 45 तासापासून सुरू आहे. मात्र अजूनही ऊस दराबाबत तोडगा निघालेला पाहायला मिळत नाही. यामुळे पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. प्रशासनासोबत झालेली बैठक काल निष्कळ ठरल्यामुळे आज पुन्हा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात तीन शेतकऱ्यांचा बळी घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या ‘त्रिशूल’ नामक वाघाला अखेर वनविभागाने जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. गदगाव परिसरात उरकुडपार संरक्षित वनकक्ष क्रमांक 380 मध्ये ही थरारक कारवाई पार पडली. पशुवैद्यकीय अधिकारी, वनविभागाचे अधिकारी कर्मचारी, आरआरटी पथक आणि पोलिसांच्या संयुक्त मोहिमेत डार्ट मारून या वाघाला बेशुद्ध करण्यात आले.

Published On - Nov 05,2026 9:00 AM

Follow Us
सांगली जिल्हा बँकेच्या निकालानंतर जयंत पाटील-पडळकर एकाच मंचावर
Sangli Padalkar Vs Patil : सांगली जिल्हा बँकेच्या निकालानंतर जयंत पाटील- गोपीचंद पडळकर एकाच मंचावर
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत सुप्रिया सुळेंनी दिली अपडेट! पुढील चेकअप...
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत सुप्रिया सुळेंनी दिली अपडेट! पुढील चेकअपसाठी ब्रीच कॅंडी रुग्णालयात
ट्रम्प यांच्या पराभवावर बराक ओबामा यांची मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाले
ट्रम्प यांच्या पराभवावर बराक ओबामा यांची मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाले, हा विजय...
ऊसाला 4200 रुपये दर द्या, अन्यथा सातारा, सांगली आणि कोल्हापूर बंद! राज
ऊसाला 4200 रुपये दर द्या, अन्यथा सातारा, सांगली आणि कोल्हापूर बंद! राजू शेट्टींचा सरकारला इशारा
एकनाथ शिंदेंना वाराणसीत मोठा सन्मान; 'सनातन मार्तंड' पुरस्काराने गौरव,
एकनाथ शिंदेंना वाराणसीत मोठा सन्मान; 'सनातन मार्तंड' पुरस्काराने गौरव, धर्मध्वजा धारक उपाधीही बहाल!
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय....
Sharad Pawar Health Update : शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय तपासण्या सुरू
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
Shiv Sena Symbol Row : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
Payal Zambare Case : पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित....
Umesh Patil On Rohit Pawar : आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित पवारांना थेट सवाल
राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या....
NCP Meeting Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या खात्यांबाबत उपस्थित केले प्रश्न