AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Farmer ID: मोठी बातमी! बटाईदार शेतकऱ्यांनाही फार्मर आयडी मिळणार , सरकारचा मोठा निर्णय, अशी करा नोंदणी

Tenant Farmers will get Farmer ID: मोदी सरकारने अजून एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. बटाईने शेती करणाऱ्यांची आता ओळख निर्माण होणार आहे. बटाईदार शेतकऱ्यांनाही फार्मर आयडी मिळणार आहे. त्याचा काय फायदा होणार, त्यासाठी कशी नोंदणी करावी हे जाणून घ्या.

Farmer ID: मोठी बातमी! बटाईदार शेतकऱ्यांनाही फार्मर आयडी मिळणार , सरकारचा मोठा निर्णय, अशी करा नोंदणी
बटाईदार शेतकऱ्यांनाही फार्मर आयडी मिळणार , सरकारचा मोठा निर्णय, अशी करा नोंदणी
| Updated on: Nov 05, 2026 | 8:01 AM
Share

Tenant Farmers will get Farmer ID: देशातील कृषी क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी आणि डिजिटल व्यवस्थेसाठी केंद्र सरकारने मोठा पाऊल टाकले आहे. जमीन मालक नसलेल्या पण दुसऱ्याची जमीन कसणाऱ्या शेतकर्‍यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण भागात अनेक अल्पभूधारक शेतकरी अथवा जमीन नसलेले मजूर दुसर्‍याची शेती कसतात. पण त्यांना सरकारी योजनांचा कोणताही फायदा होत नाही. त्यांची सरकार दरबारी कोणतीच ओळख नसते. अशा बटाईदार, सालदार शेतकऱ्यांना आता अधिकृत फार्मर आयडी, शेतकरी ओळखपत्र देण्यात येणार आहे. त्यांना विविध योजनांचा लाभ थेट मिळणार आहे. सरकारचा हा ऐतिहासिक निर्णय मानल्या जात आहे.

योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा

अनेक सरकारी कृषी योजना, पीक विमा, बँक कर्जे अथवा आर्थिक अनुदानाचा लाभे घेण्यासाठी जमिनीची मालकी असणे आणि 7/12 नावावर असणे बंधनकारक मानले जाते. अनेक जण जमीन भाडेतत्वावर घेऊन वर्षभर ती कसतात. सालदार, बटाईदार ही जमीन कसतो. पण जमिनीची मालकी नसल्याने अनेकदा सरकारी लाभांपासून त्यांना वंचित राहावे लागते. त्यामुळेच आता सरकारने बटाईदारांना फार्मर आयडी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बटाईदारांचाही एक अधिकृत आकडा सरकारकडे काही दिवसात येईल आणि त्यांच्यासाठी योजना राबवताना आकडेवारीचा फायदा होईल.

Farmer ID काय?

बोगस शेतकऱ्यांची ओळख पटावी आणि बोगस लाभार्थ्यांना चाप बसावा यासाठी फार्मर आयडी असणे बंधनकारक करण्यात आले आहे. कृषी योजनांमध्ये बोगस लाभार्थी घुसू नये यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे. सरकारी योजनांचा लाभ किती शेतकऱ्यांना मिळतो याची माहिती समोर यावी यासाठी शेतकऱ्यांचे ओळखपत्र तयार करण्यात येत आहे. त्यालाच फार्मर आयडी असं म्हणतात. फार्मर आयडी हे जणू शेतकर्‍यांचे डिजिटल प्रोफाईल आहे. यामध्ये शेतकऱ्यांची सर्व माहिती जतन असते. शेतकर्‍यांची जमीन कुठे आणि किती आहे. त्याच्या शेतात सध्या कोणते पीक आहे यासह इतर माहिती यामध्ये जतन होते.

Farmer ID कसे तयार करणार?

फार्मर आयडी तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना AgriStack Portal वर जावे लागेल. या ठिकाणी पासवर्ड आणि युझर आयडी तयार करावा लागेल. ‘Create New User’ च्या पर्यायावर क्लिक करा. अटी आणि शर्तीचा फॉर्म सबमिट करा. यानंतर आधार कार्डशी लिंक मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करा. पुन्हा एकदा हिच प्रक्रिया पूर्ण करा. ओटीपीने व्हेरिफाय करा.

बटाईदरांनी नोंदणी करताना करा हे महत्त्वाचे काम

बटाईदार शेतकऱ्यांना फार्मर आयडी तयार करताना जमीन मालकासोबतचा वैध करार आणि लीज कागदपत्रे संबंधित पोर्टलवर अपलोड करावे लागती. यामुळे शेती प्रत्यक्षात कोण कसत आहे याची अचूक माहिती सरकारकडे उपलब्ध होईल. अतिवृष्टी, दुष्काळातील मदतीचा थेट फायदा जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यालाही मिळेल. भूमिहीन आणि बटाईदारांना सरकारी योजनांचा फायदा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

Follow Us
एकनाथ शिंदेंना वाराणसीत मोठा सन्मान; 'सनातन मार्तंड' पुरस्काराने गौरव,
एकनाथ शिंदेंना वाराणसीत मोठा सन्मान; 'सनातन मार्तंड' पुरस्काराने गौरव, धर्मध्वजा धारक उपाधीही बहाल!
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय....
Sharad Pawar Health Update : शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय तपासण्या सुरू
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
Shiv Sena Symbol Row : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
Payal Zambare Case : पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित....
Umesh Patil On Rohit Pawar : आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित पवारांना थेट सवाल
राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या....
NCP Meeting Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या खात्यांबाबत उपस्थित केले प्रश्न
गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त...
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त संचालकांमुळे सत्तेचं गणितच बदललं
समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक, 5 वेळा लुटमार; प्रवाशांमध्ये भीती
शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे....
Shivsena Hearing Case : शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे राज्याचं लक्ष 
शिंदे गटाचे वकील मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट; शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...