Nana Patekar: दुसऱ्याच दिवशी मी तोंड धुवून…माधुरी दीक्षितसमोर नानांनी अट ठेवताच, अभिनेत्रीने घेतला मोठा निर्णय
Nana Patekar: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमधील दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर अनेकजण त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. माधुरी दीक्षितने प्रहार सिनेमाच्या वेळच्या एक किस्सा सांगितला आहे.

सध्या छोट्या पडद्यावरील मराठी क्विज शो ‘कोण होणार करोडपती’ चांगलाच चर्चेत आहे. या शोमध्ये हजेरी लावणारे कलाकार हे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. आता या शोच्या मंचावर या वर्षीची दिवाळी एका खास मराठी अंदाजात साजरी होणार आहे. कारण या सणाच्या विशेष भागात होस्ट माधुरी दीक्षितसोबत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सहभागी होणार आहे. दोघींनी मिळून नाना पाटेकर यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
बॉलिवूडमधील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे 8 ऑक्टोबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. अनेकांना नाना आजही आपल्यामध्ये नाहीत हे खरंच वाटत नाहीये. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने देखील माधुरी दीक्षित समोर नानांच्या आठवणीत हेच म्हटले आहे. नाना सरांचं नसणं खरच वाटत नाहीये. पहिली दिवाळी आहे त्यांच्याशिवाय असे सोनाली कुलकर्णी म्हणाली.
View this post on Instagram
माधुरीने सांगितलं नेमकं काय घडलं?
त्यानंतर माधुरी दीक्षितने नानांसोबतच प्रहार सिनेमाच्या सेटवर घडलेला किस्सा सांगितला आहे. “मला अजूनही ते सिंक होत नाहीये. प्रहार मी आधी केलेला तेव्हा नाना म्हणाला मेकअप नकोये मला. मी दुसऱ्यादिवशी तोंड वैगरे धुवून गेले सेटवर. मेकअप नाहीये ना… मी म्हटलं नाहीये नाना… नाही तू दाखव मला. मग एक रिमूव्हर आला. चेहऱ्यावरचा मेकअप पुसून दाखवला. म्हटलं बघ आहे का मेकअप… हा आता बरोबर आहे” असे माधुरी म्हणाली.
या दिवाळी विशेष भागात या दोघींमध्ये मजेशीर आणि मनमोकळ्या गप्पा रंगल्या, ज्यातून सोनालीचं मराठी मातीवर असलेलं प्रेम आणि माधुरीनं तिच्या कुटुंबासोबत डेन्व्हरमध्ये साजऱ्या केलेल्या दिवाळीच्या आठवणी शेअर केल्या. या उत्सवातील मराठमोळा रंग आणखी वाढवत, माधुरी आणि सोनाली यांनी पारंपारिक मराठी पोशाखात “आली माझ्या घरी ही दिवाळी” या लोकप्रिय गाण्यावर एकत्र डान्स केला आणि सोबतच्या ढोल-ताशांच्या गजरामुळे हा क्षण अवर्णनीय बनला.
या वेळी, माधुरीनं सोनालीच्या तमिळ, तेलुगू, मराठी, हिंदी आणि अगदी इटालियन चित्रपटांमधील कामाच्या अनुभवाचा विषय काढला. माधुरीनं सोनालीला विचारलं, जेव्हा सोनालीला राग येतो तेव्हा तिच्या तोंडातून सर्वात आधी कोणती भाषा बाहेर पडते? या प्रश्नावर व्यक्त होताना सोनाली म्हणाली, “अगं कार्टे!” आणि मंचावर एकच हास्यकल्लोळ झाला. आपला मराठी बाणा सिद्ध करताना सोनाली म्हणाली की, स्वतःचं वर्णन करण्यासाठी मला ‘हार्डकोर’ हा इंग्रजी शब्द देखील वापरावासा वाटत नाही, इतकी मी “अस्सल मराठी” आहे.
