भारताला जे हवे होते तेच घडले, फायदाच फायदा होणार, अमेरिकेच्या..
अमेरिकेतील सिनेटच्या निवडणुका झाल्या आहेत. त्यातच डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाला मोठा धक्का बसला. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकरिता हा मोठा फटका आहे. या निवडणुकीनंतर भारताला मोठा फायदा होणार आहे.

अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रिपब्लिकन पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. अमेरिकेच्या जनतेने डोनाल्ड ट्रम्प यांचा विरोध केला. यासोबतच इराण युद्धात अमेरिकेची लागलेली वाट पाहात डोनाल्ड ट्रम्प यांना लोकांनी नाकारले. थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचे परिणाम त्यांच्या पक्षाला भोगावी लागल्याचेही दिसत आहे. ट्रम्प यांच्या पक्षाच्या पराभवामागे आर्थिक, राजकीय आणि भूराजकीय गोष्टी जबाबदार आहेत. मात्र, या निवडणुकीचा अनपेक्षित निकाल लागला आहे. डोनाल्ड ट्रम्प मागील अनेक वर्षांपासून भारतावर दबाव टाकत आहेत. भारतासह अन्य देशांवर त्यांच्याकडून निर्बंध लादली जात आहेत. भारत आणि अमेरिकेचे संबंध चांगले आहेत. पण डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेने नाकारले.
डोनाल्ड ट्रम्प यांना या निवडणुकीत मोठे अपयश मिळाले. पण डोनाल्ड ट्रम्प यांना जरी अपयश मिळाले असले तरीही यात भारताचा मोठा फायदा आहे. भारताची चांदीच चांदी होणार. उलटे की सुटले कोणत्याही देशावर टॅरिफ लावले किंवा धमक्या देणे हेच काम मागील काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प यांचे सुरू होते, त्याला आता मोठी फटकार बसली असून अमेरिकेच्या जनतेलाही हे मान्य नाही.
इराणच्या होर्मुज खाडीला डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले स्वत: चे नाव देखील दिले. कारण नसताना डोनाल्ड ट्रम्प इराण युद्धात उतरले, ज्याचा फटका बसताना दिसला. डोनाल्ड ट्रम्प यांना बसलेला फटका हा भारतासाठी फायदेशीर ठरणार आहे. आता डोनाल्ड ट्रम्प कोणताही निर्णय घेताना दहा वेळा विचार करणार हे तर नक्कीच आहे.
डोनाल्ड ट्रम्प कायमच पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे मित्र असल्याचे सांगताना दिसतात. पण भारतावर गंभीर आरोप करताना दिसतात. भारताबद्दल चुकीची भाषा करतात. डोनाल्ड ट्रम्प यांनी या निवडणुकीच्या निकालानंतर भाष्य करत म्हटले की, मी या निवडणुकीत नसल्याने या निवडणुकीचे निकाल असे असावेत. पण अमेरिकेच्या अध्यक्षाच्या पक्षाचा निवडणुकीत पराभव झाल्याने मोठा धक्का बसला आहे.
