AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात आला, पण पडायचं नावच नाही, कुठे रेंगाळला पाऊस? यंदा देशात फक्त… का ओढावलं असं संकट?

महाराष्ट्रात जून महिन्यात धो धो पडणारा पाऊस अजून कसा पडला नाही? असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाला आहे. यंदाच्या वर्षी पाऊस महाराष्ट्रा येऊन थांबला आहे... तर देशात 41 % कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलं आहे... असं संकट का उभं राहली याची प्रमुख 5 कारणे

महाराष्ट्रात आला, पण पडायचं नावच नाही, कुठे रेंगाळला पाऊस? यंदा देशात फक्त... का ओढावलं असं संकट?
| Updated on: Jun 19, 2026 | 12:01 PM
Share

दिवसाणिक उकाडा वाढत आहे, त्यामुळे राज्यात प्रत्येकाच्या तोंडात एकच वाक्य आहे आणि तो म्हणजे ‘पाऊस पडेल तरी काधी?’, सध्याची परिस्थिती पाहिली तर, लहान मुलंच नाही तर, मोठे देखील पावसाच्या प्रतिक्षेत आहे. पण पाऊस कधी बरसेल आहे, राज्यातील नागरिकांना दिलासा मिळेल… याबद्दल काहीही सांगता येत नाही. पाऊस महाराष्ट्राच्या दक्षिण भागात येऊन रेंगाळला आहे… याच कारणामुळे देशभरात 41 टक्के कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे… भारतीय हवामान विभागाच्या (IMD) ताज्या आकडेवारीनुसार, 4 जून ते 18 जून या कालावधीत देशात केवळ 42.6 मिमी पावसाची नोंद झाली, तर या काळात सामान्यतः 72.2 मिमी पाऊस पडणं अपेक्षित असतं.

महाराष्ट्रात रेंगाळला पाऊस

हवामान विभागाने (IMD) गुरुवारी सांगितल्यानुसार, मोठ्या प्रमाणात अनुकूल परिस्थिती नसल्यामुळे पाऊस गेल्या काही दिवसांपासून पुढे येऊ शकलेलाच नाही… मान्सूनच्या आदमनाचा वेग मंद असण्यामागे पाच मुख्य कारणं हवामान विभागाने सांगितली गेली आहेत.

पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे, अरबी समुद्रातून निर्माण होणाऱ्या वादळी लाटांचा अभाव. अशा लाटा सहसा मोठ्या प्रमाणात आर्द्रता घेऊन येतात आणि व्यापक पाऊस पाडतात, ज्यामुळे मान्सून पुढे सरकण्यास मदत होते. दुसरे कारण म्हणजे अरबी समुद्रावर मान्सूनशी संबंधित नैऋत्येकडील वारे कमकुवत झाले आहेत. तिसरं कारण म्हणजे पश्चिम हिंदी महासागर आणि अरबी समुद्रावर विषुववृत्त ओलांडून येणारे वारे कमकुवत आहेत. हे वारे मान्सूनसाठी आर्द्रतेचा स्रोत आहेत.

हवामान विभागाच्या मते, मान्सून कमकुवत होण्याचं चौथं कारण म्हणजे त्याला पुढे नेण्यास मदत करणारे महत्त्वाचे घटक, म्हणजे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरील कमी दाबांचे पट्टे यांचा अभाव आहे. तर, याचा शेत कामांना देखील मोठा फटका बसणार आहे. कमी पाऊस असल्याचा खरीप पिकांवर गंभीर परिणाम होण्याची भीती देखील वर्तवण्यात येत आहे.

पाचवं कारण म्हणजे ‘मॅडेन-ज्युलियन ऑसिलेशन’ (MJO) कमकुवत होणं. MJO ही वारा, ढग आणि हवेचा दाब यांची एक गतिशील प्रणाली आहे, जी विषुववृत्ताभोवती फिरताना पाऊस घेऊन येते. जेव्हा MJO जेव्हा सक्रिय होतो, तेव्हा तो, दक्षिण भारतात अधिक ढगाळ वातावरण निर्माण करतो… त्यानंतर, मान्सूनचे वारे हे ढग उत्तरेकडे वाहून नेतात, ज्यामुळे पावसाचं प्रमाण वाढतं.

मान्सूनची रखडलेली प्रगती आणि नुकताच निर्माण झालेली ‘एल निनो’ची स्थिती यामुळे पावसाचं प्रमाण कमी होऊ शकतं. ‘एल निनो’ ही हवामानाशी संबंधित एक अशी घटना आहे, जी भारतासाठी चिंतेची बाब आहे, कारण ती मान्सूनला कमकुवत करते. याचा खरीप पिकांवर गंभीर परिणाम होऊ शकतो, कारण या पिकांच्या चांगल्या वाढीसाठी वेळेवर पाऊस पडणं आवश्यक असते. कमी पाऊस झाल्यास भविष्यात पाणी टंचाईचा देखील सामना करावा लागू शकतो…

Follow Us
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले