AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Omraje Nimbalkar : ओमराजेंचा दशक्रियाविधी…त्याला फटकावणार..एकनाथ शिंदेंना मुलं होत नाहीत..ठाकरे गटाकडून उघड धमकी

Omraje Nimbalkar : उद्धव ठाकरे गटातील खासदार फुटल्याने सध्या महाराष्ट्रातले ठाकरे गटाचे शिवसैनिक प्रचंड संतापले आहेत. त्यात संजय राऊतांनी ऑपरेशन तुडवा जाहीर केलं आहे. त्यामुळे ठाकरे सैनिकांच्या भावना खूप तीव्र आहेत. आता खुली धमकी देण्यात आली आहे.

Omraje Nimbalkar : ओमराजेंचा दशक्रियाविधी...त्याला फटकावणार..एकनाथ शिंदेंना मुलं होत नाहीत..ठाकरे गटाकडून उघड धमकी
Omraje Nimbalkar
| Updated on: Jun 19, 2026 | 12:26 PM
Share

महाराष्ट्राच्या राजकारणाची पुन्हा एकदा देशभरात चर्चा सुरु आहे. त्याला कारण आहे, उद्धव ठाकरे गटातील फूट. उद्धव ठाकरे यांच्या गटातील 9 पैकी 6 खासदार फुटले आहेत. ते त्यांचा स्वतंत्र गट स्थापन करणार, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार अशा चर्चा आहेत. पण अजून त्यांची अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. काल उद्धव ठाकरे गटाने व्हीप जारी करुन बैठक बोलवली होती. त्या बैठकीला सहाखासदार अनुपस्थित राहिले. त्यामुळे ठाकरे गटात फूट पडल्याचं स्पष्ट झालं. या सहाखासदारांपैकी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची बंडखोरी ठाकरे सैनिकांच्या मनाला जास्त लागली आहे. ओमराजे निंबाळकर यांना ठाकरेंनी सर्वकाही दिलं. त्यांचं राजकीय करिअर उभं केलं. पण तेच ओमराजे बंडखोर बनले. त्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिक दुखावला गेला आहे.

सोशल मीडियावर ओमराजे निंबाळकर यांच्या फॉलोअर्सची संख्या घटत चालली आहे. दुसरीकडे शिवसैनिकांकडून त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. ओमराजे निंबाळकर सोलापुरात आल्यावर त्यांची गाडी फोडणार आणि त्याला फटके देणार अशी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांनी धमकी दिली आहे. सोलापुरात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने फुटीर खासदारांविरोधात आंदोलन करण्यात आलं.

खासदारांचे दशक्रिया विधी

शहरातील गणपती घाटावर खासदारांचे दशक्रिया विधी करण्यात येत आहेत. शिवसेनेच्या सहा खासदारांनी वेगळा गट करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. ओमराजे निंबाळकर सोलापुरात आल्यावर त्याची गाडी फोडणार आणि त्याला फटके देणार असा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांनी इशारा दिला. “ए संजय जाधव, तुला नरकातही जागा मिळणार नाही!”, “स्वर्गात तरी सुखी राहा, तिकडे तरी गद्दारी करू नको, भाऊसाहेब वाकचौरे!” अशा संतप्त भावना आंदोलकांनी व्यक्त केल्या.

ओमराजे गद्दार निघाला

“एकनाथ शिंदे यांना मुलं होत नाहीत म्हणून त्यांनी ठाकरेंची मुलं पळवली आहेत. आज खासदार पळाले असले तरी आम्ही पुन्हा खासदार निवडून आणू. ओमराजेसाठी आम्ही घाम गाळला आहे. मात्र ओमराजे गद्दार निघाला. या गद्दारीची किंमत त्याला चुकवावी लागेल” असा प्रताप चव्हाण यांनी इशारा दिला. ओमराजे निंबाळकर कुठे आहेत हे कोणाला माहित नाहीय, ते पुण्यात असल्याचं बोललं जातय.

Follow Us
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा..
Mumbai Cha Raja | हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा हार, व्हिडीओ होतोय व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल