AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेच्या निवडणूक निकालानंतर तेल बाजार का कोसळला? शेअर बाजाराला काय होणार फायदा?

अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांमध्ये ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत सुमारे १० टक्क्यांनी घट झाली आहे. यामागचं कारण जाणून घ्या.

अमेरिकेच्या निवडणूक निकालानंतर तेल बाजार का कोसळला? शेअर बाजाराला काय होणार फायदा?
Crude oil price drop 10 percent
| Updated on: Nov 05, 2026 | 9:17 AM
Share

जेव्हा जेव्हा अमेरिकेतील राजकारणात बदल होतात तेव्हा तेव्हा त्याचा परिणाम संपूर्ण जगावर दिसतो. अलीकडेच झालेल्या अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांमध्ये जे निकाल लागले त्याचा परिणाम दिसू लागला आहे. या निकालाने ग्लोबल मार्केटच चित्र बदलेल आहे. या निवडणुकांमध्ये ट्रम्प यांना नुकसान झाले असून दुसरीकडे डेमोक्रेटिक पार्टीने दोन्ही संसदेत आपली पकड मजबूत केली आहे. वॉशिंग्टनमधील हीच सत्तासमीकरणे बदलताच, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती अचानक कोसळल्या. या राजकीय बदलाचा परिणाम जगभरातील वित्तीय बाजारांवर स्पष्टपणे दिसून येत आहे.

कच्च्या तेलाच्या किमती पडल्या

मतदानाचे निकाल समोर येताच कच्च्या तेलाच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर विक्रीचा दबाव दिसून आला. ताज्या बाजार आकडेवारीनुसार, तेलाच्या किमतीत सुमारे १० टक्क्यांची मोठी घसरण झाली आहे. अमेरिकी क्रूड ऑयल अर्थात WTI चा भाव हा १० टक्क्यांनी घसरून 87.68 डॉलर प्रति बैरल वर आला आहे. आंतरराष्ट्रीय मानक मानल्या जाणाऱ्या ब्रेंट क्रूडच्या किमतीत खूप घसरण दिसून आली आहे. बाजारातील चढ-उतारांच्या दरम्यान, ब्रेंट क्रूडच्या किमतीत ९.२० टक्क्यांची घसरण झाली असून, ती ९४.०८ डॉलर्स प्रति बॅरलवरून ९३.४० डॉलर्स प्रति बॅरल या पातळीवर आली आहे.

तेलाच्या किमतीच्या घसरणीमागे अजून एक कारण!

तेलाच्या किमतीत झालेली अचानक घसरण केवळ अमेरिकेतील अंतर्गत राजकारणामुळेच नव्हे, तर परराष्ट्र धोरणाशी संबंधित अपेक्षांमुळेही झाली आहे. बाजार तज्ज्ञांनुसार अमेरिकी संसदमध्ये डेमोक्रेटिक पार्टी मजबूत झाल्यास अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात बदल घडून येऊ शकतात. यामुळेच गुंतवणूकदारांमध्ये नवीन राजकीय परिस्थिती पाहता एक आशा आली आहे. ही आशा म्हणजे अमेरिका आता इराणसोबत संवादाचा मार्ग खुला करू शकेल. जर असे घडले, तर पश्चिम आशियातून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या पुरवठ्याबाबतच्या चिंता मोठ्या प्रमाणात कमी होतील. तेलाचा पुरवठा वाढेल या अपेक्षेनेच किमती कमी होण्यात मुख्य भूमिका बजावली आहे.

जगभरातील शेअर बाजारांसाठी एक नवसंजीवनी

कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली ही मोठी घसरण एक दिलासादायक बातमी आहे. जगभरातील शेअर बाजारांसाठी हे फायद्याचं आहे. तेलाच्या वाढलेल्या किमतींमुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांवर महागाईचा मोठा ताण निर्माण झाला होता. परंतु अलीकडील या घसरणीमुळे जागतिक बाजारातील गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, बाजारांसमोरील सर्व आव्हाने अजूनही पूर्णपणे दूर झालेली नाहीत. पश्चिम आशियाई देशांमधील भू-राजकीय तणाव अजूनही पूर्णपणे निवळलेला नाही. याव्यतिरिक्त, कच्च्या तेलाच्या किमतींमधील ही घसरण पुढेही कायम राहील की नाही, हे अमेरिकन सरकार नेमके काय निर्णय घेतंय यावरुनच स्पष्ट होईल.

Follow Us
सहर शेख यांच्या ताजमहाल पोस्टने वाद पेटला; मुंब्र्यात भाजपचे आक्रमक...
सहर शेख यांच्या ताजमहाल पोस्टने वाद पेटला; मुंब्र्यात भाजपचे आक्रमक आंदोलन!
सांगली जिल्हा बँकेच्या निकालानंतर जयंत पाटील-पडळकर एकाच मंचावर
Sangli Padalkar Vs Patil : सांगली जिल्हा बँकेच्या निकालानंतर जयंत पाटील- गोपीचंद पडळकर एकाच मंचावर
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत सुप्रिया सुळेंनी दिली अपडेट! पुढील चेकअप...
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत सुप्रिया सुळेंनी दिली अपडेट! पुढील चेकअपसाठी ब्रीच कॅंडी रुग्णालयात
ट्रम्प यांच्या पराभवावर बराक ओबामा यांची मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाले
ट्रम्प यांच्या पराभवावर बराक ओबामा यांची मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाले, हा विजय...
ऊसाला 4200 रुपये दर द्या, अन्यथा सातारा, सांगली आणि कोल्हापूर बंद! राज
ऊसाला 4200 रुपये दर द्या, अन्यथा सातारा, सांगली आणि कोल्हापूर बंद! राजू शेट्टींचा सरकारला इशारा
एकनाथ शिंदेंना वाराणसीत मोठा सन्मान; 'सनातन मार्तंड' पुरस्काराने गौरव,
एकनाथ शिंदेंना वाराणसीत मोठा सन्मान; 'सनातन मार्तंड' पुरस्काराने गौरव, धर्मध्वजा धारक उपाधीही बहाल!
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय....
Sharad Pawar Health Update : शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय तपासण्या सुरू
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
Shiv Sena Symbol Row : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
Payal Zambare Case : पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित....
Umesh Patil On Rohit Pawar : आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित पवारांना थेट सवाल