AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त अर्धा तास… तर भाजपचे महाराष्ट्रात सात तुकडे होतील; संजय राऊतांनी दिला मोठा इशारा

भाजप नेत्यांच्या टीकेला संजय राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 'अर्धा तास ED-CBI माझ्या हाती द्या, महाराष्ट्रातील भाजपचे सात तुकडे होतील आणि गिरीश महाजनच पहिले फुटतील,' असा खणखणीत इशारा राऊतांनी दिला. ठाकरे गटाचे खासदार फुटल्याच्या आरोपांना उत्तर देताना, राऊतांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांवरही सडकून टीका केली, त्यांची निष्ठा आणि हेतू यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

फक्त अर्धा तास... तर भाजपचे महाराष्ट्रात सात तुकडे होतील; संजय राऊतांनी दिला मोठा इशारा
संजय राऊत यांचा इशारा
| Updated on: Jun 19, 2026 | 12:20 PM
Share

ठाकरे गटाचे सहा खासदार फुटले आहेत. संजय राऊत यांच्या बोलण्यामुळेच हे खासदार फुटले आहेत. उद्या ठाकरे गटाचे नगरसेवकही फुटतील, असा दावा भाजप नेते गिरीश महाजन यांनी केला होता. महाजन यांचं हे विधान ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना चांगलंच झोंबलं होतं. त्यामुळे संजय राऊत यांनी थेट गिरीश महाजन यांच्यावरच हल्ला चढवला. फक्त अर्धा तास ईडी आणि सीबीआय माझ्या हातात द्या, भाजपचे सात तुकडे होतील आणि सर्वात आधी गिरीश महाजन भाजपमधून फुटतील असा दावाच संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी आज मीडियाशी संवाद साधताना पुन्हा एकदा गिरीश महाजन यांच्यावर हल्ला चढवला आहे. मी कालच सांगितलं, माझ्या पक्षाच्यावतीने सांगतो, अर्धा तास फक्त ईडी सीबीआय मिळू द्या. भाजपचे महाराष्ट्रात सात तुकडे होतील, सर्वात आधी पक्ष सोडणाऱ्यांमध्ये गिरीश महाजन असतील. एवढ्या भानगडी गिरीश महाजन यांच्या आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

संजय पाटलांनी तारे तोडू नये

यावेळी त्यांनी खासदार संजय दिना पाटील यांच्यावरही टीका केली. संजय दिना पाटील हे शिवसेनेमुळेच जिंकले. त्यांच्या मुलीला महापालिकेचं तिकीट दिलं. निष्ठावंत कार्यकर्त्याला डावलून आम्ही त्यांच्या मुलीला तिकीट दिलं. मुलगी शिवसेनेत आहे. वडिलांचं काय ते विचारा? वडील काल का नाही आले? संजय दिना पाटील यांची काल आम्ही दिल्लीत वाट पाहत होतो. ते येतील याची खात्री होती. त्यांना यावं असं का वाटलं नाही? पक्ष संकटातून जात असताना, आपलं कर्तव्य बजावावं असं ज्यांना वाटलं नाही, त्यांनी कशाला तारे तोडावे, असा हल्लाच राऊत यांनी चढवला.

तुमच्या बापाचं नाव काय?

खासदारांना तुडवण्याची कुणाच्या बापात हिंमत नाही, असं आमदार किशोर पाटील यांनी म्हटलं होतं. यावेळी राऊत यांनी किशोर पाटलांचा खरपूस समाचार घेतला. किशोर पाटीलला म्हणा तुमच्या असली बापाचं नाव काय आहे? आमच्या बापाचं नाव बाळासाहेब ठाकरे आहे. तुमच्या बापाचं नाव सांगू शकता का? हे विकलेले लोक आहेत. पैशासाठी पागल झाले. गांजा पिणारे लोक आहेत. नशा करणारे लोक आहेत. यांच्याकडे लॉयलटी नाही आहे. हे कशाला बोलतात? किशोर पाटीलला मी ओळखत नाही. तो माणूस कोण आहे? असा सवाल त्यांनी केला.

Follow Us
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले –राऊतांचा संतापजनक दावा
50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Sanjay Raut On Shiv Sena Crisis | 50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; शिवसेना वर्धापन दिनी संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत
Best Bus Employee Strike | मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत, बस सेवा पूर्ण ठप्प
ना ठाकरे... ना शिंदे! बाळासाहेबांचा फोटो टाकून त्या खासदारांनी वाढवला
ना ठाकरे... ना शिंदे! बाळासाहेबांचा फोटो टाकून त्या खासदारांनी वाढवला मोठा सस्पेन्स
वारसा विचारांचा, हीरक महोत्सव शिवसेनेचा; ठाकरे-शिंदे काय बोलणार?
वारसा विचारांचा, हीरक महोत्सव शिवसेनेचा; वर्धापन दिनी ठाकरे-शिंदे काय बोलणार?
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है
Omraje Nimbalkar | खासदार ओमराजेंबबात मोठी अपडेट समोर; थेट पुण्यातील
Omraje Nimbalkar | खासदार ओमराजेंबबात मोठी अपडेट समोर; थेट पुण्यातील निवसस्थानी... राजकारणातील हालचालींना वेग
अखेर प्रीति झिंटाला डिपफेक प्रकरणी मोठा दिलासा, कोर्टाने थेट परवानगी..
अखेर प्रीति झिंटाला डिपफेक प्रकरणी मोठा दिलासा, कोर्टाने थेट परवानगी दिली; आता अभिनेत्री...
मोठी बातमी! सही न करणारे खासादार ठाकरेंसोबत? बैठकीतून फोन लावला अन्...
मोठी बातमी! सही न करणारे खासादार ठाकरेंसोबत? बैठकीतून फोन लावला अन्... 'ऑपरेशन टायगर'बाबत मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली म्हणूनच...
बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली म्हणूनच...; खासदार फुटीनंतर दादा भुसेंचं मोठं विधान