शिक्षण इंजिनअरिंगचं धंदा चोरीचा, पोलिसांनी धरलं आणि डॉन व्हायचं राहिलं

अधिकाऱ्याच्या मुलांना बांधून टाकून पत्नीवर चाकू हल्ला करून चोरट्यांनी पैशांसह सोन्याचे दागिने पळवले होते .

शिक्षण इंजिनअरिंगचं धंदा चोरीचा, पोलिसांनी धरलं आणि डॉन व्हायचं राहिलं
प्रातिनिधीक फोटो

हिंगोली शहरातील उच्चभ्रू वस्तीत 30 डिसेंबर रोजी भर दिवसा बँक अधिकाऱ्यांच्या घरात घुसून चौरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. अधिकाऱ्याच्या मुलांना बांधून टाकून पत्नीवर चाकू हल्ला करून चोरट्यांनी पैशांसह सोन्याचे दागिने पळवले होते . या प्रकरणांचा पोलिसांनी वेगाने तपास करून दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. तसेच त्यांच्याकडून साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचं पोलीस अधीक्षक राकेश कला सागर यांनी सांगितले. हे दोन्ही दरोडेखोर उच्च शिक्षित आहेत, यातला एक तर इंजिनियर आहे, उच्चशिक्षित तरुणांनी हा धक्कादायक प्रकार केल्याने खळबळ माजली आहे.

चोरी कशी केली?

दोघे ही एका कुरियर कंपनीमध्ये काम करत होते. ज्या बँक अधिकाऱ्याच्या घरी भर दिवसा दरोडा टाकला. त्याच घरी ते अनेक वेळा पार्सल आणून देत होते . त्या घराचा अनेक दिवस अभ्यास करून घरात एकटी महिला व मुलगा राहत असल्याची संधी साधून त्यांनी हा शस्त्रदरोडा भर दिवसा टाकला. भरदिवसा अशा रितीनी दरोडा पडल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

याच्याकडे काय मिळाले?

दोन पिस्तुल, एक जिवंत काडतुस, सोन्याचे दागिने यासह गुन्ह्यात वापरले साहित्य जप्त केले. सोन्याचे दागिने मोडून ह्या दरोडे खोरांनी अजून मोठे गुन्हे करण्यासाठी एक पिस्तुल खरेदी केला होता, तोही पिस्तुल पोलिसांनी जप्त केला आहे. ज्या सोनारकडे दागिने मोडले त्या सोनारावर ही गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलीस अधीक्षक यांनी सांगितले. ऐनवेळी पोलिसांनी धरल्याने यांचे वांदे झाले आहेत, त्यामुळे त्यांच्या डॉन होण्याच्या स्वप्नालाही पोलिसांनी ब्रेक लावला आहे.

अहमदनगरमधील शिवसैनिकांची दुहेरी हत्या, कर्डिलेंची कन्या सुवर्णा कोतकरांना अटकपूर्व जामीन

फॅशन डिझायनरने विणलं बाईक चोरीचं जाळं, चार दुचाकींची ऑनलाईन विक्री, एका मेसेजमुळे भांडाफोड

‘आब्या’मुळे आत्महत्या करतेय, छेडछाडीला कंटाळून पुण्यात नववीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

Published On - 7:50 pm, Thu, 13 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI