‘आब्या’मुळे आत्महत्या करतेय, छेडछाडीला कंटाळून पुण्यात नववीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बोरी येथे घडली आहे. काल (बुधवारी) ध्याकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास तिने राहत्या घरात गळफास घेतल्याचा प्रकार उघड झाला आहे.

'आब्या'मुळे आत्महत्या करतेय, छेडछाडीला कंटाळून पुण्यात नववीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
महिलेचे शीर व हातपाय तोडून धड रस्त्यावर फेकले

पुणे : छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीने आत्महत्या (Pune Minor Girl Suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बोरी येथे संबंधित मुलगी राहत होती. सुसाईड नोट (Suicide Note) लिहून मुलीने टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे. ती इयत्ता नववीची विद्यार्थिनी असल्याची माहिती आहे. राहत्या घरी गळफास घेऊन तिने आत्महत्या केली. गावातील तीन मुलांच्या छेडछाडीला (Molestation) कंटाळून तिने आयुष्य संपवल्याचं उघड झालं आहे. ‘आब्या’मुळे आयुष्याची अखेर करत असल्याचे तिने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे. पोलिसांनी याची गंभीर दखल घेत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण?

छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बोरी येथे घडली आहे. काल (बुधवारी) संध्याकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास तिने राहत्या घरात गळफास घेतल्याचा प्रकार उघड झाला आहे. रात्री उशीरा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली. मुलीने आई-वडिलांच्या प्रतिमेला धक्का लागू नये, म्हणून आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. संबंधित विद्यार्थिनी इयत्ता नववीत शिक्षण घेत होती.

सुसाईड नोटमध्ये ‘आब्या’चा उल्लेख

आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी विद्यार्थिनीने एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. यात ‘आब्या’मुळे आपण आत्महत्या करत असल्याचे तिने चिठ्ठीत नमूद केले आहे. ही चिठ्ठी पोलीस आणि नागरिकांना मिळाली.

गावातील तीन मुलांकडून छेडछाड

गावातील तीन मुले या मुलीची छेडछाड करत होती, अशी माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तिघा मुलांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे मुलीच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या :

वर्ध्यातील अवैध गर्भपात प्रकरणाची खोलवर पाळंमुळं, हॉस्पिटलमागे 11 कवट्या आणि 54 हाडं, महिला डॉक्टरपाठोपाठ सासू-नर्सही ताब्यात

पगाराचा चेक का अडवला? महिला मुख्याधिकाऱ्याचा आक्रस्ताळेपणा, अकाऊण्टंटवर वस्तू फेकल्या

Pune Crime | पुण्यात 15 वाहने जाळून राख ; जाणीव पूर्वक आग लावल्याचा नागरिकांचा संशय

Published On - 3:33 pm, Thu, 13 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI