वर्ध्यातील अवैध गर्भपात प्रकरणाची खोलवर पाळंमुळं, हॉस्पिटलमागे 11 कवट्या आणि 54 हाडं, महिला डॉक्टरपाठोपाठ सासू-नर्सही ताब्यात

13 वर्षांच्या अल्पवयीन पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर ती गर्भवती राहिल्यावर अल्पवयीन मुलाच्या आई-वडिलांनी पीडितेचा 30 हजार रुपयांत गर्भपात केल्याची धक्कादायक घटना दोन दिवसांपूर्वी उघडकीस आली होती.

वर्ध्यातील अवैध गर्भपात प्रकरणाची खोलवर पाळंमुळं, हॉस्पिटलमागे 11 कवट्या आणि 54 हाडं, महिला डॉक्टरपाठोपाठ सासू-नर्सही ताब्यात
वर्ध्यात डॉ. कदम यांच्या मॅटर्निटी होमच्या मागे पुरलेले अवशेष आढळले
Follow us
| Updated on: Jan 13, 2022 | 12:49 PM

वर्धा : अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करुन तिचा अवैधरित्या गर्भपात (Minor Girl Abortion) केल्याचं प्रकरण वर्धा जिल्ह्यात (Wardha) गाजत आहे. ज्या नामांकित रुग्णालयात 13 वर्षांच्या मुलीचा गर्भपात करण्यात आला, त्या इमारतीच्या मागे असलेल्या गोबर गॅसच्या टाकीत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या ठिकाणी 11 कवट्या आणि 54 हाडं असे अवशेष सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या आई वडिलांसह महिला डॉक्टरला आधीच अटक करण्यात आली होती. आता डॉक्टर रेखा कदम यांच्या सासू आणि परिचारिकेलाही ताब्यात घेतले आहे. पीडितेचा 30 हजार रुपयांत अवैधरित्या गर्भपात केल्याचा आरोप डॉ. रेखा कदम यांच्यावर आहे. मात्र डॉ. कदम यांनी यापूर्वीही अनेक गैरप्रकार केल्याची चर्चा खरी ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.

आर्वी पोलिसांनी महिला डॉक्टरसह तिघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. त्यांना न्यायालयात हजर केलं असता अल्पवयीन मुलाच्या आई आणि वडिलांची कारागृहात रवानगी करण्यात आली, तर डॉ. रेखा कदम यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली होती.

काय आहे प्रकरण?

13 वर्षांच्या अल्पवयीन पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर ती गर्भवती राहिल्यावर अल्पवयीन मुलाच्या आई-वडिलांनी पीडितेचा 30 हजार रुपयांत गर्भपात केल्याची धक्कादायक घटना दोन दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. वर्धा जिल्ह्यातील आर्वी शहरात असलेल्या नामांकित मॅटर्निटी होमच्या डॉ. रेखा कदम यांच्यासह एकूण तिघा जणांना या प्रकरणी आर्वी पोलिसांनी अटक केली होती.

रुग्णालयाच्या मागे काय काय सापडलं?

सहा जानेवारीला अल्पवयीन मुलीचा गर्भपात करण्यात आला होता. मुळात गर्भपातासाठी लागणारा परवाना डॉ. रेखा कदम यांच्याकडे आहे का, असा सवाल विचारला जात आहे. त्याहून महत्त्वाचं म्हणजे मुलगी अल्पवयीन असल्यामुळे गर्भपाताआधी पोलिसांना कळवणं आवश्यक होतं, मात्र तशी कुठलीही पूर्वकल्पना न देता अवैधरित्या तिचा गर्भपात केल्याचं उघड झालं आहे. रुग्णालयाच्या इमारतीच्या पाठीमागे असलेल्या गोबर गॅस टाकीत 11 कवट्या आणि 54 हाडं असं बायोमेडिकल वेस्ट (जैविक कचरा) सापडल्याने याआधी इथे आणखी अवैध प्रकार घडल्याचा संशय बळावला आहे.

डॉक्टरांची सासू आणि नर्सही ताब्यात

पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी पथक आणि पालिका पथकाला पाचारण करुन डॉ. रेखा कदम यांच्या रुग्णालयामागील परिसरात खोदकाम केले असता जमिनीत पुरलेले भ्रुण अवषेशांसह आढळून आले आहेत. या प्रकरणी आता रुग्णालयाची परिचारिका संगीता काळे आणि डॉक्टरांची सासू शैलजा कदम यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे.

रुग्णालयामागील खड्डा बायोगॅस प्रकल्पाचा होता. मात्र, तो वापरात नसल्याने या खड्ड्यात इतर वेस्टेज साहित्य टाकले जात होते. पंचांसमक्ष अनेक बाबी जप्त केल्या असून जप्त करण्यात आलेले अवशेष डीएनए टेस्टसाठी पाठवण्यात येणार आहेत. तसेच हाडांचे अवशेष जनावरांचे की माणसांचे ही बाब अहवाल प्राप्त झाल्यावरच कळेल.

नेमकं काय घडलं होतं?

वर्धा जिल्ह्यातील आर्वी शहरात राहणाऱ्या संबंधित अल्पवयीन मुलीवर तिच्याच शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलाने बळजबरीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले. यातून ती अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. मुलीच्या पोटात अचानक दुखू लागल्याने तिचे आई वडील तिला डॉक्टरकडे घेऊन गेले असता ही बाब उघडकीस आली.

मुलगी गरोदर असल्याचे कळताच अल्पवयीन आरोपी आणि त्याच्या आई वडिलांनी मुलीच्या आई वडिलांना गर्भपात करण्यास सांगितले. तसेच याची पोलिसांकडे वाच्यता केल्यास सर्व गावात बदनामी करु असे धमकावले. मुलगी केवळ 13 वर्षाची असून मुलीची आणि आपली बदनामी होऊ नये म्हणून मुलीच्या आई वडिलांनीही त्यांचे म्हणणे ऐकले. त्यानुसार स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. रेखा कदम यांच्या दवाखान्यात मुलीचा बेकायदेशीररित्या गर्भपात करण्यात आला. यासाठी मुलाच्या घरच्यांनी 30 हजार रुपये दिले.

पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने याप्रकरणी पोस्को अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर कलम 376(3), 376(2) (एन), 312, 313, 315, 341, 201, 506, 34 भादवी सहकलम 4 6 21(1) पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

संबंधित बातम्या :

नर्ससोबत बळजबरी शरीरसंबंध, गरोदर राहिल्याने गर्भपात, औरंगाबादेत 25 वर्षीय डॉक्टरसह चौघांवर गुन्हा

लैंगिक शोषण करुन पीडितेचा गर्भपात, अल्पवयीन मुलाच्या आई वडिलांसह महिला डॉक्टरला अटक

अल्पवयीन मुलीचा बेकायदेशीर गर्भपात; डॉक्टरसह दोघांना अटक

Non Stop LIVE Update
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.