Wardha: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा बेकायदेशीर गर्भपात; डॉक्टरसह दोघांना अटक

आरोपींवर कलम 376(3), 376(2) (एन), 312, 313, 315, 341, 201, 506, 34 भादवी सहकलम 4 6 21(1) पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत. या घटनेनंतर या दवाखान्यात यापूर्वी अशा पद्धतीने गर्भपात झाले आहेत का? याबाबतही पोलीस तपास करत आहेत.

Wardha: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा बेकायदेशीर गर्भपात; डॉक्टरसह दोघांना अटक
अल्पवयीन मुलीचा बेकायदेशीर गर्भपात; डॉक्टरसह दोघांना अटक
Follow us
| Updated on: Jan 11, 2022 | 12:09 AM

वर्धा : वर्धा जिल्ह्याच्या आर्वी शहरात अल्पवयीन मुलीचा बेकायदेशीर गर्भपात केल्याप्रकरणी पोलिसांनी महिला डॉक्टरसह दोघांना अटक केले आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी मुख्य आरोपी असलेला आरोपीही अल्पवयीन आहे. आर्वी शहरातील एका अल्पवयीन मुलीवर तिच्या शेजारीच राहणाऱ्या अल्पवयीन मुलाने बळजबरीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले. यातून सदर अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. मुलीच्या पोटात अचानक दुखू लागल्याने तिचे आई वडिल तिला डॉक्टरकडे घेऊन गेले असता ही बाब उघडकीस आली.

बदनामीची भीती दाखवत गर्भापातास भाग पाडले

मुलगी गरोदर असल्याचे कळताच मुलीचा प्रियकर आणि त्याच्या आई वडिलांनी मुलीच्या आई वडिलांना मुलीचा गर्भपात करण्यास सांगितले. तसेच याची पोलिसांकडे वाच्छता केल्यास सर्व गावात बदनामी करु असे धमकावले. मुलगी केवळ 13 वर्षाची असून मुलीची व आपली बदनामी होऊ नये म्हणून मुलीच्या आई वडिलांनीही त्यांचे म्हणणे ऐकले. त्यानुसार स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. रेखा कदम यांच्या दवाखान्यात मुलीचा बेकायदेशीररित्या गर्भपात करण्यात आला. यासाठी मुलाच्या घरच्यांनी 30 हजार रुपये दिले.

पोलिसांना माहिती मिळताच आरोपींना अटक केली

आर्वी पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाली. त्यानुसार तात्काळ सर्व परवानगी मिळवून कारवाईच्या हालचाली सुरु केल्या. मात्र रात्री घर आणि दवाखाना दोन्ही बंद होते. त्यामुळे पोलिसांनी रात्रभर रेखा कदम यांच्या घरावर आणि दवाखान्यावर पाळत ठेवून सकाळी त्यांना अटक केली. सोबतच मुलाच्या आई वडिलांनाही अटक करत अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले.

याप्रकरणी पोस्को कायद्याअंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल

पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने याप्रकरणी पोस्को अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर कलम 376(3), 376(2) (एन), 312, 313, 315, 341, 201, 506, 34 भादवी सहकलम 4 6 21(1) पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत. या घटनेनंतर या दवाखान्यात यापूर्वी अशा पद्धतीने गर्भपात झाले आहेत का? याबाबतही पोलीस तपास करत आहेत. (Illegal abortion of a minor girl in wardha; Both arrested with doctor)

इतर बातम्या

Wardha: समाजात बदनामीच्या भीतीने मुलीच्या प्रियकराची पित्याने केली हत्या, वर्ध्यातील खळबळजनक घटना

Kerala Crime : केरळमध्ये पत्नी बदलण्याचे मोठे रॅकेट उद्धवस्त, 7 जणांना अटक, राज्यातील अनेक उच्चभ्रू लोकांचा समावेश

मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच..
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?.
सोलापूरच्या माळशिरसमधील मारकडवाडी गावात फेरमतदानाची का होतेय मागणी?
सोलापूरच्या माळशिरसमधील मारकडवाडी गावात फेरमतदानाची का होतेय मागणी?.
फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, पण शिरसाटांच्या त्या वक्तव्यान खळबळ
फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, पण शिरसाटांच्या त्या वक्तव्यान खळबळ.
हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला
हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला.
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान.
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम.
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.