गेल्या वर्षी म्हणजे 2021 च्या जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत मध्य रेल्वे आरपीएफने शासकीय रेल्वे पोलीस (GRP) आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समन्वयाने 603 मुले आणि 368 मुली अशा एकूण 971 मुलांची सुटका केली आहे. तसेच रेल्वेने अलीकडेच असोसिएशन फॉर व्हॉलंटरी ॲक्शन (AVA) सोबत देशातील रेल्वेमार्गे होणारी मानवी तस्करी समाप्त करण्याच
आज (शुक्रवारी) सेन्सेक्स 137 अंकांच्या घसरणीसह 52,794 स्तरावर आणि निफ्टी 26 अंकांच्या घसरणीसह 15782 च्या टप्प्यावर बंद झाला. आजच्या व्यवहारात सर्वाधिक घसरण मेटल क्षेत्रामध्ये (Metal Sector) दिसून आली.
न्यायालयाने 17 मे रोजी सर्वेक्षणाचा पुढील अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. पण एकाच कोर्ट कमिश्नरऐवजी कोर्टानं आणखी दोन वकिलांची नियुक्ती केलीय. म्हणजेच कोर्ट कमिश्नर आणि दोन वकिल यांच्यामार्फत आता मशिदीचं सर्वेक्षण होईल.
घर पेटवणारं नाही, चूल पेटवणारं आमचं हिंदुत्व, अशा असंख्य टॅग लाईनही शिवसेनेने प्रसिद्ध केल्या आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच उद्धव ठाकरे उद्या कुणावर तोफ डागणार? याची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे.
जर कोणी अयोध्येला आला संत महात्मांबरोबर मारपीट झाली तर चॅनलचा टीआरपी वाढणारच मी काय करू शकतो. हनुमानजी सद्बुद्धी द्यावी, माफी मागा आणि आयोध्येला या, बृजभूषण सिंह म्हणाले.
तब्बल 49 वर्षे हिंदुस्तानवर राज्य करणाऱ्या औरंगजेबाचे अखेरचे क्षण अहमदनगरच्या भिंगार परिसरात गेले. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या घडामोडींचा साक्षीदार होण्याची संधी तेव्हा भिंगार शहराला मिळाली. याच मोगल साम्राज्याचा डोलारा त्या क्षणापासून ढासळायला सुरूवात झाली. त्यावेळी औरंगजेब भिंगार परिसरातच वास्तव्यास होता.
गुंतवणूकदारांचे पैसे परत न केल्याप्रकरणी गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती संदीप कुमार यांनी सुब्रत रॉय यांना शुक्रवारी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. सुब्रत रॉय प्रत्यक्षरित्या आले नाहीत, तर त्यांच्या अटकेचे वॉरंट जारी करण्यात येईल, असेही न्यायालयाने म्हटले होते.
अपघातात हेलिकॉप्टरमधील दोन पायलट गंभीर जखमी झाले होते. त्यांना ताबडतोब जवळच्या खाजगी रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र तेथे उपचार सुरु करण्याआधी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कॅप्टन गोपाल कृष्ण पांडा आणि कॅप्टन ए पी श्रीवास्तव अशी मृत पायलटची नावे आहेत.
सुनीलने बुधवारी सुट्टी घेतली होती. त्यानंतर तो आधी किलोई गावात त्याच्या घरी गेला. त्यानंतर भलोथ गावात त्याचे सर्व्हिस स्टेशन होते, तो त्याच्या सर्व्हिस स्टेशनवर गेला. संध्याकाळी तो आधी दारू प्यायला आणि नंतर त्याच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडली. माहिती मिळताच पोलीस आणि एफएसएल टीम घटनास्थळी पोहोचली.