AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NED Pitch Report: भारत नेदरलँड सामन्यात खेळपट्टी कोणाला मदत करणार? जाणून घ्या

India vs Netherland T20 World cup 2026 Pitch Report: टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील 36वा सामना भारत आणि नेदरलँड यांच्यात होत आहे. या सामन्यात भारताचं पारडं जड आहे. दुसरीकडे, सुपर 8 फेरीचं गणितही सुटलं आहे. भारतीय मोकळेपणाने खेळणार यात काही शंका नाही.

IND vs NED Pitch Report: भारत नेदरलँड सामन्यात खेळपट्टी कोणाला मदत करणार? जाणून घ्या
IND vs NED Pitch Report: भारत नेदरलँड सामन्यात खेळपट्टी कोणाला मदत करणार? जाणून घ्याImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Feb 17, 2026 | 9:56 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना भारत नेदरलँडविरुद्ध खेळणार आहे. हा सामना औपचारिक असणार आहे. कारण नेदरलँडचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. तर भारताने सुपर 8 फेरीत स्थान पक्कं केलं आहे. त्यामुळे या सामन्याचा निकालाचा गुणतालिकेवर काहीच फरक पडणार नाही. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्याचा फरक पडत नसला तर भारतीय संघ विजयी घोडदौड कायम ठेवण्यासठी प्रयत्नशील असेल. भारताने साखळी फेरीत अमेरिका, नामिबिया आणि पाकिस्तान यांना पराभूत केलं आहे. आता नेदरलँडचं आव्हान असणार आहे. भारत आणि नेदरलँड्स हे संघ फक्त एकदाच टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळले आहेत. टी20 वर्ल्डकप 2022 स्पर्धेत हे दोन्ही संघ भिडले होते. तेव्हा भारताने 56 धावांनी मात दिली होती. हा दोन्ही संघांमधील दुसरा सामना असेल.

खेळपट्टी कोणाला साथ देणार?

अहमदाबादचं नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील मोठ्या मैदानापैकी एक आहे. या ठिकाणी चौकार षटकारांची सीमा थोडी लांब आहे. असं असलं तरी खेळपट्टी फलंदाजांना पूरक आहे. त्यामुळे या खेळपट्टी मोठी धावसंख्या उभारता येईल. फिरकीपटूंना थोडी फार मदत मिळू शकते. वेगवान गोलंदाजांनी लाईन अँड लेंथ पकडून गोलंदाजी केली तर फलंदाज अडचणीत येऊ शकतात. या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करणारा संघ 175 ते 190 धावा करू शकतो. पण दव फॅक्टर पाहता नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा स्वीकार केला जाईल. कारण दुसऱ्या डावात धावांचा पाठलाग करणं सोपं असणार आहे.

हवामान अहवाल

सामन्याच्या दिवशी अहमदाबादमध्ये उष्ण हवामान राहण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे पावसामुळे खंड वगैरे पडेल असं होणार नाही. हा सामना पूर्ण खेळला जाईल. दिवसाचे तापमान सुमारे 30 अंश सेल्सिअस आणि रात्री थंड हवामान 23 अंश सेल्सिअसच्या खाली जाईल. तापमान पाहता दुसऱ्या डावात दव पडेल हे जवळपास नक्की आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल हा महत्त्वाचा ठरणार आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...