AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2026: अभिषेक शर्मा नेदरलँडविरुद्ध करणार कमाल! तर बुमराहबाबत मोठी अपडेट

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताचं सुपर 8 फेरीचं गणित सुटलं आहे. त्यामुळे भारतीय संघ साखळी फेरीत नेदरलँडविरुद्ध औपचारिक सामना खेळणार आहे. या सामन्यात भारतीय संघाच्या प्लेइंग 11 मध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

T20 World Cup 2026: अभिषेक शर्मा नेदरलँडविरुद्ध करणार कमाल! तर बुमराहबाबत मोठी अपडेट
T20 World Cup 2026: अभिषेक शर्मा नेदरलँडविरुद्ध करणार कमाल! तर बुमराहबाबत मोठी अपडेटImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Feb 17, 2026 | 9:32 PM
Share

India vs Netherlands: टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील साखळी फेरीत भारताचा शेवटचा सामना नेदरलँडशी होणार आहे. या सामन्यात तसा काही जोर नाही. पण सुपर 8 फेरीपूर्वी घडी बसवण्यासाठी टीम इंडियाला सराव असणार आहे. त्यामुळे या सामन्यात टीम इंडियात काही बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. प्लेइंग 11 मध्ये एखाद दुसरा बदल होऊ शकतो. याबाबत टीम इंडियाचे फलंदाज प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी काही हिंट दिल्या आहेत. या सामन्यात जसप्रीत बुमराह खेळणार की नाही? तसेच अभिषेक शर्माच्या फॉर्मबाबतही त्यांनी वक्तव्य केलं आहे. सितांशु कोटक यांनी स्पष्ट सांगितलं की, जसप्रीत बुमराहला नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात आराम दिला जाणार नाही. बुमराहाने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात कमाल गोलंदाजी केली होती. त्याने सुरुवातीच्या दोन षटकात दोन विकेट काढल्या होत्या. त्यामुळे पाकिस्तानवर दबाव वाढला आणि पराभवाच्या दरीत ढकलले गेले.

सितांशु कोटक यांनी सांगितलं की, ‘मला वाटत नाही की बुमराह आराम करे. आम्ही या बाबतचा निर्णय नंतर घेऊ.’ तसेच अभिषेक शर्माबाबत त्यांनी स्पष्ट काय ते सांगून टाकलं. त्यांनी सांगितलं की, अभिषेक शर्मा अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात आजारी पडला होता. आम्हाला विश्वास आहे की तो चांगली कामगिरी करेल. अभिषेक शर्माने त्याचा प्लान तयार केला आहे. अभिषेक शर्मा लवकरच मोठी खेळी करेल. दरम्यान, अभिषेक शर्माचा फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय आहे. टी20 क्रिकेटमध्ये अव्वल असलेल्या फलंदाजाला टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खातंही खोलता आलेलं नाही. अमेरिकेविरुद्ध पहिल्या चेंडूवर आणि पाकिस्तानविरुद्ध 4 चेंडू खेळून शून्यावर बाद झाला होता. न्यूझीलंड मालिकेपासून आतापर्यंत चार वेळा शून्यावर बाद झाला आहे.

भारताचा डावखुरा फलंदाज इशान किशन सध्या फॉर्मात आहे. त्याने पाकिस्तानविरुद्ध 40 चेंडूत 77 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे विजयाचं गणित सोपं झालं. इशान किशनच्या फलंदाजीवर सितांशु कोटक यांनी स्तुतीसुमनं उधळली. त्यांनी सांगितलं की, इशान किशनकडे आत्मविश्वा, आहे. त्याची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. त्याची विचार करण्याची पद्धत टी20 क्रिकेटमध्ये कामी येत आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...