AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India : श्रेयस अय्यर टीम इंडियाचा 15वा टी 20i कॅप्टन, सर्वात यशस्वी कोण?

Team India 1st T20i Captain : टीम इंडियाचा सर्वात पहिला टी 20I कर्णधार कोण होता? सर्वाधिक टी 20i सामन्यात कोणत्या कर्णधारने भारताचं नेतृत्व केलंय? जाणून घ्या

Team India : श्रेयस अय्यर टीम इंडियाचा 15वा टी 20i कॅप्टन, सर्वात यशस्वी कोण?
Shreyas Iyer Team IndiaImage Credit source: @ShreyasIyer15
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jul 03, 2026 | 1:00 AM
Share

श्रेयस अय्यर भारताचा 15 वा टी 20I कर्णधार म्हणून नेतृत्व करत आहे. श्रेयसने आयर्लंड विरूद्धच्या टी 20I मालिकेतून कर्णधारपदाची सूत्र स्वीकारली. श्रेयस भारताला त्याच्या नेतृत्वात आयर्लंड विरुद्ध मालिका जिंकून देण्यात अपयशी ठरला. भारताला आयर्लंडकडून 0-2 अशा एकतर्फी फरकाने पराभूत व्हावं लागलं. त्यानंतर आता टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर आहे. उभयसंघात 5 सामन्यांची टी 20I मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील पहिला सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला. तर दुसरा सामना हा शनिवारी 4 जुलैला होणार आहे. या निमित्ताने आपण भारताचं नेतृत्व करणाऱ्या याआधीच्या 14 कर्णधारांबाबत जाणून घेणार आहोत.

टी 20I टीम इंडियाचा पहिला कॅप्टन कोण?

टीम इंडियाने 2006 साली पहिला टी 20I सामना खेळला होता. या पहिल्या सामन्यात वीरेंद्र सेहवाग याने भारताचं नेतृत्व केलं होतं. या सर्वात छोट्या फॉर्मेटमध्ये भारताने विजय मिळवला होता. त्यानंतर महेंद्रसिंह धोनी याला कर्णधार करण्यात आलं होतं. महेंद्रसिंह धोनी याने त्याच्या नेतृत्वात आयसीसीचा पहिलाच टी 20I वर्ल्ड कप जिंकून दिला होता.

महेंद्रसिंह धोनी भारताचं सर्वाधिक सामन्यांत नेतृत्व करणारा कर्णधार राहिला. धोनीसह एकूण 14 कर्णधारांनी भारताचं किती टी 20I सामन्यांत नेतृत्व केलं? हे आपण जाणून घेऊयात.

भारताचे टी 20i कर्णधार, किती सामन्यांत नेतृत्व?

वीरेंद्र सेहवाग : 1 सामना

महेंद्रसिंह धोनी : 72 सामने

सुरेश रैना : 3 सामने

अजिंक्य रहाणे : 2 सामने

विराट कोहली : 50 सामने

रोहित शर्मा : 62 सामने

शिखर धवन : 3 सामने

ऋषभ पंत : 5 सामने

हार्दिक पंड्या : 16 सामने

केएल राहुल : 2 सामने

जसप्रीत बुमराह : 2 सामने

ऋतुराज गायकवाड : 3 सामने

सूर्यकुमार यादव : 52 सामने

शुबमन गिल : 5 सामने

टीम इंडियाचे टी 20i वर्ल्ड कप विजेते कर्णधार

भारताला आतापर्यंत एकूण 3 कर्णधारांनी टी 20i वर्ल्ड कप जिंकून दिला आहे. त्यापैकी दोघे हे मुंबईकर आहेत. महेंद्रसिंह धोनी याच्यानंतर 2024 साली रोहित शर्मा याने भारताला टी 20i वर्ल्ड कप जिंकून दिला. तर सूर्याने रोहितचा वारसा यशस्वीपणे कायम ठेवत भारताला 2026 साली वर्ल्ड चॅम्पियन केलं. त्यानंतर सूर्याकडून कर्णधारपद काढून ते श्रेयसला देण्यात आलं आहे. आता श्रेयस भारताच्या नेतृत्वाची जबाबदारी कशी सांभाळतो हे येत्या काळात स्पष्ट होईल.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा