AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aamir Khan And Gauri Wedding : वाजवा रे वाजवा… आमिरच्या तिसऱ्या लग्नाला थेट विदेशी पाहुणे, 150 वऱ्हाडींचाही समावेश; लग्न या ठिकाणी होणार…

बॉलिवूड अभिनेता आमिर खान 5 जुलै रोजी गौरी स्प्रैटसोबत तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार आहे. बांद्र्यातील त्याच्या घरीच हा छोटेखानी सोहळा होणार असून, केवळ 150 वऱ्हाडी उपस्थित राहतील, ज्यात परदेशी पाहुणे आणि माजी पत्नी व मुलांचाही समावेश आहे. आमिरने सर्वांचे आशीर्वाद मागितले आहेत.

Aamir Khan And Gauri Wedding : वाजवा रे वाजवा... आमिरच्या तिसऱ्या लग्नाला थेट विदेशी पाहुणे, 150 वऱ्हाडींचाही समावेश; लग्न या ठिकाणी होणार...
Aamir khan and gauri sprattImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jul 02, 2026 | 11:36 PM
Share

भारती दुबे, प्रतिधिनिधी, Aamir Khan And Gauri Spratt Wedding Details : बॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान तिसरं लग्न करतोय. येत्या 5 जुलै रोजी आमिर खान गौरी स्प्रैट सोबत विवाह बंधनात अडकणार आहे. आमिरने गेल्या महिन्यात स्वत: गौरीशी लग्न करणार असल्याचं जाहीर केलं होतं. पण लग्न कधी होणार याची तारीख ठरलेली नव्हती. आता तारीखही समोर आली आहे. त्यामुळे आमिरच्या तिसऱ्या लग्नाकडे बॉलिवूडच नव्हे तर त्याच्या चाहत्याचीही नजर लागली आहे.

टीव्ही9ला आमिरच्या लग्नाची बित्तंबातमी मिळाली आहे. आमिरचं लग्न कोणत्याही पॅलेसमध्ये, पंचतारांकित हॉटेलात किंवा लॉनवर होणार नाहीये. तर बांद्रा येथील आपल्या राहत्या घरीच आमिर विवाहबद्ध होणार आहे. आमिरच्या लग्नाला फक्त 150 वऱ्हाडी असणार आहेत. यातील बहुतेक पाहुणे हे आमिरचे नातेवाईक असणार आहे. तर काही पाहुणे विदेशातून येणार आहेत. काही खास आणि जवळची मित्रमंडळीही लग्नाला हजर राहणार आहे. विशेष म्हणजे आमिरच्या आधीच्या दोन बायका आणि त्यांची मुलंही या लग्नात दणक्यात सहभाग घेणार आहेत.

आमच्यासााठी…

मिळालेल्या माहितीनुसार, आमिर खान 5 जुलै रोजी दुपारच्या आधीच लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. लग्नाच्या पार्श्वभूमीवर आमिरने एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यात त्याने त्याच्या लग्नावर भाष्य केलं होतं. पाच जुलै रोजी लग्न होत आहे. अत्यंत छोटा सोहळा असणार आहे. घरीच लग्न सोहळा उरकणार आहोत. 5 जुलै हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आमच्यासाठी. फक्त दोन परिवार सामिल होणार आहे. काही दोस्त मंडळी येणार आहेत. आम्हाला लोकांचा आशीर्वाद हवा आहे. तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या. आम्ही आनंदी राहावं आणि आमचं वैवाहिक आयुष्य सुखी जावं यासाठी तुम्ही प्रार्थना करा, असं आमिर या व्हिडिओत बोलताना दिसत आहे.

तिसरं लग्न…

हे आमिर खानचं तिसरं लग्न आहे. त्याचं पहिलं लग्न रिना दत्ताशी 1986मध्ये झालं होतं. 2002मध्ये दोघांचा तलाक झाला. 2005मध्ये आमिर खानने किरण रावसोबत लग्न केलं. 2021मध्ये दोघे वेगळे झाले. दोन्ही बायकांशी तलाक होऊनही त्याचे दोघींशी चांगले संबंध आहेत. आमिरचं हे तिसरं लग्न असलं तरी गौरीचंही हे दुसरं लग्न आहे. गौरीला एक सात वर्षाचा मुलगा आहे. आमिर खानलाही तीन मुलं आहे. पहिल्या बायकोकडून जुनैद खान आणि इरा खान ही दोन मुले तर दुसऱ्या बायकोकडून आजाद हा मुलगा आहे.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान