राहुल गांधींचा पुणे दौरा स्क्रिप्टेड, पेड; प्रवीण दरेकरांची काँग्रेसवर टीका
पुणे | प्रतिनिधी: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पुण्यात झालेल्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी जोरदार टीका केली आहे. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी नसून “स्क्रिप्टेड आणि पेड पोलिटिकल इव्हेंट” असल्याचा आरोप त्यांनी केला. दरेकर म्हणाले, राहुल गांधी यांच्या भाषणातून, मांडलेल्या विषयांतून आणि दाखवण्यात आलेल्या व्हिडिओ क्लिप्समधून सत्तेविरोधी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न झाला. […]
पुणे | प्रतिनिधी: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पुण्यात झालेल्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी जोरदार टीका केली आहे. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी नसून “स्क्रिप्टेड आणि पेड पोलिटिकल इव्हेंट” असल्याचा आरोप त्यांनी केला.
दरेकर म्हणाले, राहुल गांधी यांच्या भाषणातून, मांडलेल्या विषयांतून आणि दाखवण्यात आलेल्या व्हिडिओ क्लिप्समधून सत्तेविरोधी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न झाला. काँग्रेसकडून विद्यार्थ्यांच्या आणि तरुणाईच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचे राजकारण सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
राहुल गांधी यांच्या माध्यमातून पुण्यात हा संपूर्ण कार्यक्रम राजकीय हेतूने आयोजित करण्यात आल्याचा दावा करत दरेकरांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
Published on: Aug 23, 2026 08:30 PM
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या...
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते...
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला- सुप्रिया सुळे

