AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारचं महत्वाचं पाऊल, कांद्याच्या दरात मोठी घसरण होणार; सर्वसामान्यांना दिलासा मिळणार

सरकारचं सर्वात महत्वाचं पाऊल उचलणार आहे. त्यामुळे कांद्याच्या दरात मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.

सरकारचं महत्वाचं पाऊल, कांद्याच्या दरात मोठी घसरण होणार; सर्वसामान्यांना दिलासा मिळणार
onion price hike Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Aug 24, 2026 | 8:47 AM
Share

सध्या बाजारात कांद्याचा दरात मोठी वाढ झाली आहे. साखर, कांदासहित जीवनावश्यक वस्तू महागल्याने सर्वसामान्यांचं आर्थिक बजेट बिघडलं आहे. देशातील विविध भागात कांद्याच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सरकार आता वाढलेल्या कांद्याच्या किंमतींवर नियंत्रण मिळवण्यासाठी बफर स्टॉकमधील साठवलेला कांदा बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. या निर्णयाने जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे.

कांद्याचा किरकोळ भाव जवळपास 42 रुपयांवर पोहोचला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत 45 टक्के आणि मागील महिन्याच्या तुलनेत 19 टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे कांद्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. दिल्लीत कांदा 65 रुपयांना विकला जात आहे. चेन्नईत कांद्याची विक्री 58 रुपयांना केली जात आहे. भारतातील विविध भागात कांद्याच्या दरात वाढ झाल्याचे समोर येत आहे.

बफर स्टॉकमधील कांदा बाजारात का आणला जातोय?

सरकार स्वत:जवळ काही वस्तूंचा साठा करून ठेवते. त्याला बफर स्टॉक म्हटले जाते. बाजारात कोणत्याही वस्तूंची कमतरता निर्माण झाली, त्याची किंमत वाढायला सुरुवात होते. तसाच प्रकार कांद्याचाही झाला आहे. बाजारात कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सरकार बफर साठ्याचा वापर करू इच्छित आहे. सरकारच्या बफर साठ्यामुळे कांद्याच्या दरात घसरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे. बफर साठ्यातील कांदा देशातील विविध भागातल पाठवला जाईल.

कांदा एक्स्रप्रेस काय आहे?

कांदा एक्स्प्रेस ऑक्टोबर 2024 मध्ये सुरू करण्यात आली. ही खास ट्रेन महाराष्ट्रातील नाशिकमधून दिल्ली, गुवाहाटी, लखनौ सारख्या देशात बफर साठ्यातील कांदा पोहोचवते. आता ही कांदा एक्स्प्रेस पुन्हा एकदा धावणार आहे. यामुळे कांदा आता नाशिकहून दिल्ली, चेन्नई, कोच्ची आणि गुवाहाटी भागात पोहोचवला जाईल. ज्या भागात कांद्याची कमतरता आहे, त्याच भागात कांद्याचा पुरवठा केला जाणार आहे. हा कांद्याचा साठा कमी वेळेत निश्चित ठिकाणी पोहोचणार आहे. सरकार केवळ बफर साठ्यांवर अवलंबून नाही. तर पुढील महिन्यात शेतकऱ्यांच्या साथीनेही नवा कांदा बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. बाजारातील कांद्याच्या दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार शेतकऱ्यांची देखील मदत घेण्यास तयार असल्याचे जाहीर केलं आहे.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे