AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जग हादरलं! सौदी अरेबियाच्या रियाद विमानतळावर मोठा हल्ला, थेट 300 लोक..

सौदी अरेबियाच्या रियाद विमानतळावर मोठा हल्ला करण्यात आला. ज्याने एकच खळबळ उडाल्याचे बघायला मिळत आहे. यात काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. हेच नाही तर काहींचा जीव गेला असून तणाव वाढला आहे.

जग हादरलं! सौदी अरेबियाच्या रियाद विमानतळावर मोठा हल्ला, थेट 300 लोक..
Saudi Arabi Riyadh airport
| Updated on: Oct 11, 2026 | 7:15 AM
Share

सौदी अरेबियाच्या रियाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर धक्कादायक घटना घडली. शनिवारी जोरदार धमाका झाला. हा फक्त धमाकाच नाही तर या हल्ल्यात काही लोकांचा जीव गेला. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात 300 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी काही लोकांची स्थिती अधिक गंभीर आहे. यात बांगलादेश, जॉर्डन, एजिट, फिलिसस्तीन, सीरिया आणि सुडानच्या नागरिकांचा समावेश आहे. रिपोर्टनुसार, हूतिनी हा हल्ला केला. ज्याने तणाव वाढला. पुढील दिवसात तणाव अधिक वाढण्याचे संकेत आहेत. हा हल्ल्यानंतर काही प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आले. हेच नाही तर यानंतर एतिहाद आणि कतार एअरवेजने आपले अनेक उड्डाणे रद्द केली. फ्लाईट साईट फ्लायटरडारा 24 नुसार, या हल्ल्यानंतर रियाद जाणारे सर्व विमाने रद्द करण्यात आली.

त्यांना दुसरीकडे पाठवण्यात आले. हेच नाही तर विमानतळावर येण्यापूर्वी प्रवाशांना संबंधित एअरलाईन्ससोबत संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले. या हल्ल्याबाबत सौदी अरेबियाने काही भाष्य केले नाही. रियाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हेलिकॉप्टर उडताना दिसले. 12 लोकांचा जीव या हल्ल्यात गेल्याची प्राथमिक माहिती मिळतंय.

यमनच्या लाल समुद्र आणि महत्वाच्या परिसरात बाब अल मंडेल मार्गात मोखा बंदरावही हूती गट सक्रिय आहे. त्यातच आता सौदी अरेबियाला टार्गेट करताना हूती दिसत आहेत. आता यावर सौदी अरेबिया नक्की काय भूमिका घेते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून हा संघर्ष प्रचंड वाढल्याचे बघायला मिळतंय.

यमनचे हूतींविरोधात सुरू असलेले युद्ध हे मोठ्या संघर्षमय वळणावर येऊन ठेपले आहे. आंतरराष्ट्रीय मान्यता असलेल्या यमनी सरकारच्या सैन्याने इराण समर्थित हुतींविरोधात मोठी सैन्य कारवाई सुरू केली आहे. यमनी सरकारच्या सैन्याने धुबाब एअरपोर्टवर ताबा मिळवल्याचा दावा केला आहे. त्याच आता संघर्ष वाढला आहे. सौदी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, रियाद विमानतळावरील हल्ल्यात 12 जण ठार झाले असून मोठ्या संख्येने प्रवासी जखमी आहेत. ज्यामुळे आता मोठी खळबळ उडाली आहे.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे