AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाहरुख खान आणि अजय देवगण यांची गय नाहीच, तुकाराम मुंढे यांचा मोठा इशारा, थेट कायदा..

अन्न व औषध प्रशासन आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी कारभार स्वीकारल्यापासून राज्यभरात मोठ्या कारवाया केल्या जात आहेत. त्यातच आता तुकाराम मुंढे यांनी मोठा इशारा बॉलिवूड कलाकारांना दिला आहे. तीन कलाकारा चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

शाहरुख खान आणि अजय देवगण यांची गय नाहीच, तुकाराम मुंढे यांचा मोठा इशारा, थेट कायदा..
Bollywood actors and Tukaram Mundhe
| Updated on: Oct 11, 2026 | 7:45 AM
Share

अन्न व औषध प्रशासन आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी कारभार स्वीकारल्यापासून राज्यभरात मोठ्या कारवाया केल्या जात आहेत. भेसळखोरांचे धाबे दणाणली आहेत. काही दिवसांपूर्वीच FDA ने पान मसाला ब्रँडच्या कथित सरोगेट जाहिरातींप्रकरणी बॉलिवूडमधील तीन टॉपच्या कलाकारांना नोटीस बजावलेली. यात शाहरूख खान, अजय देवगण, टायगर श्रॉफ यांचा समावेश आहे. ज्यानंतर एकच खळबळ उडाली. तुकाराम मुंढे यांनी आपला मोर्चा थेट बॉलिवूड कलाकारांकडे वळवला. काही दिवस तुकाराम मुंढेंच्या या नोटीसला कलाकारांनी उत्तर दिले नाही. त्यानंतर त्यांच्याकडून उत्तर देण्यात आले. तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले की, कोणीही असो कारवाई होणारच. पान मसाल्याच्या जाहिरातीवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी केल्या काही दिवसांपासून सातत्याने केली जात होती. त्यानंतर या कलाकारांना नोटीस पाठवण्यात आली.

यादरम्यानच आता तुकाराम मुंढे यांनी मोठा इशारा दिला. या नोटीसला कलाकारांनी उत्तर दिलेले असतानाच तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले की, कायदा हा सर्वांसाठीच एकसारखा आहे. कोणालाही सोडले जाणार नाही. नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचे पालन करून अंतिम निर्णय घेण्यापूर्वी किंवा पुढील कठोर कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी संबंधित अभिनेत्यांना पुन्हा एकदा आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाईल, असेही तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले.

तुकाराम मुंढे यांनी इंडिया टुडे कॉन्क्लेव 2026 मध्ये बोलताना म्हटले की, संबंधित कलाकारांचे उत्तर मिळाले आहे. त्यांनी सांगितले की, या प्रक्रियेचा एक भाग म्हणून पुढील कारवाई करण्यापूर्वी एफडीएसंबंधित घटकांना त्यांची बाजू मांडण्याची किंवा त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची आणखी एक संधी देईल. हे विभाग आपल्या कायदेशीर अधिकारांच्या कक्षेत राहून काम करत आहे. पुढील कार्यवाही लागू असलेल्या कायदेशीर चौकटीच्या आधारे निश्चित केली जाईल.

म्हणजेच काय तर या कलाकारांच्या अडचणी काही कमी होणार नसल्याचे स्पष्ट आहे. यादरम्यान तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले की, कलाकारांनी कोणतीही जाहिरात करण्यापूर्वी सावध असणे आवश्यक आहे. कारण त्या जाहिरातीची जबाबदारी त्या संबंधित कलाकारांची असते. अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2026 चे कलम 24 आणि 2018 मधील जाहिरातविषयक नियमांचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, जाहिरातीचे समर्थन करणाऱ्या व्यक्तीची जबाबदारी असल्याचे म्हटले.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे