AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kavya Maran Reception Dress: 500 कोटींची मालकीण काव्या मारनच्या रिसेप्शन गाऊनची चर्चा; किंमत किती? मोती अन् चांदीच्या ताराने सजवला ड्रेस

Kavya Maran Reception Dress: IPL मधील संघ सनरायझर्स हैदराबाद(SRH)ची मालकीण काव्या मारन नुकताच लग्नबंधनात अडकली. तिने लग्नाच्या रिसेप्शनला घातलेल्या ड्रेसची चर्चा रंगली आहे.

Kavya Maran Reception Dress: 500 कोटींची मालकीण काव्या मारनच्या रिसेप्शन गाऊनची चर्चा; किंमत किती? मोती अन् चांदीच्या ताराने सजवला ड्रेस
Kavya Maran Reception Dress priceImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 23, 2026 | 2:57 PM
Share

प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंदर आणि IPL मधील संघ सनरायझर्स हैदराबाद(SRH)ची मालकीण काव्या मारन यांनी शनिवारी (२१ नोव्हेंबर) झालेल्या रिसेप्शननंतर, रविवारी (२२ नोव्हेंबर) चेन्नईत आणखी एक रिसेप्शन ठेवले. आधीच्या संध्याकाळप्रमाणे रविवारचे सेलिब्रेशनही स्टार्सने सजलेले होते. या दुसऱ्या रिसेप्शनसाठी दोघांनी वेगळे लुक निवडले. सध्या सगळीकडे काव्याच्या या लूकची चर्चा रंगली आहे.

शनिवारी हाय-नेक डार्क रेड ड्रेसमध्ये सर्वांचे लक्ष वेधल्यानंतर, रविवारच्या रिसेप्शनसाठी काव्याने फ्लोअर टच व्हाईट गाउन घातला. या ड्रेसवर चांदी आणि पांढऱ्या मोत्यांचे बारीक काम, सिक्विन्स आणि ३डी फुलांची एम्ब्रॉयडरी होती, जी त्याला एक शानदार आणि चमकदार लुक देत होती. काव्याच्या या गाऊनची किंमत किती आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

काव्या मारनचा लूक

सनरायझर्स हैदराबादच्या सीईओ काव्याने या गाउनसोबत डायमंड चोकर घातला आणि बाकी अॅक्सेसरीज खूप साध्या ठेवल्या. म्युझिक कंपोझर अनिरुद्धने सॅटिन पीक लॅपल्स असलेला एक शानदार पांढरा ब्लेझर घातला होता. तो त्यांनी ब्लॅक ट्राउझरसोबत मॅच केला. लुकव्यतिरिक्त पाहुण्यांबद्दल बोलायचे झाल्यास गेस्ट लिस्ट स्टार स्टडेड होती.

पाहुण्यांमध्ये रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचा समावेश होता, जे एकत्र पोहोचले आणि नव्या जोडप्यासोबत फोटो काढले. याशिवाय नयनतारा आणि विग्नेश शिवन, राम्या कृष्णन, सुपरस्टार रजनीकांत, अजीत कुमारही या उत्सवात उपस्थित होते, जिथे दोघांना एकमेकांना प्रेमाने मिठी मारताना पाहिले गेले. याशिवाय क्रिकेटर एमएस धोनीही या रिसेप्शनला उपस्थित होते. इव्हेंटच्या फोटोंमध्ये त्यांना रजनीकांत आणि त्यांच्या पत्नी लता रजनीकांत यांच्यासोबत गप्पा मारताना दिसले होते. एटली, लोकेश कनगराज, नेल्सन दिलीपकुमार आणि शंकरही नव्याने लग्न झालेल्या जोडप्याला आशीर्वाद आणि गुडविशेज देणाऱ्या पाहुण्यांमध्ये होते. सांगण्यात येते की या जोडप्याने ११ नोव्हेंबरला ग्रीसमध्ये एका इंटिमेट सेरेमनीत लग्न केले होते.

Follow Us
अजित पवारांवरील विधानावरून मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावल
Hasan Mushrif : अजित पवारांवरील विधानावरून हसन मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावलं...
38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ
Jalna : 38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ, नेमकं काय घडलं?
भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा...
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा दाखल
त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; शिरसाटांच्या दाव्याने खळबळ
Sanjay Shirsat : त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; संजय शिरसाटांच्या दाव्याने राजकारणात खळबळ
असा विरोधी पक्षनेता असतो का? गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
Girish Mahajan on Rahul Gandhi : असा विरोधी पक्षनेता असतो का? मतचोरीच्या आरोपांवर गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
कोल्हापुरात मध्यरात्री भीषण अपघात; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या
Kolhapur : कोल्हापुरात मध्यरात्री ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या कारखाली येऊन दोघा भावांचा मृत्यू
आरोप सिद्ध झाले नाहीत तर..; नार्वेकरांचा संजय राऊतांना इशारा
Rahul Narvekar on Sanjay Raut : आरोप सिद्ध झाले नाहीत तर..; नार्वेकरांचा संजय राऊतांना इशारा
शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढणार, रोहित पवारांची घोषणा; बावनकुळे म्हणाले...
Rohit Pawar : शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढणार, रोहित पवारांची घोषणा; बावनकुळे म्हणाले सरकार...
अमेरिका-चीननंतर भारताचा जगात तिसरा क्रमांक; लोवी इन्स्टिट्यूटच्या....
Super Power India : अमेरिका-चीननंतर भारताचा जगात तिसरा क्रमांक; लोवी इन्स्टिट्यूटच्या अहवालात भारताचा दबदबा कायम
योजना बंदही करता येत नाही, चालवणंही आव्हानात्मक; लाडकी बहीण योजनेवरून
Ladki Bahin Yojana : योजना बंदही करता येत नाही, चालवणंही आव्हानात्मक; लाडकी बहीण योजनेवरून नरहरी झिरवाळांनी मांडली सरकारची अडचण