AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Success Story : कारच्या डिक्कीतून बिझनेस उभारला, अवघ्या 3,000 रूपयांच्या गुंतवणूकीतून महिन्याभरात कमावले 6 लाख

नोकरी सांभाळून स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा, असं अनेक जण ठरवतात. पण दिवसभर ऑफिसमध्ये काम केल्यानंतर पुन्हा व्यवसायासाठी वेळ काढणं काही सोपं नसतं. मात्र एका जोडप्याने अवघ्या 3,000 रूपयांच्या महिन्याभरात 6 लाखांचा व्यवसाय उभा केला आहे.

Success Story : कारच्या डिक्कीतून बिझनेस उभारला, अवघ्या 3,000 रूपयांच्या गुंतवणूकीतून महिन्याभरात कमावले 6 लाख
cold coffee news Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Nov 23, 2026 | 2:42 PM
Share

नोकरी सांभाळून स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा, असं अनेक जण ठरवतात. पण दिवसभर ऑफिसमध्ये काम केल्यानंतर पुन्हा व्यवसायासाठी वेळ काढणं काही सोपं नसतं. मात्र अहमदाबादमधील दर्शन आणि श्रुती जिंजुवाडिया या जोडप्याने हीच कसरत करत स्वत:चा व्यवसाय उभा केला. सुरूवातीला ना मोठं दुकान, ना महागडं मशिनरीचं सेटअप! फक्त 2 ते 3, 000 रूपयांची गुंतवणूक आणि स्वत:ची कार. कारच्या डिक्कीतून घरगुती कोल्ड कॉफी आणि कोल्ड कोको विकण्यास त्यांनी सुरूवात केली. त्यांच्या द कोको स्टेशन’ या व्यवसायाने अवघ्या दीड वर्षात 36 लाख रूपयांहून अधिक कमाई केली आहे.

दर्शन हे सॉफ्टवेअर इंजिनीअर, तर श्रुती MBA आहेत. जुलै 2025 मध्ये मित्रांच्या सल्लानंतर त्यांनी हा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. सुरूवातीला घरच्या घरी कोल्ड कोकोच्या फक्त 14 बाटल्या तयार केल्या. विशेष म्हणजे विक्री सुरू केल्यानंतर अवघ्या 40 मिनिटांच या सर्व बाटल्या संपल्या. पहिल्याच दिवशी मिळालेल्या प्रतिसादामुळे दोघांचाही उत्साह वाढला आणि त्यांनी नियमितपणे हा व्यवसाय करण्याचं ठरवलं.

दिवसभर दोघेही आपापल्या नोकऱ्या करायचे. संध्याकाळी दर्शन ऑफिसमधून परतल्यानंतर रात्री 9 ते 12 या वेळेत ते कार घेऊन विक्रीसाठी बाहेर पडायचे. अहमदाबादमधील गोटा परिसरात त्यांनी कारच्या डिक्कीतून कोल्ड कॉफी आणि कोल्ड कोको विकायला सुरूवात केली. सोशल मिडिया आणि ग्राहकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे मागणी वाढू लागली, मग श्रुतीनेही नोकरी सोडली आणि व्यवसायाला पूर्ण वेळ दिला. व्यवसायाला मिळणारा प्रतिसाद पाहून श्रुतीने आपली नोकरी सोडली.पेये तयार करण्यात वेळ घालवला आणि दररोज रात्री ती विकली.

रोजची विक्री 20,000 रूपयांपर्यंत

एकेकाळी रोज फक्त 14 बाटल्या विकणाऱ्या या व्यवसायाची विक्री आता 150 बाटल्यांपर्यंत पोहोचली. द कोको स्टेशन ची दररोजची विक्री जवळपास 20,000 रूपयांइतकी आहे. दर महिन्याला ही कमाई 6 लाख रूपयांपर्यंत जाते. दीड वर्षात या व्यवसायाने 36 लाख रूपयांचा गल्ला जमावला आहे. तर नवरात्रीच्या दिवसात त्यांनी 7,500 पेक्षा जास्त बाटल्या विकल्या होत्या. इतकंच नाही तर नव्या उद्योजकांकडून प्रीमिक्स पावडरला मागणी मिळू लागल्यानंतर त्यांनी रेडी- टू – यूज प्रीमीक्स पावडरची विक्रिही सुरू केली.

कारच्या डिक्कतून स्वत:च्या दुकानांपर्यंत प्रवास

या व्यवसायासाठी दर्शन आणि श्रुती यांनी कोणत्याही बाहेरील गुंतवणूतकीचा आधार घेतलेला नाही. व्यवसायातून मिळणाऱ्या नफ्यातूनच त्यांनी तो पुढे नेला आहे. आता कारच्या डिक्कीतून सुरू झालेला प्रवास आता मोठ्या आउटलेटपर्यंत येऊन थांबणार आहे. पुढील 4 ते 5 नवीन आउटलेट सुरू करण्याचं लक्ष आहे.

अवघ्या काही हजार रूपयांत सुरू केलेला व्यवसाय, पहिल्याच दिवशी मिळालेला प्रतिसाद आणि नोकरी सांभाळून केलेली मेहनत.. या सगळ्याच्या जोरावर दर्शन आणि श्रुती यांनी कारच्या डिक्कीतून स्वत:च्या ब्रँडोपर्यंतचा प्रवास सुरू केला आहे.

Follow Us
अजित पवारांवरील विधानावरून मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावल
Hasan Mushrif : अजित पवारांवरील विधानावरून हसन मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावलं...
38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ
Jalna : 38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ, नेमकं काय घडलं?
भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा...
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा दाखल
त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; शिरसाटांच्या दाव्याने खळबळ
Sanjay Shirsat : त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; संजय शिरसाटांच्या दाव्याने राजकारणात खळबळ
असा विरोधी पक्षनेता असतो का? गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
Girish Mahajan on Rahul Gandhi : असा विरोधी पक्षनेता असतो का? मतचोरीच्या आरोपांवर गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
कोल्हापुरात मध्यरात्री भीषण अपघात; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या
Kolhapur : कोल्हापुरात मध्यरात्री ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या कारखाली येऊन दोघा भावांचा मृत्यू
आरोप सिद्ध झाले नाहीत तर..; नार्वेकरांचा संजय राऊतांना इशारा
Rahul Narvekar on Sanjay Raut : आरोप सिद्ध झाले नाहीत तर..; नार्वेकरांचा संजय राऊतांना इशारा
शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढणार, रोहित पवारांची घोषणा; बावनकुळे म्हणाले...
Rohit Pawar : शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढणार, रोहित पवारांची घोषणा; बावनकुळे म्हणाले सरकार...
अमेरिका-चीननंतर भारताचा जगात तिसरा क्रमांक; लोवी इन्स्टिट्यूटच्या....
Super Power India : अमेरिका-चीननंतर भारताचा जगात तिसरा क्रमांक; लोवी इन्स्टिट्यूटच्या अहवालात भारताचा दबदबा कायम
योजना बंदही करता येत नाही, चालवणंही आव्हानात्मक; लाडकी बहीण योजनेवरून
Ladki Bahin Yojana : योजना बंदही करता येत नाही, चालवणंही आव्हानात्मक; लाडकी बहीण योजनेवरून नरहरी झिरवाळांनी मांडली सरकारची अडचण