AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चाकण एमआयडीसीच्या विकासासाठी शिंदे-सामंत यांची बैठक, ठाकरेंच्या आमदाराची उपस्थिती

चाकण एमआयडीसीच्या विकासासाठी शिंदे-सामंत यांची बैठक, ठाकरेंच्या आमदाराची उपस्थिती

| Updated on: Aug 23, 2026 | 8:41 PM
Share

पुणे | प्रतिनिधी: चाकण MIDC मधील खराब रस्त्यांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पुण्यात महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योजक, अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच ठाकरे गटाचे आमदार बाबाजी काळे उपस्थित आहेत. बैठकीपूर्वी एकनाथ शिंदे यांनी चाकण–तळेगाव रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली. सध्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असून केवळ डागडुजी न करता […]

पुणे | प्रतिनिधी: चाकण MIDC मधील खराब रस्त्यांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पुण्यात महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योजक, अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच ठाकरे गटाचे आमदार बाबाजी काळे उपस्थित आहेत.

बैठकीपूर्वी एकनाथ शिंदे यांनी चाकण–तळेगाव रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली. सध्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असून केवळ डागडुजी न करता या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

चाकण MIDC मधील वाहतूक आणि पायाभूत सुविधांबाबत बैठकीत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.

Published on: Aug 23, 2026 08:41 PM

Follow Us