AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vijay Wadettiwar: काय शिजतंय ते आम्ही बघतोय, पवारांची राष्ट्रवादी-मोदी भेटीवरून वडेट्टीवारांचं विधान

Vijay Wadettiwar: काय शिजतंय ते आम्ही बघतोय, पवारांची राष्ट्रवादी-मोदी भेटीवरून वडेट्टीवारांचं विधान

| Updated on: Aug 23, 2026 | 10:16 PM
Share

महाराष्ट्र काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. “आम्हाला सगळं माहितीये, पण आम्ही आज बोलणार नाही. काय शिजतंय ते आम्ही बघतोय,” असे सूचक विधान वडेट्टीवार यांनी केले. पवारांच्या वारंवार होणाऱ्या मोदी भेटींवर काँग्रेसला राग येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.   वडेट्टीवार यांनी […]

महाराष्ट्र काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. “आम्हाला सगळं माहितीये, पण आम्ही आज बोलणार नाही. काय शिजतंय ते आम्ही बघतोय,” असे सूचक विधान वडेट्टीवार यांनी केले. पवारांच्या वारंवार होणाऱ्या मोदी भेटींवर काँग्रेसला राग येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

वडेट्टीवार यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर अधिक प्रकाश टाकला. देशातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्यात कोणताही ट्यूनिंगचा प्रश्न नाही. ते रोज दिल्लीत एकत्र काम करतात. मात्र, महाराष्ट्रातील काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्यावर नेमका काय राग आहे, याचे उत्तर माझ्याकडे नाही, असे त्यांनी नमूद केले. सुप्रिया सुळे यांना अप्रत्यक्षपणे उद्देशून वडेट्टीवार म्हणाले की, काँग्रेसला तुमचा राग येतोय असे तुम्हाला कुठून वाटले. तुम्ही कितीही वेळा मोदींना भेटलात तरी आम्हाला अजिबात राग येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.

Published on: Aug 23, 2026 10:16 PM

Follow Us